एकूण 4615 परिणाम
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
मे 18, 2019
पातूर (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांवर उपचार करण्यत आले असून  त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम...
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359) मागून...
मे 18, 2019
मुंबई - मालेगाव बाँबस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर व अन्य सात आरोपी सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल विशेष न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. आरोपींनी आठवड्यातून एकदा सुनावणीला हजर राहावे, असा आदेश न्यायालयाने दिला. विशेष न्यायालयात मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी खटला सुरू आहे. प्रज्ञासिंह...
मे 17, 2019
सोलापूर : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नाले सफाईचे काम महापालिकेने शुक्रवारपासून सुरु केले. मान्सून जवळ आला असतानाही नालेसफाईचे काम सुरु न झाल्यासंदर्भात "सकाळ'मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, नालेसफाईचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, असे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी "सकाळ...
मे 17, 2019
चिपळूण - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वानेच पक्षविरोधी काम केल्याचे आरोप झाले. तशा तक्रारीही वरिष्ठांकडे करण्यात आल्या. दरम्यान, मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या टिळक भवनात १८ मे रोजी जिल्ह्यातील...
मे 16, 2019
सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्या विरुद्ध अखेर बारा संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. अचानक दाखल झालेल्या या अविश्वास प्रस्तावामुळे तालुक्यात एकच राजकीय खळबळ निर्माण झाली आहे....
मे 16, 2019
लातूर : शहरातील अनेक महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेत असताना वेगवेगळ्या माध्यमातून पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही लुट थांबण्यासाठी आणि प्रवेशातील पारदर्शकता वाढण्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रिया पुण्या-मुंबईप्रमाणेच लातूरातही केंद्रीय...
मे 16, 2019
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील महिला समाजकल्याण अधिकारी व लिपिकाला पाच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सुटीची अर्जित रजा मंजुरीसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई जिल्हा परिषदेत करण्यात आली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, मीना अशोक...
मे 16, 2019
खामगाव : शिवाजी नगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका ऑइल मिल मध्ये अक्षय तृतीयेला जुगार रेड मॅनेज झाल्याचे प्रकरण आता जिल्हा पोलीस मुख्यालया पर्यन्त पोहोचले असून वरिष्ठांनी या प्रकरणात चौकशी आदेश दिले आहेत. त्यामुळे चिरीमिरी करून प्रकरण रफादफा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अक्षय तृतीयेला जुगार खेळण्याची...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या नकाशावर नेऊया...
मे 15, 2019
नागपूर - भूमापन अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या अफरातफर आणि भ्रष्टाचाराचे पुरावे आणि व्हिडिओ क्‍लिप असल्याचे सांगून एका महिला भूमापन अधिकाऱ्याला तीन लाखांची खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा पदाधिकारी असल्याचे...
मे 14, 2019
खानापूर - लग्न आटोपून नंदगडला चाललेला वऱ्हाडाच्या टेंपोला खानापूरजवळ अपघात झाला. यात २५ हून अधिकजण जखमी झाले. ही घटना आज दुपारी घडली. काही जखमींना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींची नावे अशी - संजय केसरेकर (वय ३६), संदीप रेडेकर (...
मे 14, 2019
जळगाव : दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयाच्या आवारातील जुन्या विहिरीतून गाळ उपसताना मानवी कवटी व हाड आढळून आल्याने खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपात, आत्महत्या की मंत्रतंत्राचा हा प्रकार आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली.  पाणीटंचाईचा काळ असल्याने या विहिरीतील...
मे 14, 2019
बीड : नवगण राजुरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना शेतकरी आश्रुबा काळे (वय ९०) उभे राहिले. धनंजय मुंडेंचा संदर्भ देत हे वृद्ध ‘आमच्या धनूभाऊला मुख्यमंत्री करा’ असे शरद पवार यांना म्हणाले. यावर मुंडेंकडे स्मितहास्य करून ‘धनंजयला मुख्यमंत्री करून टाकू,’ असे उत्तर पवारांनी वृद्ध शेतकऱ्याला दिले....
मे 14, 2019
नवी मुंबई - मोठा उलवे येथील जिल्हा परिषदेची मराठी शाळा स्थलांतरित करण्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना आल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित ग्रामस्थांनी सोमवारी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. या वेळी शाळेसंदर्भातील प्रलंबित  मागण्या पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ...