एकूण 535 परिणाम
एप्रिल 16, 2017
सांगली-विटा - सदाभाऊ खोत बोलायचे तेव्हा सभेच्या डोळ्यांत पाणी यायचे आता मात्र त्यांच्या डोळ्यांतील शेतकऱ्यांप्रतीचे अश्रू पार आटले आहेत. ते मंत्री झाले चांगलेच झाले; मात्र आता त्यांनी आता लाल दिव्यासह आमच्या आसूड यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. निवडणुकी वेळी भाजपने...
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यात दुष्काळाचा विक्राळ चेहरा आणखी पुढे येतोय. गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसाने यंदा परिस्थिती सुधारेल अशी आशा वाटत होती; मात्र दररोज शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. काल लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली या गावातील शीतल व्यंकट वायाळ या...
एप्रिल 15, 2017
उस्मानाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी नसल्याची नकारघंटा शासन वाजवत आहे. तर आमदारांचा पगार वाढविण्यासंदर्भात एका महिन्यात घोषणा होते व दुसऱ्या महिन्यात लागू होते. यावरून शासनाची मानसिकता तपासणे गरजेचे आहे, अशी टीका अचलपूरचे (जि. अमरावती) अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केली....
एप्रिल 15, 2017
आष्टी - 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला वाढीव निधी उपलब्ध व्हावा, यासाठी येत्या मे महिन्यापासून आमदारांना जाहीर झालेले सर्व वाढीव भत्ते नाकारण्याचा निर्णय घेतला असून, शिक्षक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांनीही सातवा वेतन आयोग नाकारावा,' असे आवाहन आमदार...
एप्रिल 14, 2017
जत : बोअरला पाणी न लागल्याने व कर्जाला कंटाळून भैरु आण्णाप्पा कोङलकर ( वय-36) व पत्नी पदुबाई भैरु कोङलकर ( वय- 27, दोघे - रा. खिलारवाडी ता. जत) या शेतकरी दांपत्याने नैराश्‍यातून आत्महत्या केली.  याबाबत माहिती अशी की, भैरू कोडलकर यांची खिलारवाडी येथे एक एकर शेती आहे. ऊसतोड मजुरी करून...
एप्रिल 14, 2017
नांदेड - दारू पिल्यामुळे किंवा दारूच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हणणे चुकीचे आहे. इतर लोकही दारू पितात. त्यांनी आत्महत्या केली का, असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी येथे उपस्थित केला.  आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून ते...
एप्रिल 14, 2017
नाशिक - जिल्ह्यात आज आणखी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे साडेतीन महिन्यांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 21 झाली आहे.  आज आत्महत्या केलेले शेतकरी कळवण या आदिवासी तालुक्‍यातील आहेत.  भाउसाहेब चंद्राजी बंगाळे (वय 40) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर आज...
एप्रिल 14, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या अत्यंत चिंताजनक असूनही राज्य शासनाला पाझर फुटत नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येईल? असा प्रश्‍न उपस्थित करत आमदार बच्चू कडू यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली. आमदार कडू यांच्या नेतृत्वात...
एप्रिल 13, 2017
नांदेड - दारू प्यायलामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हणणे चुकीचे असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले असून आपला हा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी ७५ टक्के आमदार, खासदार आणि पत्रकार पितात, एवढेच नव्हे तर अभिनेत्री हेमामालिनी देखील रोज एक बंपर दारू पिते. मग तिने आत्महत्या केली का...
एप्रिल 13, 2017
फुलंब्री - बोरगाव अर्ज (ता. फुलंब्री) येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.11) घडली आहे. रामेश्‍वर दावल बलांडे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बलांडे मंगळवारी (ता.11) सकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान...
एप्रिल 13, 2017
नागपूर - येत्या 14 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत असून, दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून या दिवशी पंतप्रधानांनी देशभरात दारूबंदी लागू करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज येथे केली. दारूमुळे महिलांवरील...
एप्रिल 13, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त "जय शिवराय, जय भीमराय' फाउंडेशनने मिरवणूक, डीजेचा खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला. टाकळी माळी (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी विष्णू बुरकूल यांनी 80 हजार रुपयांच्या...
एप्रिल 12, 2017
सोलापूर - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. 10) निदर्शने करण्यात आली. कर्जमाफीची कार्यवाही तातडीने व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली....
एप्रिल 12, 2017
कणकवली - शेती सामुदायिक पद्धतीने व्हायला हवी. तसेच शेतीवरील मनुष्यबळाचे अवलंबित्व कमी व्हायला हवे आणि हे मनुष्यबळ औद्योगिकरणाकडे वळवले तरच आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होण्यास मदत होईल,’ असे आर्थिक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते. या विचारांची आजही गरज आहे, असे मत लेखक आणि...
एप्रिल 12, 2017
तळणी (ता. मंठा) - नापिकी, शेतमालाला मिळत नसलेला भाव, बॅंकांकडून कर्ज मिळत नसल्याच्या नैराश्‍यातून देवठाणा (ता. मंठा) येथील शेतकरी सुरेश नागनाथ चोपडे (वय 35) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
एप्रिल 11, 2017
पुणे : स्वातंत्र्यानंतर स्वकीय सत्तेत येऊनही सरकार, नोकरशाही आणि समाजाचा शेतकऱ्यांप्रती दृष्टिकोन बदलण्यास अपयश आल्यामुळे 125 वर्षांपूर्वीची महात्मा फुले कालीन परिस्थिती तशीच राहिल्याचा सूर शेतकरी, शेतकरी नेते आणि अभ्यासकांच्या मतांतून व्यक्त झाला आहे.  सव्वाशे...
एप्रिल 11, 2017
पुणे - ""उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यास सरकार प्राधान्य देते; पण गरीब शेतकऱ्यांचा विचार करीत नाही. या सरकारला शेतकऱ्यांबद्दल जराही सहानुभूती नाही,'' अशी टीका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सोमवारी येथे केली.  शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतीमालाला योग्य दर मिळावा आणि मंत्रालयात शेतकऱ्याला...
एप्रिल 11, 2017
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शेकडो शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसह सोमवारी (ता.10) क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे' अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. आंदोलनासाठी लोकप्रतिनिधींसह शिवसेना व अंगीकृत...
एप्रिल 11, 2017
कणकवली - ‘राष्ट्रवाद ही माणसांच्या मनात पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना आहे. राष्ट्रवादातून भूभागांची वाटणी होते. प्रांतानुसार माणसे विभागली जातात. प्रांता-प्रांतामध्ये हिंसक लढे लढवले जातात. यामुळे राष्ट्रवादापेक्षा आज मानवतावादाची खरी गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. देवेंद्र...
एप्रिल 11, 2017
अंबड - अंबड तालुक्‍यातील किनगाव येथील शेतकरी संतोष जनार्दन वाघ (वय 35) यांनी रविवारी (ता. 9) मध्यरात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वाघ यांच्यावर रोहिलागड येथील युनियन बॅंकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्याकडे कृषी सेवा केंद्रही...