एकूण 11976 परिणाम
नोव्हेंबर 13, 2016
नांदेड - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.11) किनवट तालुक्‍यातील चिंचखेड येथे घडली. चिंचखेड येथील शेतकरी विष्णू संभाजी वानखेडे (वय 55) यांच्या शेतात तीन वर्षांपासून सतत नापिकी होत होती. त्यांनी बॅंकेचे व काही...
नोव्हेंबर 12, 2016
नागपूर - उसाचे पीक घ्यायचे असेल, तर शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाची सोय करावी लागणार आहे. याबाबचे धोरणच लवकरच राज्य सरकार तयार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  रेशीमबाग येथे आयोजित आठव्या "ऍग्रो व्हिजन'च्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की...
नोव्हेंबर 11, 2016
लेट खरिपात ५७ हजार ४०४ हेक्टर क्षेत्र पुणे - गेल्या दीड महिन्यापासून रांगडा (लेट खरीप) कांद्याची लागवडी सुरू झाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ४०४ हेक्टरवर रांगडा  कांद्याची लागवड झाली आहे,  असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात रांगड्या कांद्याचे सरासरी ८१ हजार ९६४ हेक्टर एवढे...
नोव्हेंबर 11, 2016
सांगली - रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेत राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना समाविष्ट करून घेतलेले नाही. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या जिल्हा बॅंकांत 500 व 1000 च्या जुन्या नोटा बदलून नव्या मिळणार नाहीत. त्यामुळे राज्यातील 5 हजार 48 शाखांशी...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या चलनी नोटा 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी देण्याची विनंती राज्याने...
नोव्हेंबर 11, 2016
नाशिक - नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत यंदा खरिपाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 3 लाख हेक्‍टरने वाढले आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी विभागात रब्बीच्या 58.33 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा आतापर्यंत 28 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. नगरमध्ये...
नोव्हेंबर 10, 2016
लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेऊन देशात अघोषित आर्थिक आणीबाणी लागू केल्याची जोरदार टीका बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती यांनी केली आहे. काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा मंगळवार मध्यरात्रीपासून...
नोव्हेंबर 10, 2016
‘व्हीएसआय’तर्फे १३ ते १६ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद पुणे - जागतिक साखर उद्योगातील आव्हाने व वाटचालीचा दिशादर्शक आढावा घेणारी आंतरराष्ट्रीय ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५’ परिषद १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान मांजरी येथील ‘व्हीएसआय’च्या आवारात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन...
नोव्हेंबर 10, 2016
कुडाळ- मला विश्‍वासात न घेता पदमुक्त करण्यात आले. राजीनामा मागितला असता तर मी स्वखुशीने दिला असता, असे पत्रकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी म्हटले आहे. खासदारांची भेटही सर्वपक्षीय व लाकूड व्यावसायिकांची होती, असेही यात म्हटले आहे. पत्रकात श्री. बेळणेकर यांनी म्हटले...
नोव्हेंबर 09, 2016
जळगाव - किमान आधारभूत दराने (एमएसपी) ज्वारी, मका खरेदी करण्यासाठी शासनाने केंद्रे सुरू करण्याची परवानगी यापूर्वीच दिलेली आहे; मात्र स्थानिक प्रशासनाने विधान परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करून खरेदी केंद्रांच्या मार्गात खोडा घालून ठेवला आहे. खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांचे...
नोव्हेंबर 09, 2016
युतीच्या काळातही ६२६२ जणांनी मृत्यूला कवटाळले; मराठवाड्यात सत्र सुरूच मुंबई - कृषी क्षेत्रातील नापिकी, खासगी सावकारांचा विळखा आणि बॅंकांच्या कर्जाखाली चेपलेल्या तब्बल २२ हजार ९२६ शेतकऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षांत आत्महत्या केल्याचे विदारक चित्र माहिती अधिकार कायद्यांतर्गत समोर आले आहे.  राज्यात...
नोव्हेंबर 09, 2016
नागपूर - घराला कुलदीपक हवा, असं केवळ अडाणी व अशिक्षित लोकांनाच वाटतं असं नाही. शिकलेल्यांचीही तीच भावना असते. बाबर कुटुंबही त्याला अपवाद ठरलं नाही. दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगीच झाल्याने मुलाची ओढ असलेल्या मातापित्यांनी तिला "नकोसा' ठरविले. याच "नकोसा'च्या पाठोपाठ भाऊ झाल्यानंतर ती परिवारासाठी "...
नोव्हेंबर 09, 2016
वरुड (जि. अमरावती) - महागाईचा आलेख सतत वाढत असला तरी शेतमालाला मात्र, कवडीमोल भाव मिळत आहे. शेतातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने नैराश्‍य आलेल्या शेतकरी पतीने गळफास घेतला तर पत्नीने विषाचा घोट घेऊन आयुष्य संपविले. हृदयाला पिटाळून लावणारी दुदैवी घटना वरुड तालुक्‍यातील घोराड गावात आज,...
नोव्हेंबर 09, 2016
कोल्हापूर - "कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर' या कायद्याला हरताळ फासण्याचे काम राज्य शासन करत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरअखेर सातबारा उतारा व फेरफार उतारे ऑनलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. पण, याच सातबारावरील पीकपाहणी किंवा वहिवाट म्हणून असणारे सदर (कॉलम) काढून टाकल्याने...
नोव्हेंबर 08, 2016
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात सरकारची कामगिरी तशी फारशी चमकदार झाली नसली तरी विरोधी पक्ष मात्र त्यांची कोंडी करण्यात म्हणावा तसा यशस्वी ठरलेला नाही. किंबहुना कमकुवत विरोधकांमुळेच फडणवीस सरकार निश्‍चिंत असल्याचे दिसते. ...
नोव्हेंबर 08, 2016
यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी रात्र घालविल्याच्या दुसऱ्या दिवशीच शेतकरी आत्महत्या झालेले पिंपरी बुटी (ता. बाभूळगाव) गाव आता पुन्हा चर्चेत आले आहे. या गावातील वाढत्या आत्महत्या नियंत्रणासाठी अभिनेता अक्षयकुमार हे गाव दत्तक घेणार असल्याने या गावाकडे पुन्हा अनेकांच्या नजरा वळल्या आहेत....
नोव्हेंबर 08, 2016
आंदोलनकर्त्यांना अटक - दरासाठी सकल ऊस परिषदेचा ‘स्वाभिमानी’ला घरचा आहेर इस्लामपूर - ऊस आंदोलन काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची त्रेधा उडवणाऱ्या पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आज खऱ्या अर्थाने मंत्र्यांचे दुखणे काय असते, याचा अनुभव आला. इस्लामपुरातील त्यांच्या आलिशान बंगल्यासमोर आज सकल ऊस...
नोव्हेंबर 08, 2016
दापोली : तालुक्‍यात गेले पाच दिवस पडणाऱ्या थंडीने दापोलीवासीय गारठून गेले आहेत. कोकणचे मिनी महाबळेश्‍वर हे नाव दापोलीत सध्या सार्थ होत आहे. सकाळी दाट धुके पडत असून, रात्रीचे तापमानही घसरले आहे. त्यामुळे थंडीमुळे आंबा कलमांना पालवी येऊ लागल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे....
नोव्हेंबर 08, 2016
वॉशिंग्टन - अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या आयबीएम कंपनीने मिनिपोलिस येथील पाचशे कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांचे काम भारत तसेच, अन्य देशांतील कर्मचाऱ्यांना दिले, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.  मिनिपोलिस येथे बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘‘आयबीएमने...
नोव्हेंबर 08, 2016
नवी दिल्ली : पंजाब आणि हरियानामधील शेतात शेतकऱ्यांकडून जाळण्यात येणारे अनावश्‍यक पीक हेच दिल्लीतील प्रदूषणाचे कारण असल्याचे माहिती समोर आली आहे. पंजाब आणि हरियानातील शेतकरी अनावश्‍यक पीके पेटवून देतात. त्यातून निर्माण होणाऱ्या दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून 1 नोव्हेंबरनंतर दिल्लीतील...