एकूण 1498 परिणाम
December 03, 2020
नवापूर (नंदुरबार) : भाजपच्या अभ्यास वर्गात तुम्ही जे आत्मसात कराल, ते तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले, तर पुढच्या वेळी नवापूर तालुक्याचा आमदार भाजपचा असेल, असा विश्‍वास खासदार डॉ. हीना गावित यांनी व्यक्त केला.  विसरवाडी (ता. नवापूर) येथे भारतीय जनता पक्षाचे दोनदिवसीय तालुका...
December 03, 2020
निफाड (नाशिक) : निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड साखर कारखाना चालू गळीत हंगामात कार्यान्वित करण्याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून सकारात्मक कारवाई करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडचे उपोषणकर्ते खंडू बोडके यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिले. खंडू बोडकेंना...
December 03, 2020
अकोला : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत मंगळवारी (ता. १ डिसेंबर) जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी शिक्षक मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केल्यामुळे जिल्ह्यात ८४.३४ टक्के मतदान झाले. यावेळी ३ हजार ७४४ पुरूष शिक्षक व १ हजार ७२१ महिला...
December 03, 2020
पुणे - इंटरपोलवरून मिळालेल्या माहितीवरून पुणे पोलिसांनी ‘त्या’ बांगलादेशी महिलेचा शोध घेतला. तिची वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. तिला मायदेशी पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या; मात्र तेवढ्यात लॉकडाउन लागले आणि त्या हालचालींवर पाणी फिरले. अशा परिस्थितीतही पुणे...
December 03, 2020
नागपूर ः नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीचा निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार असून भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी आणि काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांचा फैसला होणार आहे. नागपूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असली तरी सर्वाधिक सुमारे एक लाख मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे...
December 03, 2020
पुणे - जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचे विभाजन करावे आणि या विभाजनातून प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करावी, अशी शिफारस पुणे जिल्हा परिषदेने बुधवारी (ता.2) विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी दोन नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत. यामुळे...
December 02, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या मतदानावेळी मंगळवारी (ता.1) येथील मतदान केंद्रातच थेट प्रवेश केल्यामुळे भाजपचे खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या विरोधात पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात...
December 02, 2020
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि कृष्णा-गोदावरीच्या तीरावर चित्रपटसृष्टी उभी करणारा महाराष्ट्र गंगा-यमुनेच्या किनाऱ्यावर आणि ताजमहालच्या पार्श्वभूमीवरही तीच कमाल दाखवेल... प्रिय योगी जी, मुंबईसारखी फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशात उभी करण्यासाठी आपण आवर्जून महाराष्ट्रात आलात, याबद्दल सर्वप्रथम आपले...
December 02, 2020
अमरावती:  ग्रामिण पोलिसांनी शहरातील अठरा दुचाकी जप्त केल्या असतानाही दुचाकीचोरीची श्रुंखला अद्याप थांबलेली नाही. पुन्हा पाच दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. राजापेठ हद्दीतील व्यापारी संकुलासमोर राहणाऱ्या अक्षय गजानन वडतकर (वय 27) या युवकाची एमएच 28 एक्‍स 4488 क्रमांकाची 18 हजार रुपयांची...
December 02, 2020
मनमाड (नाशिक) : महावितरण कंपनीत एसईबीसीला वगळून होणाऱ्या भरती प्रक्रियेविरोधात बुधवारी (ता.२) मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत उपकार्यकारी अभियंता संदीप शिंदे यांना निवेदन दिले. उपकेंद्र सहाय्यक पदासाठी एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना न्याय...
December 02, 2020
नवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात महाराष्ट्रातून सुमारे तीनशे शेतकरी सहभागी झाली आहेत. प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही असा पवित्रा घेऊन शेतकरी या...
December 02, 2020
जळगाव : जळगाव शहरातील रस्त्यांची वाट लागली असून काशिनाथ लॉज ते शेराचौक दरम्यानचा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाले आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केल्यावरही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.   रस्त्याच्या समस्या बाबत आज...
December 02, 2020
अकोला : केंद्रातील मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे सदर कायद्यांना स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यासोबत कृषी कायद्याची (विधेयकांची) प्रतिकात्मक होळी सुद्धा...
December 02, 2020
पिंपरी: कासारवाडी नदीपात्राजवळ लॉकडाउनपासून अनधिकृत बांधकामे सुसाट सुरू आहेत. नदीपात्रालगत भराव टाकून नदीचे पात्र बुजविण्याचा प्रकार सुरू असूनही "ह' क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई शून्य आहे. कासारवाडी रेल्वे स्थानक ते पिंपळेगुरव रस्त्यापर्यंत नदीपात्रालगत पत्राशेड, टोलेजंग हॉटेल व किरकोळ...
December 02, 2020
नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतदानात सकाळपासूनच मतदार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडी, अशी थेट लढत झाली. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिक आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास २० टक्के अधिक मतदान झाल्याने सर्वच उमेदवार धास्तावले...
December 02, 2020
मालेगाव (नाशिक) : शहरात विक्रीसाठी व गुन्हा करण्याच्या उद्देशाने आणण्यात आलेल्या 40 तलवारींचा साठा अपर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला. या प्रकरणी तिघा संशयीतांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. असा आहे प्रकार मुंबई - आग्रा महामार्गावरील मड्डे हाँटेलजवळ सोमवारी (ता. 1) सायंकाळी...
December 02, 2020
सातारा : कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे, तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नेले (ता. सातारा) येथे केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले...
December 02, 2020
नांदेड : गेल्या काही वर्षात सोशल मिडिया हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. बहुतांश सोशल मिडिया ग्रुपवरुन निष्फळ व बिनकामाचे संदेश, मुद्दे यावर भर दिला जातो. परंतु शहरातील एका व्हॉटस्ॲप ग्रुपने सामाजिक संवेदनशीलता जोपासत एका असहाय्य व आजारी कुटुंबासंदर्भातील ई- सकाळच्या वृत्ताची दखल...
December 02, 2020
पिंपरी : व्यवसायातील आर्थिक वादातून तरुणाचा खून केल्यानंतर तीन महिन्यापासून फरारी असलेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी उत्तरप्रदेश मधून अटक केली.  संदीप ऊर्फ घुंगरु लालजी कुमार (वय 21, रा. मु. जनी, पो. रामापुर, ता. ज्ञानपुर, जि. भदोही उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. - ...
December 02, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळी काल (मंगळवारी) सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी थेट मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पंढरपूर...