एकूण 50 परिणाम
मे 24, 2019
सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी...
मे 23, 2019
सांगली -  सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील २१ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. पाटील यांना 69,340 तर  विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना) यांना 47,656 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 40625 मते मिळाली आहेत. ...
मे 15, 2019
बागणी - मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले.  मात्र, आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ‘एसी’मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील...
मे 12, 2019
लोकसभेसाठी भाजपच्या वर्चस्वाची परंपरा जळगावात असली, तरी सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’ची ताकद तुल्यबळ आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपातील अंतर्गत बंडाळी, उमेदवारी कापणे आणि त्याचे पर्यावसन व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमटणार, हे...
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या...
एप्रिल 29, 2019
मुंबई : विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्यात येथे लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 55.35 टक्के मतदानाची नोंद झाली. आज (सोमवार) सकाळपासून...
एप्रिल 29, 2019
मिरज : लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यावरील प्रेम त्यांच्या दोन कट्टर समर्थकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या दोघांपैकी निवडणूक कोण जिंकणार, यावर मिरज तालुक्‍यातील दोघांनी एक लाखाची पैज लावली होती. नुसती पैजच...
एप्रिल 28, 2019
मिरज -  लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावर लावलेली एक लाख रुपयांची पैज दोघांच्या अंगलट आली. दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी त्यांना अटकही झाली आहे. राजकुमार लहू कोरे ( रा विजयनगर ) आणि रणजीत लालासाहेब देसाई ( रा. शिपूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत...
एप्रिल 28, 2019
पुणे - ‘देशात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्त्यांवरील अपघातांची नोंद होते. सुमारे दीड लाख नागरिकांना प्राण गमवावे लागतात. दरदिवशी जवळपास ४१३ नागरिकांचा मृत्यू अपघाताने होतो. वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने योग्यरीतीने पालन केल्यास ही जीवितहानी सहज रोखणे शक्‍य आहे,’ असे मत राज्य महामार्गाचे पुणे...
एप्रिल 24, 2019
सांगली - थेट तिरंगी लढत, पक्षीय पातळीवर पूर्णतः नवी समीकरणे आणि नेत्यांच्या उभ्या-आडव्या बेरीज-वजाबाकीमुळे प्रचंड चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चुरशीने, उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले. एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४ आहे.  २०१४ ला...
एप्रिल 23, 2019
सांगली - भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात दुपारी चारपर्यंत 46.61 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान असे - मिरज 45.85, सांगली 47.40, पलूस 48.76, ...
एप्रिल 21, 2019
विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त...
एप्रिल 21, 2019
सांगली -  येथे स्वाभिमानीने कारखाने विकून खाल्लेल्यानाच तिकीट दिले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  येथील स्टेशन चौकात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. खासदार...
एप्रिल 20, 2019
सांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत. मात्र साहित्य क्षेत्रासह शासनालाही आठवण नाही. इतकं मोठं करुनही ‘ना चिरा, ना पणती’ अशीच अवस्था आहे.  डॉ. बाबर यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा अभ्यास...
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मतदान पेटी रस्त्यावर; ईव्हीएमचे तुटले सील अर्जुन खोतकर म्हणतात, 'दानवे हे माझी मेहबुबा' (व्हिडिओ) पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचा...
एप्रिल 19, 2019
सांगली - धनगर समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात. भाजपमुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपच्याच पाठिशी असल्याचा दावा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला. भाजप, शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 18, 2019
जत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दात टीका...