एकूण 11716 परिणाम
मे 20, 2019
रत्नागिरी - टंचाईच्या झळा जिल्ह्यात ठिकठिकाणी जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील पुरग्रस्त आणि धरण उशाशी असलेल्या चांदेराईलाही टंचाईचा तडाखा बसला आहे. प्रतिदिन दोन लाख लिटर पाणी देणार्‍या योजनेची विहिरी कोरडी पडली आहे. चांदेराईजवळी एमआयडीसीच्या हरचिरी धरणातील पाणी कमी झाल्याने चांदेराईवासीयांना हा...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विखेंमुळे भाजपला ताकद मिळण्याची चर्चा आहे. थोरातांनादेखील आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. या...
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक),...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
मे 19, 2019
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एका तरूण शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निमगाव (ता. हदगाव) शिवारात शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली. निमगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी अशोक रामधन चव्हाण (वय ४०) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईने सर्वांनाच त्रस्त केले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळातही शेतीला पाणी पुरविता येते. घरगुती पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची नासाडी टाळून पाण्याची बचत करण्याचे प्रयोग काही उपक्रमशील शेतकरी करीत आहेत. चोपडा तालुक्‍यातील...
मे 19, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे चार दिवस असताना कोल्हापुरातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक विजयी होणार की सेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक? याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हातकणंगले मतदारसंघातही काटाजोड लढत असल्याने त्यात खासदार राजू शेट्टी ‘हॅट्‌ट्रिक’ करणार की सेना उमेदवार...
मे 19, 2019
तळेगाव दिघे (नगर ) : दुष्काळी भागातील शिर्डीनजीकच्या काकडी येथे विमानतळ सुरु करण्यात आले. त्यामुळे हा भाग प्रसिद्धीच्या झोतात आला. विमानतळाचे काम सुरु होताच परिसरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र या भागातील पाणीप्रश्न मात्र प्रलंबित राहिला. विमान आले, मात्र पाणी नाही आले ! अशी व्यथा दुष्काळी...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय ना अडका नाय'...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी...
मे 18, 2019
सांगली : मगरीने आकाश जाधव ऊर्फ गुंड्या या बारा वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याच्या घटनेने मौजे डिग्रजकरांच्या उरात धडकी भरली आहे. गाव सुन्न आहे. कृष्णा नदीपासून शे-दोनशे मीटर अंतरावर बाळासाहेब लांडे यांच्या शिवारात पडलेल्या वीटभट्टी कामगारांच्या झोपड्यांत अश्रुंचा बांध फुटलाय. सकाळी तांड्यावर...
मे 18, 2019
पिरंगुट : उरवडे (ता.मुळशी) येथील केझर काँप्रेसर कंपनीने कोणत्याही खात्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन व अनधिकृत सीमाभिंत उभारली आहे. सदरचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीचे अतिक्रमण विरोधी पथक येऊनही कोणतीही कारवाई न करता माघारी फिरले. याबाबत पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम आणि महानियोजनकार...
मे 18, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे....
मे 18, 2019
मायणी : कलेढोण गणातील १४ गावांना सिंचनासाठी टेंभुचे पाणी मिळावे. अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली. त्यांनी कार्यवाहीचे आदेशही दिले. मात्र टेंभुऐवजी पाटबंधारे विभागाने उरमोडी प्रकल्पाचे पाणी देण्यात येणार्‍या समस्यांचा पाढा सातारा पाटबंधारे विभागाने वाचुन दुष्काळग्रस्तांच्या...
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359) मागून...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईवरून येत...