एकूण 761 परिणाम
डिसेंबर 13, 2018
पणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर दोन दिवस धरणे आंदोलन केल्यानंतर आज जंतरमंतरवर मुक्काम हलविला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून अवलंबितांनी धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.  गोवा खाण...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी हे पद पक्षातून बाहेर पडलेले तारीक अन्वर यांच्याकडे होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची बाजू लोकसभेत मांडण्याची जबाबदारी आली आहे.  सुप्रिया सुळे या बारामती...
डिसेंबर 11, 2018
जयपूर- राजस्थानामध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थानची जनता दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलते, असा इतिहासही आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या राजस्थानमध्ये काँग्रेस 104 जागांवर पुढे असून, भाजप काँग्रेसच्या...
डिसेंबर 11, 2018
पणजी : खाण व खनिज विकास व नियंत्रण दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या सहाशे खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलिला मैदानावर आज सकाळी दहा वाजल्यापासून धरणे आंदोलनास प्रारंभ केला. गोवा खाण लोकमंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनासाठी शुक्रवारपासून गोव्यातून...
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 03, 2018
अर्थव्यवस्था आणि तिचे व्यवस्थापन हे राजकारणमुक्त असणे कधीही चांगले. केवळ  निवडणुकीत मतांचा फायदा मिळविण्यासाठी आकडेवारीचे राजकारण करणे हानिकारक असते. स्वतःचा सदरा अधिक शुभ्र असल्याचे जरूर दाखवावे, पण त्यासाठी इतरांचे सदरे मळविण्याचा अट्टहास हे गैर आहे. ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ एका...
नोव्हेंबर 29, 2018
नाशिक - नाशिक जिल्ह्यात 20 आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावातील 1 हजार 336 पैकी 38 कामे पूर्ण झालीत. 93 गावांत काम सुरू आहे. ग्रामविकास विभागाच्या थंड कारभारामुळे 1 हजार 205 कामे बासनात आहेत. आदर्श गावांच्या कामांचे आराखडे तयार करण्यासाठी पन्नास हजारांच्या उधळपट्टीनंतरही लालफितीचा कारभार थांबायला...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेस पक्षासंदर्भात केलेल्या एका वक्‍तव्याने विधानसभेत एकच गदारोळ झाला. कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य या वेळी आक्रमक झाले. पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील अध्यक्षांच्या डायसवर चढून गेले होते. वसंत चव्हाण यांनी...
नोव्हेंबर 28, 2018
नाशिक - शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी संसद घेराव आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीतर्फे हजारो शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत....
नोव्हेंबर 28, 2018
बांगलादेशातील आगामी निवडणूक जिंकून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची अवामी लीग विजयाची हॅटट्रिक करेल अशी चर्चा आहे. पण ‘बीएनपी’ने विरोधी पक्षांची आघाडी उभारून आव्हान दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दु सऱ्या महायुद्धानंतर आशियात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आज दक्षिण आशियातील जवळजवळ सर्व...
नोव्हेंबर 26, 2018
"आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस: सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा; व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे झाल्यानंतरही ‘नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड’ (नॅटग्रीड) हा दहशतवादविरोधातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या अखेरच्या तीन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पाची रखडपट्टी तर झालीच, परंतु मोदी सरकारच्या कारकिर्दीतही या प्रकल्पाला...
नोव्हेंबर 26, 2018
काश्‍मीरमध्ये राजकीय कुरघोडीचा जो खेळ झाला त्याचे परिणाम सर्वांनाच माहिती होते. ना भाजपपुरस्कृत सरकार टिकले असते, ना तीन पक्षांचे कडबोळे सरकार स्थिर राहिले असते. प्रत्येकाचा एक ‘राजकीय अजेंडा’ होता व तो पूर्ण करण्यासाठी हा खेळ करण्यात आला.  काश्‍मीरची कहाणी म्हणजे एक ‘थ्रिलर’च आहे. रोमहर्षक,...
नोव्हेंबर 25, 2018
आपल्याकडं ग्रामीण भागात एक म्हण आहे, "सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली'. "ब्रेक्‍झिट'चा निर्णय जल्लोषात घेणाऱ्या ब्रिटिशांना याची प्रचीती यायला लागली आहे. ज्यासाठी युरोपीय संघासोबत काडीमोड घ्यायचा निर्णय ब्रिटननं घेतला, त्यातलं काही साध्य होताना दिसत नाही. ता. 29 मार्चला ब्रिटन वेगळा होईल...
नोव्हेंबर 19, 2018
नवी दिल्ली : आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांची - मग तो वरिष्ठ असो वा कनिष्ठ - अतिशय बारकाईने काळजी घेणे, ही भारताच्या पोलादी नेत्या इंदिरा गांधी यांची खासियत होती. सामान्यातल्या सामान्यांबरोबर तत्काळ तार जुळविण्याची विलक्षण कला त्यांच्या अंगी होती आणि हे त्यांचे वैशिष्ट्यच त्यांच्या...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा - स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. उलट आपली भाषा आणि वर्तन सुधारावे अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा तालुका शिवसेनाप्रमुख येताळा भगत यांनी दिला. दोन दिवसापूर्वी खासदार राजू शेट्टी व भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष तानाजी...
नोव्हेंबर 14, 2018
श्रीलंका हा हिंदी महासागरातील छोटासा बेटांचा देश. दक्षिण आशियात भारतानंतर लोकशाही प्रगल्भतेने राबविणारा देश म्हणून श्रीलंकेची ख्याती सर्वश्रुत आहे. दुर्दैवाने याच देशात लोकशाहीचे धिंडवडे कशा प्रकारे निघत आहेत, याची प्रचिती गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगासमोर येत आहे. मिळालेली सत्ता काहीही...
नोव्हेंबर 04, 2018
श्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची औपचारिकताही पुरी न करता विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदावरून केलेली उचलबांगडी ही त्या देशातल्या संसदीय आणि न्यायालयीन लढाईला तोंड फोडणारी आहे. तिथं आता एकाच...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : राफेल प्रकरणात सरकारला कोणतीही संधी मिळू द्यायची नाही, यासाठी आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी आज नवा खुलासा करताना डसॉल्ट कंपनीने अनिल अंबानींना 284 कोटी रुपये का दिले? असा सवाल केला. तसेच, याच रकमेतून अंबानींनी जमीन खरेदी केल्याचाही आरोप राहुल यांनी केला. सीबीआय प्रमुखांना पदावरून...