एकूण 1073 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केलाय. आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय अशा आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलेय. जनतेला दिलासा देण्याऐवजी तिचे जगणे अधिक जटिल करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकारचा कारभार आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. काही जण पक्ष सोडून जात असले, तरी त्याने आघाडीच्या कामगिरीमध्ये फरक पडणार...
ऑक्टोबर 04, 2019
मंठा-  परिसरात सकाळी धुके पडत आहे. वातावरणातील या बदलामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  मंठा तालुक्‍यात अत्यल्प व रिमझिम पावसावर खरिपाच्या सोयाबीन, उडीद, मूग, कापूस पिकांची वाढ झाली आहे. तर अनेक भागात उडीद, मुगाची काढणी सुरू आहे. सोयाबीन पीक काढणीस आले...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खटाव आणि माण तालुक्‍यांत पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले आहे. या पावसामुळे काही गावांत ओढ्यांना पाणी वाढणे, भिंती कोसळने अशा घटना घडल्या आहेत.  वडूज परिसराला आज (गुरुवार) सकाळी दोन तास जोरदार पावसाने झोडपले. पावसाने येथील ग्रामदैवत श्रीनाथ...
ऑक्टोबर 03, 2019
औरंगाबाद,: करमाड उपबाजार समितीत 55 शेतकऱ्यांचा 26 लाखांचा माल घेऊन फरार झालेल्या गजानन रावसाहेब शिंदे  या व्यापाऱ्याच्या मंगळवारी (ता.1) पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. त्याच्याविरोधात करमाड पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "सकाळ'ने हा विषय लावून धरल्यामुळे पोलिसांबरोबर बाजार समितीने...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध...
ऑक्टोबर 02, 2019
दहिवडी : "आमचं ठरलंय'मधून उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला. काहीही झाले तरी तुम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. सर्वांच्या मतांचा सन्मान करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही श्री. देशमुख...
ऑक्टोबर 01, 2019
राहुरी : कांद्याचे भाव घसरल्याने, तसेच निर्यातबंदीच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी बाजार समितीत केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी नगर-मनमाड...
ऑक्टोबर 01, 2019
नाशिक : औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील द्याने फाट्याजवळ कांदा उत्पादक शेतक-यांनी सकाळी अकराच्या सुमारास रस्त्यावर उतरून तब्बल अर्धा तास आंदोलन छेडले. केंद्र शासनाने व वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात संपूर्ण बंद केली तसेच व्यापारी साठ्यांवरही निर्बंध लावले किरकोळ व्यापा-यांना शंभर क्विंटल व...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा : पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध क्षेत्रांतील नागरिक, संस्थांनी धनादेश व रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा व कऱ्हाड कार्यालयांत मदत दिली.  कल्याण गुडस गार्ड, सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्यातर्फे 58 हजार रुपयांची रक्‍कम पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या...
सप्टेंबर 30, 2019
सटाणा :  सटाणा बाजार समितीमध्ये सोमवार ( ता.३०) तब्बल २१ हजार क्विंटल कांदा आवक असताना व्यापाऱ्यांनी सकाळी लिलाव सुरू केले नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रवेशद्वारात गेल्या काही तासांपासून रास्ता रोको आंदोलन छेडले. यानंतर चांदवडला तहसीलदार जितेंद्र इंगळे व व्यापाऱ्यांची बैठक पार...
सप्टेंबर 29, 2019
बेनोडा शहीद (जि. अमरावती) : सततची नापिकी, डोक्‍यावर कर्जाचा डोंगर, मुलाचे शिक्षण, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असह्य झाल्याने शेतकऱ्याने कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 29) सकाळी बेनोडा शहीद येथे घडली. विनोद किसनराव चढोकर (वय 40, रा. बेनोडा शहीद), असे गळफास घेऊन...
सप्टेंबर 29, 2019
पाथरी - दुर्धर आजाराला वडील झुंज देत असल्याचे दुःख असह्य झालेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गोपेगाव (ता. पाथरी) येथे वीस सप्टेंबरला घडली. गावकऱ्यांनी शोकाकुल वातावरणात एकाच सरणावर बाप-लेकाला भडाग्नी दिला. गोपेगाव येथील रहिवासी विलास...
सप्टेंबर 29, 2019
ढोकी (जि. उस्मानाबाद) ः उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ढोकी शाखेचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी गॅसकटरच्या साहाय्याने तिजोरी तोडली. या तिजोरीतील 16 लाख 17 हजार 491 रुपये लंपास केले. शनिवारी (ता. 28) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा बॅंकेची येथील मुख्य वेशीजवळ शाखा...
सप्टेंबर 28, 2019
उंडवडी (पुणे) : कऱ्हा नदीला गुरुवारी (ता. 26) आलेल्या पुराच्या पाण्याने अंजनगाव (ता. बारामती) येथील शेतकरी अमित आनंदराव परकाळे यांच्या अर्धा एकर जमिनीतील माती वाहून गेली असून, फक्त खडक उरला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी या शेतात करडईची पेरणी केली होती. आता मात्र फक्त तिथे फक्त खडक...
सप्टेंबर 26, 2019
म्हैसपूर (ता. जि. अकोला) शहरातील विजय दुबे यांनी सुमारे ६० दुभत्या जनावरांचे संगोपन करून आपल्या दुग्ध व्यवसायाचे विस्तारीकरण केले आहे. सातत्य, चिकाटी, परिश्रम, गुणवत्ता यांच्या जोरावर दररोज पाचशे लिटर दुधाची विक्री, त्यासोबतच प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती आणि थेट ग्राहकांना विक्री या...
सप्टेंबर 26, 2019
जळगाव : कर्जबाजारीपणा व नापिकी यास कंटाळून फुपनगरी (ता. जळगाव) येथे शेतकरी योगेश प्रेमराज चौधरी (वय 40) या तरूण शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज (ता.26) सकाळी ही घटना घडली.  फुपनगरी येथे भरत जाधव यांच्या कापसाच्या शेतातील झाडाला गळफास बांधून त्यांनी आत्महत्या...
सप्टेंबर 25, 2019
सिन्नर : तालुक्‍याच्या उत्तर-पूर्व भागात यंदा मुबलक पाण्यामुळे शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहेत. कांदा लागवडीत दर वर्षीच्या तुलनेत तीनपटींनी वाढ झाली आहे. महागडे कांद्याचे रोप खरेदी करून शेतकरी लाल कांद्याची लागवड करीत आहेत. चार वर्षांत कडवा कालव्याचे पाणी किर्तांगळी,...
सप्टेंबर 25, 2019
सटाणा : कांद्याला सर्वत्र चढे भाव मिळत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजता कांद्याचे लिलाव अचानक बंद पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील सटाणा-मालेगाव रस्त्यावर बाजार समिती प्रशासनाचा निषेध करीत तब्बल...