एकूण 1239 परिणाम
मार्च 20, 2019
कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत.  शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या...
मार्च 19, 2019
रत्नागिरी - नाणार रिफायनरी रद्द झाली तरीही लोकसभा आणि येऊ घातलेल्या विधानसभेचे राजकारण त्याभोवतीच फिरत ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीत उतरण्यासाठी अशोक वालम यांच्या रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे रूपांतर कोकण शक्ती महासंघात झाले. स्वाभिमानचे सर्वेसर्वा नारायण राणेंशी वालम यांची वाढती...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 18, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी केली. त्यामुळे धुळे मतदारसंघात कॉंग्रेसचे बळ वाढले. खांद्याला खांदा लावून या पक्षाचे नेते कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करतील. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे धुळे जिल्ह्यात रचनात्मक कार्याच्या उभारणीसह विविध कार्यकारिणी बळकट करणे,...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 17, 2019
मंगळवेढा : दुष्काळाने होरपळलेल्या तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे हे निसर्गाऐवजी शासकीय मदतीवर अवलंबून असताना विमा कंपनीने मात्र तालुक्यात दोन महसूल मंडळाला वेगवेगळी भरपाई देवून सातवीची वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही शेतकरी ज्या खात्यावर भरपाई जमा नसल्याने बॅकेत हेलपाटे मारून थकले...
मार्च 17, 2019
नांदेड : रेल्वे संपत्ती व प्रवाशी यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत नांदेड विभागातील प्रवाशांच्या मागण्याचा साकारात्मकेतने विचार करणार असल्याचे मत दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (ता. 16) नांदेड दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.  दक्षिण मध्य...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याबाबत पाकिस्तान प्रामाणिक असेल, तर त्यांनी किमान कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि सय्यद सल्लाउद्दीन यासारख्यांना तरी भारताच्या ताब्यात सोपवावे. भारतीय नागरिक असणारी ही मंडळी सध्या पाकिस्तानातच वास्तव्यास असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.  पुलवामातील...
मार्च 14, 2019
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील जैशेचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. यामुळे एका अर्थी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, आता पाकिस्तान सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. या पार्श्वभूमिवर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली. तरेच दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही असे पाकिस्तानला...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
मार्च 12, 2019
पाली - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका या इ.व्हि.एम. मशिनचा वापर न करता बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश कमिटिच्या आदेशानुसार सुधागड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना या संदर्भातील निवेदन दिले.    हे...
मार्च 12, 2019
खंडपीठ, सर्किट बेंच निर्मितीसाठी प्रयत्नांची गरज  (अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ) सर्वसामान्य नागरिकांची हजारो प्रकरणे केवळ न्यायाधीशांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रलंबित आहेत. अपवादात्मक प्रकरणे वगळता अधिकाधिक प्रकरणांचा गतीने निकाल दिल्यास कायद्याचा दरारा निर्माण होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणुकीत २००४ पासून तयार झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला २००९ च्या निवडणुकीत उद्‌ध्वस्त झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश नारायण राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला. रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनंत गीतेंनी मात्र रायगडमधून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला. कोकणात २००९ ची लोकसभा निवडणूक...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अपयशी ठरल्याने समविचारी पक्ष, संघटनांना सोबत घेऊन शेतकरी संघटना लोकसभेच्या सर्व 48 जागा लढविणार आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता....
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ले केलेल्या ठिकाणी पत्रकारांना प्रतिबंध करून पाकिस्तान बरेच काही लपवत आहे, असा हल्लाबोल भारताने आज केला. तसेच, दहशतवादी मसूद अजहरविरुद्धची कारवाई फक्त कागदावर असून, पाकिस्तान "जैशे-महंमद'च्या प्रवक्‍त्यासारखे वागत आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानवर...
मार्च 10, 2019
आपल्याकडं कोणा राजकीय अथवा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तीशी ओळख झाली, तर आयुष्यात बदल होईल, असं अनेकांना वाटतं. हे 99 टक्के चुकीचं आहे. बऱ्याच युवकांना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन वृद्धिंगत करावा असंही वाटतं; परंतु याचा अर्थ "आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयावर परदेशात जाऊन एक पदवी प्राप्त करणं आणि मग...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेली "जमाते इस्लामी जम्मू आणि काश्‍मीर' या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध होते, तसेच या संघटनेचे म्होरके नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत सातत्याने संपर्क साधत असत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.  "हुर्रियत...