एकूण 2351 परिणाम
March 01, 2021
कोल्हापूर : शासनाने वृद्ध खेळाडूंना केवळ चार महिन्यांचे मानधन देऊन तोंडाला पाने पुसली. उर्वरित आठ महिन्यांचे मानधन खेळाडूंच्या हाती पडलेले नाही. ते कधी मिळणार, याचे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढत आहे. मानधन वेळेवर मिळण्यासाठी शासन ठोस निर्णय घेणार का, अशी विचारणा होत आहे....
March 01, 2021
रत्नागिरी :  जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्याने रत्नागिरी नावीन्यपूर्ण पर्यटन शहर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी शहराचे प्रवेशद्वार साळवी स्टॉप ते मांडवी किनारा या भागातील विविध ठिकाणांची पाहणी जे. जे. स्कूलच्या पथकाकडून केली. यासाठी शासनाकडून एक कोटी आणि पालिकेकडून निधी मंजूर केला आहे...
March 01, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. दीपक पवार यांच्या जागी कासेगाव येथील विजयसिंह देशमुख यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष बळिराम साठे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.  विजयसिंह देशमुख हे...
March 01, 2021
जालना : उद्योजक राजेश सोनी यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (ता.२८) पकडले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक कार ही जप्त केली आहे. उद्योजक राजेश सोनी यांचे ता.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता...
March 01, 2021
नगर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लिपिक वर्ग "क'च्या निवड परीक्षेसाठी बसलेल्या तोतया (डमी) परीक्षार्थींना रंगेहाथ पकडण्यात आले. तोतया, मूळ परीक्षार्थी व त्याला मदत करणारा, अशा तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही अटक करण्यात आली असून, हे तिघे जालना व औरंगाबाद...
February 28, 2021
कोल्हापूर :  सडोली दुमाला (ता. करवीर) येथे फुटबॉल खेळताना जवळून गेल्याच्या कारणावरून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  सडोली दुमाला येथे शनिवारी सायंकाळी फुटबॉल खेळताना जवळवून गेल्याच्या...
February 28, 2021
सोलापूर ः विसरू नका मराठीला, हिचा गोडवा अवीट आहे  माझ्यासाठी मराठी आहे नाणे, एक बाजू ती तर दुसरी मी आहे...तुझ्या स्वर्गाहुनी मला, माझी झोपडीच बरी, तिच्या काळजात नांदे, गाथा आणि ज्ञानेश्वरी.....या आणि अशा एकाहुन एक मराठी काव्यरचना सादर करुन शहरातील मान्यवर कवींनी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम साजरा...
February 28, 2021
ओरोस (सिंधुदुर्ग) : लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे.  16 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रूपयांची लाच घेताना हांगे यांना सकाळी रंगेहाथ पकडले होते. सातबारा नोंद...
February 28, 2021
पिंपरी - ‘महापालिकेने उद्योजकांना एलबीटीची बाकी नसलेली रक्कम व्याज व शास्ती दंडासह भरण्याच्या खोट्या नोटिसा पाठविल्या आहेत. सध्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, वाढलेला वीजदर, कामगार तुटवडा, कामाचे बिल वेळेवर न मिळणे आदी कारणांमुळे उद्योजक अगोदरच मेटाकुटीला आला आहे. त्यातच महापालिकेच्या...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अनेक दिवसांपासून खल सुरू आहेत. तरीही उमेदवारीचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी...
February 27, 2021
परभणी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संशयित मंत्र्यांना ठाकरे सरकार सोईस्कर रित्या पाठीशी घालत आहे. या प्रकरणी पोलिसांवरील दबाव  कमी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी (ता. २७) केली. पुजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच...
February 27, 2021
नगर : जिल्ह्यात 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडून 5 हजार 48 शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 27 लाख 84 हजार रुपयांचे अनुदान जिल्हा प्रशासनाला गुरुवारी (ता.25) प्राप्त झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप...
February 27, 2021
कोल्हापूर : क्रीडानगरी म्हणून जिल्ह्याचा गाजावाजा होत असला तरी विविध खेळांची एकत्रित माहिती उपलब्ध होणे तसे कठीणच. एखादा तालुक्‍यात कोणता खेळ सर्वाधिक खेळला जातो, तेथे मैदाने किती आहेत, दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था-संघटना कोणत्या, याची माहिती परप्रांतीय खेळाडूला हवी असल्यास ती मिळत नाही. यावर...
February 26, 2021
जामखेड: जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील ''आफूची शेती'' फुलली होती. जामखेड पोलिसांनी संबंधिताच्या शेतावर छापा घातला असता तेही अवाक झाले. पोतेच्या पोते भरून अफूची भोंडे पोलिसांनी जप्त केली.  तालुक्यात गांजाची चोरुन शेती करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यांचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे....
February 26, 2021
पारोळा : गुन्ह्यात आरोपी न करणे, तसेच जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदार व पोलिसपाटलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आवर्जून वाचा- धुळीचे प्रदूषण उठले नागरिकांच्या जिवावर; श्‍वसनाचे...
February 26, 2021
पांडे (सोलापूर) : करमाळा तालुक्‍याची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र 24 गावांत येते. परंतु कॅनॉलची व उपचारी यांची कामे अपूर्ण असल्यामुळे योजना कार्यान्वित होऊन तीन वर्षे झाली, तरीही लाभक्षेत्रांमधील हिसरे, अर्जुननगर आणि फिसरे या गावांना दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी अद्याप...
February 26, 2021
नागपूर : केंद्रीय राखीव पोलिस दलात कर्तव्यावर असलेल्या संदीप रामदास महाजन या ३९ वर्षीय जवानाने गुरुवारी (ता.२५) मृत्यूला कवटाळताना अवयवदानातून तिघांना जीवनदान देत समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. विशेष असे की, जळगाव येथील निपाणी गावातील संदीप हा शेतकरी पुत्र आहे. ...
February 25, 2021
वाई (जि. सातारा) : विनापरवाना सागवान लाकडांची वाहतूक करणाऱ्या एकावर दोन गुन्हे दाखल करून वन विभागाने 8 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्वप्नील प्रकाश बांदल (रा. मूळ अमृतवाडी, सध्या पाचवड ता. वाई) असे संशयिताचे नाव आहे.  वनविभागास मिळालेल्या माहितीवरून, ता. 20 रोजी वाई-जांभळी रस्त्यावरील...
February 25, 2021
लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील 'हॉटेल मॅजेस्टिक' या बड्या हॉटेलवर हवेलीच्या पोलिस उपविभागीय अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या पथकाने बुधवारी (ता.२४) रात्री छापा टाकला. यावेळी पोलिसांनी बेकायदा चालणारा हुक्का पार्लर उघड केला. या...
February 25, 2021
हिंगोली : विवाह सोहळ्यात किमान ५० लोकांना परवानगी दिली असताना गुरुवारी (ता.२५)  शहरात पार पडलेल्या साई मंगल कार्यालयात दीड हजार लोकांनी गर्दी केल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पथकाने साई मंगल कार्यालयाच्या मालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील खटकाळी...