एकूण 228 परिणाम
डिसेंबर 09, 2018
रुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....
नोव्हेंबर 30, 2018
महाभारतात एक कथा आहे, एकदा असे ठरले की, श्रीकृष्णांच्या वजनाएवढी सोने-नाणे-रत्ने वाटली वा दान केली तरच एका ऋणातून श्रीकृष्ण मुक्‍त होतील. तराजूच्या एका पारड्यात श्रीकृष्णांना बसविले व दुसऱ्या पारड्यात राजवाड्यातील सर्व संपत्ती आणून टाकली पण एक तसूभरही पारडे वर गेले नाही. मग राण्यांनी स्वतःच्या...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - 'एमजीएम'चे उपअधिष्ठाता तथा सर्जरी विभागप्रमुख डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाच्या (एएसआय) कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली. "एएसआय' ही सर्जन्सची देशातील सर्वोच्च संघटना आहे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये ऑनलाइन झालेल्या निवडणुकीत डॉ. सूर्यवंशी यांची देशभरातील 76...
नोव्हेंबर 25, 2018
प्रवासाचा मूळ हेतू असतो नेहमीच्या वातावरणापासून दूर जाणं, रोजच्या आयुष्यात थोडा बदल करणं. अर्थात, त्यापलीकडेही प्रवास असू शकतो. कामानिमित्तचे दौरे, शिक्षणासाठीचा प्रवास आदी; पण खरा हेतू असतो तो बदलाचा. सध्या निसर्गपर्यटनाला चांगले दिवस आले आहेत. रोजच्या कृत्रिम जगण्याला कंटाळलेली माणसं निसर्गाच्या...
नोव्हेंबर 18, 2018
आयुर्वेदात रोगांचे स्वरूप समजावताना ‘वेग’ अशी एक संकल्पना सांगितलेली जाते. या ठिकाणी वेग शब्दाने ‘जलद गती’ या अर्थाबरोबर ‘रोगाचा पुन्हा पुन्हा प्रादुर्भाव’ असाही अर्थ अभिप्रेत असतो. आणि हे वातदोषामुळे होणाऱ्या रोगांच्या बाबतीत घडते. वाताचे रोग बरे व्हायला अवघड असतात यामागे सुद्धा हे एक महत्त्वाचे...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
ऑक्टोबर 21, 2018
डंकर्कमध्ये अडकून पडलेलं सैन्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी रयतेच्या पाठबळावर सोडवून आणलं. क्रिस्तोफर नोलान या प्रतिभावान दिग्दर्शकानं वेगळी शक्‍कल लढवली. इतिहासानं चर्चिल या नायकावर रोखलेला "कॅमेरा' उचलून त्यानं तो डंकर्कचा किनाऱ्यावर नेऊन ठेवला. थेट युद्धभूमीवरची कहाणी सादर...
ऑक्टोबर 20, 2018
एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आदर असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या निकट उभी राहिली तर... आध्यात्मिक अनुभव यावा तसे होते. आजही तो दिवस लख्ख आठवतो. आयुष्यात घडणाऱ्या योगायोगांमधला सर्वोत्तम योग. मी अनेक वर्षे हार्मोनियमची साथ करीत होतेच. गायिका शुभांगी मुळे यांना एका कार्यक्रमात एकाच गाण्यापुरती...
ऑक्टोबर 13, 2018
मुले चुकतात, त्या वेळी त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांना चूक कळतेच, ती स्वतःच सुधारतात. मी निवृत्त शिक्षिका आहे. गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन अशा प्रसंगी विद्यार्थ्यांची आवर्जून आठवण होते. आजकाल दिवसेंदिवस शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. विद्यार्थ्यांनाही शिक्षणापेक्षा इतर अनेक गोष्टींचे आकर्षण...
ऑक्टोबर 11, 2018
तारुण्याच्या रगीमुळे ज्या "म्हाताऱ्या'ची चेष्टा केली, त्यांची ओळख पटल्यावर तरुणाई त्यांच्या चरणांशी झुकली. नगरला आयुर्वेद महाविद्यालयात होतो. नवरात्रीच्या दिवसात केडगावच्या देवीला मित्रांबरोबर गेलो होतो. मुख्य रस्ता सोडल्यावर मंदिराकडे जाणाऱ्या वाटेला लागलो. वाटेत एक ओहोळ होता. सर्वत्र दलदल, पाण...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्ली/मुंबई : स्त्रीशक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आहे, आज "तिने' पुन्हा मौन सोडत "त्याच्या' दुष्कर्माचा पाढा व्यवस्थेसमोर वाचल्याने अनेकांचे "संस्कारी' बुरखे टरकावले गेले. आज प्रथमच तिच्या बोलण्याने राजसत्ताही हादरली. #MeTooच्या वादळाचा पहिला फटका...
ऑक्टोबर 07, 2018
आपलं घर सुखी, समाधानी असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र, अनेक घरांमध्ये ताणाचं, नकारात्मक वातावरण असतं. त्याचा मुलांवरही परिणाम होत असतो आणि नात्यांमध्येही भिंती तयार होतात. नकारात्मकता येणारच नाही, असं नाही; मात्र त्या नकारात्मक भावनांमधून बाहेर काढण्याचे मार्गही शोधले पाहिजेत. पालक योग्य वर्तन...
सप्टेंबर 30, 2018
"विशिष्ट आवाज' ही ओळख असलेली पितळी घंटा, राजस्थानी मोजडी, वेगवेगळ्या कलाकुसरीनं नटलेले, हातात धरून वारा घेण्याचे पंखे याही काही वस्तू आयकॉनिक डिझाईनच्या श्रेणीत बसतात. आठवणींना थोडा उजाळा दिला तर या प्रकारच्या अनेक पारंपरिक आणि परिपूर्ण वस्तू आठवतील, आढळून येतील. "आमच्या मनातही पुष्कळ नवनवीन कल्पना...
सप्टेंबर 30, 2018
दोन ऑक्‍टोबर 2018 पासून महात्मा गांधी जयंतीचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या "वक्तशीरपणा' या एका महत्त्वाच्या पैलूविषयी... महात्मा गांधीजींच्या आयुष्याचा गोफ इतका विविधरंगी आहे, की त्यातल्या प्रत्येक पैलूतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. ते...
सप्टेंबर 30, 2018
दोघी शांतपणे घरी आल्या. पूर्ण रस्ताभर प्रिया विचार करत होती. घरी आल्या आल्या तिनं चिऊला जवळ घेऊन विचारलं ः ""तुला काही मदत हवीय का बेटा? काय झालं? तू हुशार मुलगी आहेस...मग या वर्षी काय बिनसलं?'' प्रियाला आज जरा उशीरच झाला ऑफिसमधून निघायला. एक तातडीची "प्रोजेक्‍ट डिलिव्हरी' होती आज. कामाच्या...
सप्टेंबर 28, 2018
मद्यपानाबद्दल खरी माहिती प्रामाणिकपणे रुग्ण क्वचितच सांगतात. ‘मी दारू रोज पितो’, असे स्पष्टपणे सांगणारे थोडेच. ‘मी एखाद्यावेळी थोडे ड्रिंक घेतो’, असे फार तर एखादा मद्यपी म्हणतो. रुग्णाला तपासून व त्याच्या आहाराची माहिती नीट ऐकून मद्यपानाबद्दल योग्य प्रश्‍न विचारत माहिती मिळवावी लागते. मद्यपानाचे...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - व्हीव्हीआयपी मोबाईल क्रमांक देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भामट्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. सुरेशकुमार गोलेचा असे या आरोपीचे नाव आहे. प्रसिद्ध वृत्तपत्रसमूहाच्या व्यवस्थापकीय संचालकाची सुरेशकुमारने फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. आरोपीने व्हीव्हीआयपी क्रमांक देण्याच्या...
सप्टेंबर 25, 2018
पुणे -  ‘बाप्पा मोरया... मोरया’ असा जयघोष करत, ढोल वाजवत, पारंपरिक वेशभूषेत फुगड्या खेळत तरुणी, महिला मोठ्या संख्येने ‘बाप्पा’ला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.  गणेश मंडळांच्या दैनंदिन नियोजनातही महिला, युवतींनी महत्त्वाची भूमिका बजावली. विजर्सन मिरवणुकीतही ढोल-ताशा...
सप्टेंबर 25, 2018
वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस मित्रांना चिंचवड येथील प्रतिष्ठानने ‘घरचा डबा’ देण्याचा उपक्रम राबविला.  त्याअंतर्गत चिंचवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या सूचनेनुसार भरीत...
सप्टेंबर 21, 2018
दवाखाना ही माझ्या व्यवसायाची जागा होतीच, पण समाजातील सुख-दुःखाचे ज्ञान देणारेही ते स्थान होते. माझा डफळापूर (जत)मध्ये दवाखाना होता. गुरुवारी बाजाराच्या दिवशी आसपासच्या गावांतील बरेच रुग्ण यायचे. हरिबा हताळे आला, तेव्हा त्याला धड चालताही येत नव्हते. चेहरा फिक्का पडलेला. त्याला मूतखडा झाला होता आणि...