एकूण 53 परिणाम
मे 24, 2019
सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो...
मे 24, 2019
काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी...
मे 23, 2019
सांगली -  सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील २१ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. पाटील यांना 69,340 तर  विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना) यांना 47,656 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 40625 मते मिळाली...
मे 15, 2019
बागणी - मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले.  मात्र, आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ‘एसी’मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील...
मे 14, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघास आता भाजपने मतपेढी बनवलीय. आयात नेते भाजपमय झालेत. जिल्हा परिषद, महापलिका ताब्यात घेत त्यांनी बलाढ्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केलंय. काँग्रेसला तर लोकसभेची जागादेखील ‘स्वाभिमानी’साठी सोडावी लागली. अर्थात, लाटेवर स्वार भाजपला लोकसभेसाठी कसरत करावी लागलीच....
मे 12, 2019
लोकसभेसाठी भाजपच्या वर्चस्वाची परंपरा जळगावात असली, तरी सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’ची ताकद तुल्यबळ आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपातील अंतर्गत बंडाळी, उमेदवारी कापणे आणि त्याचे पर्यावसन व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमटणार, हे...
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या...
एप्रिल 29, 2019
मुंबई : विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्यात येथे लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 55.35 टक्के मतदानाची नोंद झाली. आज (सोमवार) सकाळपासून मतदारांमध्ये...
एप्रिल 29, 2019
मिरज : लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यावरील प्रेम त्यांच्या दोन कट्टर समर्थकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या दोघांपैकी निवडणूक कोण जिंकणार, यावर मिरज तालुक्‍यातील दोघांनी एक लाखाची पैज लावली होती. नुसती पैजच लावली, नाही तर...
एप्रिल 28, 2019
मिरज -  लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावर लावलेली एक लाख रुपयांची पैज दोघांच्या अंगलट आली. दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी त्यांना अटकही झाली आहे. राजकुमार लहू कोरे ( रा विजयनगर ) आणि रणजीत लालासाहेब देसाई ( रा. शिपूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत...
एप्रिल 28, 2019
पुणे - ‘देशात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्त्यांवरील अपघातांची नोंद होते. सुमारे दीड लाख नागरिकांना प्राण गमवावे लागतात. दरदिवशी जवळपास ४१३ नागरिकांचा मृत्यू अपघाताने होतो. वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने योग्यरीतीने पालन केल्यास ही जीवितहानी सहज रोखणे शक्‍य आहे,’ असे मत राज्य महामार्गाचे पुणे...
एप्रिल 25, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ६५.३८ टक्के मतदान झाले. प्रशासनाने वर्गवारी अंतिम झाल्यानंतर आज सायंकाळी साडेसहा वाजता अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यात १८ लाख तीन हजार ५४ मतदारांपैकी ११ लाख ७८ हजार ८१४ मतदारांनी मतदान केले. मिरज-सांगली रोडवरील शासकीय धान्य गोदामात ईव्हीएम मशीन...
एप्रिल 24, 2019
सांगली - थेट तिरंगी लढत, पक्षीय पातळीवर पूर्णतः नवी समीकरणे आणि नेत्यांच्या उभ्या-आडव्या बेरीज-वजाबाकीमुळे प्रचंड चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चुरशीने, उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले. एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४ आहे.  २०१४ ला...
एप्रिल 23, 2019
सांगली - भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात दुपारी चारपर्यंत 46.61 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान असे - मिरज 45.85, सांगली 47.40, पलूस 48.76, खानापूर 46.27, ...
एप्रिल 21, 2019
सांगली :  वंचित बहुजन आघाडी ही वंचितांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तयार झाली आहे. तर काँग्रेस वाले राज ठाकरे यांच्या मागे लागले असले तरीही मनसेचे इंजिन बंद आहे. त्या इंजिन मध्ये डिझेल नाही त्यामुळे ते पुढे जाणार नाही.  अशी टिका केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले वंचित बहुजन आघाडी आणि मनसेवर केली...
एप्रिल 21, 2019
विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त...
एप्रिल 21, 2019
सांगली -  येथे स्वाभिमानीने कारखाने विकून खाल्लेल्यानाच तिकीट दिले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  येथील स्टेशन चौकात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. खासदार राजू शेट्टी...
एप्रिल 20, 2019
सांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत. मात्र साहित्य क्षेत्रासह शासनालाही आठवण नाही. इतकं मोठं करुनही ‘ना चिरा, ना पणती’ अशीच अवस्था आहे.  डॉ. बाबर यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा अभ्यास...