एकूण 867 परिणाम
मे 27, 2019
पुणे - रोजगार मेळावे म्हणजे तरुणांसाठी आश्‍वासक व्यासपीठ आहे. याद्वारे कंपन्याच आमच्यासारख्या होतकरू उमेदवारांच्या जवळ येतात. त्यामुळे नोकरीची संधी मिळते आणि हमखास नोकरीही मिळते, अशा भावना व्यक्त करीत ‘राइज’ या ‘मेगा जॉब फेअर’मध्ये साडेतीन हजारांहून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला. यातील बाराशे...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. ...
मे 26, 2019
कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर हत्येतील...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या...
मे 26, 2019
लातूर : शहर आणि जिल्ह्यात अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. या वाढत्या अपघातांमुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात गंभीर स्वरूपाचे १८५ अपघात झाले असून त्यात तब्बल ८१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलणेेने अपघाताचा आलेख वाढत असल्याचे चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ)...
मे 25, 2019
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने हिंदू विधिज्ञ परिषदेचे वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी दाभोळकर हत्येप्रकरणी शरद कळसकर याला अटक करण्यात आली होती, त्याने दिलेल्या जबाबानुसार सीबीआयने पुनाळेकर व भावे यांना अटक...
मे 16, 2019
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले.  मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष ढुंबरे यांच्यावर...
मे 15, 2019
नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दिग्गज क्रिकेटपटूंविरुद्ध परस्परविरोधी हितसंबंधांच्या तक्रारीबाबत लोकपाल न्या. डी. के. जैन 20 मे रोजी पुढील सुनावणी घेतील. आज दोघे व्यक्तिशः उपस्थित राहिले; पण सुनावणीतून निर्णय होऊ शकला नाही. 20 तारखेला त्यांना व्यक्तिशः उपस्थित राहण्याची...
मे 14, 2019
पुणे - शहरात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण व्हेंटिलेटर असून, कडक उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या डॉक्‍टरांपुढे चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्‍टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सर्वसाधारणतः जून-...
मे 09, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वावर प्रश्नचिन्ह उभारणारी याचिका फेटाळली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे की, 'जर कोणती कंपनी एखादा फॉर्ममध्ये राहुल गांधी यांना ब्रिटीश नागरिक म्हणून उल्लेख करते, तर असे केल्याने ते खरंच ब्रिटीश नागरिक...
मे 08, 2019
आक्रा- घाना(वेस्ट अफ्रीका) : परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर करणारया 'महाराष्ट्र मंडळ घाना' तर्फे साजरा करण्यात आला 'महाराष्ट्र दिन' रविवार (ता. ६) आक्रा- घाना, वेस्ट अफ्रीका मध्ये सलग ५ व्या वर्षी प्रमुख पाहुणे उच्च आयुक्त भारतीय दूतावास वीरेंद्रसिंग यादव यांचे उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास...
मे 08, 2019
मुंबई - रेल्वेत तिकीट तपासनीस (टीसी) म्हणून नोकरी देतो, असे सांगत एका टोळीने मुंबईसह देशभरातील सुमारे 25 तरुण-तरुणींना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजेशकुमार, मनीष सिंग, संजीव राय आणि सीमा पवार या चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  ऐरोलीत राहणारा एक तरुण...
मे 05, 2019
नवी दिल्ली : हिंदी भाषक पट्ट्यात भाजपची कामगिरी निराशाजनक असल्याने मोदी सरकार लवकरच इतिहासजमा होणार असल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी आज केला. बिहारमध्येही सत्ताधारी "एनडीए'ला पराभूत करून विरोधकांचा विजय होईल, असा विश्‍वास त्यांनी आज व्यक्त केला. संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष असलेले शरद...
मे 02, 2019
मतदारसंघात तसे पाहिले, तर विधानसभेच्या सर्व जागा भाजप आणि शिवसेनेकडे आहेत; पण लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निकालानंतर कदाचित त्यांचा हुरूप वाढू शकतो. लोकसभा निवडणूक निकालाचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होईल, असा...
एप्रिल 30, 2019
पुणे : 'येणार साजन माझा' यासारखे गीत गाताना त्यातील लडीवाळपणा आवाजात जपत केलेला मुद्राभिनय आणि 'आली आली हो भागाबाई' सारखे भारूड सादर करताना ज्येष्ठांनी दाखविलेल्या उत्साहाला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. निमित्त होते इंदिरा भक्ती सुगम संगीत मंडळाने आयोजित केलेल्या सुगम संगीत कार्यक्रमाचे. 'झाला'...
एप्रिल 30, 2019
ऐरोली - माजी मंत्री गणेश नाईक यांनी आज (ता. २९) सकाळी सर्वांत आधी कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयात सहपरिवार जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी नाईक, मोठा मुलगा माजी खासदार संजीव नाईक, लहान मुलगा आमदार संदीप नाईक, पुतण्या माजी महापौर...
एप्रिल 25, 2019
पुणे : नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे 22 वर्षांपूर्वी विठ्ठल काटे यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे, असे प्रतिपादन लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी केले.  सहकारनगर बागूल उद्यान शाखेच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. संस्थापक...
एप्रिल 24, 2019
मिरा रोड - आज सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, सर्वोच्च न्यायालय आदी घटनात्मक संस्थांवर हल्ला झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...