एकूण 4805 परिणाम
जून 20, 2019
नागपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्यांची आवक घटल्याने भावामध्ये वाढ झाली आहे. किरकोळ विक्रीमध्ये हिरव्या मिरचीच्या भावात विक्रमी वाढ होऊन हिरवी मिरची, कोथिंबीर 90 ते शंभर रुपये किलोवर गेली आहे. इतर भाज्या 60 ते 70 रुपये किलो आहेत. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने येत्या काळात भाजीपाला आणखी...
जून 19, 2019
पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यासाठी संजीवनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीच्या सांडपाण्यामुळे दूषित होत आहे. त्यामुळे शेकडो गावे प्रभावित झाली आहेत. नागरिकांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सतत आंदोलन करूनही वैनगंगा प्रदूषणमुक्त झाली नाही. त्यामुळे पुन्हा शासन,...
जून 19, 2019
गडचिरोली : ग्रामीण भारतात नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या धेयवेड्या लोकांना शोधून त्यांच्या कार्याचा सन्मान करून सेंद्रिय शेतीबाबत जनजागृतीत तसेच लघु व्यवसाय निर्माण करण्याच्या हेतूने ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. गुजरातमधील सृष्टी या संस्थेअंतर्गत यंदा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍यातील...
जून 19, 2019
लातूर : शेतकरी आत्महत्या करून निघून जातो. पण पुढे त्याच्या विधवा पत्नींना मात्र अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच मुश्कील होते. हे लक्षात घेवून राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारसीची राज्य शासनाच्या वतीने अंमलबजाणी केली जाणार आहे. यात महसूल, महिल आणि बालकल्याण, शालेय शिक्षण, आरोग्य,...
जून 19, 2019
शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रगतिशील शेतकरी आनंदकुमार अंत्रोळीकर यांनी उसामध्ये ‘सबसरफेस ड्रिप’ तंत्राचा प्रयोग केला आहे. यंदा उन्हाळ्यातही त्यांनी याच तंत्राने पाच एकरांत टोमॅटोदेखील घेतला आहे. त्याचे उत्पादन लवकरच...
जून 19, 2019
एकत्रित कुटुंबाची शक्‍ती खरोखरंच किती मोठी असते, याचे उदाहरण बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाचे देता येईल. एकेकाळी केवळ दीड एकरांपुरती जमीन असलेल्या या कुटुंबातील सात भावांनी कष्ट, चिकाटीतून आपल्या शेतीचा तब्बल १९७ एकरांपर्यंत विस्तार करण्यापर्यंत मजल गाठली आहे. फळबाग शेतीला दुग्ध...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 18, 2019
साकोरा ः बोराळे (ता. नांदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी भिलासाहेब राजपूत यांची केळीची इराणला निर्यात होत आहे. श्री. राजपूत यांनी आतापर्यंत कांदा, कापूस, केळीची उत्कृष्ठ पिके घेतली आहेत. गतवर्षी दुबईत त्यांनी कांदा निर्यात केला. श्री. राजपूत यांनी गुजरातमध्ये 25 वर्षे कापूस खरेदी अधिकारी म्हणून सेवा...
जून 18, 2019
नागठाणे : 'गाव करील ते राव काय करील' ही उक्ती सर्वार्थाने साध्य करताना रेवंडे या दुर्गम भागातील गावाने बचतगटाची चळवळ स्वतःसाठी आधार बनविली आहे. केवळ शंभर रुपयांवर सुरु झालेल्या इथल्या बचतगटाने शासनाच्या सहकार्याने तब्बल एक कोटी रूपयांचा महत्वाकांक्षी सामूहिक शेती प्रकल्प हाती घेतला आहे...
जून 18, 2019
हिंगोली : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्यासाठी गावपातळीवर आवश्यक उपाय योजना करून स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पाणी अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सरपंचांना पाठविले आहे. त्यानुसार आता शनिवारी (ता. 22) ठिकठिकाणी ग्रामसभा...
जून 18, 2019
रत्नागिरी - ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील मोसमी पावसाचे आगमनच लांबले. परिणामी दहा दिवसांनी पेरण्या लांबल्या. पावसात सातत्य राहिले तर लावण्या वेळेत पूर्ण होतील, अन्यथा पुन्हा बळीराजाची चिंता वाढणार आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेली अशी परिस्थिती पाच वर्षांनी उद्‌भवली आहे....
जून 18, 2019
वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषिकेश सोनटक्‍के (टाकरखेडा, जि. अमरावती) या २४ वर्षीय तरुणाने चार वर्षांतच संत्रा शेतीत दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सध्या दहा एकरांतील ११०० झाडांचे काटेकोर व्यवस्थापन तो आत्मविश्‍वासपूर्वक करतो आहे. स्वतः प्रशिक्षण, मार्गदर्शन घेत अन्य शेतकऱ्यांनाही...
जून 18, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याच्या आत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान बंद केल्याने कांद्याच्या दरात 200 ते 300 रुपयांची घट दिसून आली असून, त्यानंतर एक आठवडा उलटूनही भावातील घसरण तशीच असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वी कांदा...
जून 18, 2019
श्रीगोंदे - घारगाव (ता. श्रीगोंदे) येथील पानसरे वस्तीवर सोमवारी जनावरांना पाणी काढण्यासाठी गेलेल्या कमल बापू पानसरे (वय 36) व वर्षा बापू पानसरे (वय 16) या मायलेकींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कमल पानसरे या वर्षासोबत गायीला पाणी पाजण्यासाठी त्यांच्या...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 17, 2019
न्यू बोर अभयारण्यातील उमरविहिरी क्षेत्रातील घटना कारंजा (घा) (जि. वर्धा) : तालुक्‍यातील धानोली येथील शेतकरी शेतातून जंगलाच्या काठाने परत येत असताना त्याच्यावर अचानक वाघिणीने हल्ला केला. यात शेतकरी जागीच ठार झाला. वाघिणीने या शेतकऱ्याला जंगलात फरपटत नेल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. विठोबा दसरू...
जून 17, 2019
शहरात भाजीपाला महाग मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळत नाही. शेती म्हणजे नुसता बेभरवशाचा धंदा असे सर्वच म्हणत असतात. मात्र, शेतीला शास्त्रीय ज्ञानाची जोड व विक्रीसाठी अर्थशास्त्राची जोड दिली तर नोकरीसाठी शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही, हे नगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता....
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
जून 17, 2019
गडचिरोली : जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता शेतकऱ्यांनी यावर अवलंबून न राहता बांबूशेतीकडे वळावे. त्यामुळे बांबूशेती ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक लाभासाठी बांबूशेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित...
जून 16, 2019
पावसाळ्यात अडीचशे इंचाहून अधिक पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे दृश्‍य कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, उपनद्या किंवा बंधाऱ्यांमुळे बारमाही पाणी उपलब्ध असते. पण दुर्दैवाने ते शेतापर्यंत आणण्यासाठी आर्थिक ताकद परिसरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नाही. अशा ठिकाणी पाणी...