एकूण 260 परिणाम
मे 23, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदारांचे वारसदार पुन्हा संसदेत पाठवून देण्याची किमया जिल्ह्यातील मतदारांनी केली आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मातब्बर उमेदवारांचा पराभव करून एकच धक्का दिला आहे.  प्रा. मंडलिक माजी खासदार सदाशिवराव...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर गडाच्या...
मे 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी आशा होती;...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे आपला पत्रव्यवहार चालू आहे,’’ अशी माहिती...
मे 15, 2019
पुणे - संभाजी महाराज यांच्या वेशातील छोटा संभाजी... मर्दानी खेळ... पालखीतील संभाजी राजेंची आकर्षक मूर्ती... वाद्यांचा ताल आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती,...
मे 14, 2019
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी अखिल भारतीय शिवमोहत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी मागणी केली होती. तसेच विविध संघटनांकडून मागणी होत आहे. ''ही रास्त असून आपण सर्वांनी एकत्र मिळून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण केले पाहिजे'', अशी प्रतिक्रिया...
मे 10, 2019
कोल्हापूर - यंदा दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात जल व्यवस्थापन, युद्धकलेचा थरार व पालखी सोहळा आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती...
मे 05, 2019
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथील नगरसेविका ज्योती गोसावी यांचे पती किशोर गोसावी यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगी विदुला, मुलगा युगंधर, आई-वडील आणि परिवार आहे. किशोर हे नगरसेविका ज्योती गोसावी यांचे पती होते.  ...
मे 03, 2019
कोल्हापूर - ‘पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, बांधकामाला कोण अडथळा आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी वेळ पडली तर काहीही करू,’ असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला. पुरातत्त्व विभागाने शिवाजी पुलाच्या बांधकामाला घेतलेल्या...
एप्रिल 17, 2019
केसनंद - ‘‘शिरूर मतदारसंघातील लढत ही राज्यात लक्षवेधी ठरत आहे. मतदारसंघातील माझे सर्व बंधू, आबालवृद्धांबरोबरच माझ्या साडेदहा लाख माता-भगिनीच येत्या २९ एप्रिल रोजी माझा खराखुरा राज्याभिषेक करतील,’’ असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. वाडेबोल्हाईपासून आज सकाळी सुरू...
एप्रिल 12, 2019
जळगाव : महापालिकेवर आणि राज्यातही भाजपची सत्ता आहे; परंतु त्यांचे अपूर्ण नियोजन आणि व्यवस्थेविषयी अर्धवट माहिती, यामुळे जळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. भाजपला सर्वसामान्य जनतेविषयी कोणतीही आपुलकी नाही, त्यामुळे जळगावकरांच्या समस्यांविषयी...
एप्रिल 12, 2019
पुणे -  ‘आयटी’त नोकरी करणारा हडपसरचा मतदार ते बैलगाडा शर्यतींसाठी हटून बसलेला शिरूर तालुक्‍यातला मतदार, अशा टोकाच्या अपेक्षांचा सामना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख उमेदवारांना करावा लागत आहे. एकीकडं तीनवेळच्या खासदारकीचा तगडा अनुभव असलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि दुसरीकडं नवखे;...
एप्रिल 05, 2019
शिरोली पुलाची -  खासदार राजू शेट्टी यांनी जातीचे राजकारण केले, त्यामुळेच शेतकरी संघटनेत फुट पडली, असा आरोप  कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला तसेच शेतकऱ्यांचे हित व विकासाचे राजकारण केले असते, तर आपण एकसंध असतो, असाही टोला श्री. खोत यांनी लगावला.   हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप...
मार्च 25, 2019
कोल्हापूर - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंड देशातील निर्वासितांना चार वर्षे आधार आणि आसरा दिलेले कोल्हापूर आहे तरी कसे?, हे पाहण्यासाठी पोलंडचे उच्चायुक्त डेमियन आयरझिक व राजदूत ॲडम बुरोकोस्की सोमवारपासून (ता. २५) दोन दिवस कोल्हापुरात आहेत.  ज्या ठिकाणी पोलंड निर्वासितांची छावणी होती, त्या वळिवडे...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी प्रकल्पांना गती...
मार्च 17, 2019
या ठिकाणी सांगू इच्छितो..., वावगं ठरणार नाही..., चुकीचं ठरणार नाही, आणि म्हणून..., खरंतर..., यासंबंधी..., खऱ्याअर्थाने...हे शब्द नेत्यांच्या तोंडून ऐकायला  मिळाले तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदारांच्या कानावर हे शब्द घोंघावणार आहेत.  दुग्धविकास राज्यमंत्री...
मार्च 01, 2019
महागाव - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे चित्र पहायला मिळते. परंतु छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाचे चित्र मात्र अद्याप कुठेच प्रकाशित झाले नव्हते. पहिल्यांदा असे चित्र संभाजीराजे यांच्या ३३८ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रकाशित केले. छत्रपती...
फेब्रुवारी 25, 2019
पाली - शिवाजी ट्रेल व शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान सुधागड यांच्या तर्फे रविवारी (ता.24) किल्ले सुधागड आणि सरसगडावर दुर्गमहापुजा करण्यात आली. यावेळी शहिदांना श्रद्धांजली देण्यात आली. शिवाजी ट्रेलच्या वतीने देशभराती 131 किल्ल्यांवर तसेच अमेरिका, ओमान, कॅनडा, सिंगापूर व दुबईतील किल्यांवर देखील हे...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली ः स्वातंत्र्यानंतर भारताची घोडचूक ठरलेल्या एका काश्‍मीर समस्येमध्ये देशाने एका युद्धात जेवढे मारले जातील त्यापेक्षा जास्त जवान गमावले आहेत. पुलवामातील ताजा भ्याड हल्ला म्हणजे "आता तर अति झाले' अशा प्रकारचा आहे. या कठीण काळात छत्रपती शिवरायांच्या रणनीतीची व आदर्शांची ज्योत मनामनांत...