एकूण 113 परिणाम
January 24, 2021
नेर्ले (जि. सांगली) : निसर्गाला उद्‌ध्वस्त करणारी प्रदूषणकारी व्यवस्था मोडून नवी व्यवस्था आणावी लागेल त्यासाठी श्रमिक मुक्ती दल सातत्याने प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन कासेगाव (ता. वाळवा) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी अध्यक्ष डॉ. भारत...
January 22, 2021
ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नी प्रशासनाने सकारात्मक पाऊल टाकल्याने धरणग्रस्तांमध्ये पुनर्वसनाबाबत विश्वास वाढला आहे. त्याला तडा जाऊ न देण्याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी आणि पावसाळ्यापूर्वी धरणग्रस्तांचे निवारे उभे राहण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे आवाहन...
January 21, 2021
सातारा : श्रमिक मुक्ती दलाचे 33 वे अधिवेशन शनिवारी (ता. 23) व रविवारी (ता. 24) कासेगाव (जि. सांगली) येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन आणि प्रबोधन संस्थेत होणार आहे.  कोरोना महामारीने आरोग्य, रोजगार, उद्योग, एकंदर अर्थव्यवस्था अशा क्षेत्रांवर विपरित परिणाम केले आहेत....
January 19, 2021
वैभववाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील बारा ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतीवर भाजपने तर 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले. भाजपच्या ताब्यातील दोन ग्रामपंचायती शिवसेनेने मिळविल्या तर शिवसेनेच्या ताब्यातील एका ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा मिळविला. आर्चिणेमध्ये एक जागेसाठी दोन उमेदवारांना समान...
January 18, 2021
आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ९२.२८ टक्के मतदान झाले होते. आज मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. बिनविरोध तीन ग्रामपंचायतींसह ४१  ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र पक्षांच्या नेतृत्वाखालील...
January 18, 2021
मालवण (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत शिवसेनेचा धुव्वा उडविला. शिवसेनेला केवळ एकाच ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मात देत घवघवीत यश मिळविले. तालुक्यातील सहा...
January 18, 2021
पाटण (सातारा) : सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य (ता. 15) जानेवारीला मतपेटीत बंद...
January 18, 2021
वाळवा (जि. सांगली) : तब्बल तीन दशके न्यायापासून वंचित चांदोली बुद्रुकच्या 84 कुटुंबाना आज न्याय मिळाला. चांदोली धरण आणि अभयारण्य ग्रस्त संग्राम संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आज या कुटुंबाना तब्बल 84 लाख बारा हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळाला. संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या हस्ते बहादूरवाडी (ता....
January 17, 2021
गुहागर (रत्नागिरी) : नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातल्याचे आढळले. पहिल्या घरट्यातील १२३ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. निसर्ग वादळ, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्‍चिमेकडील समुद्रात निर्माण झालेली वादळजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे ऑलिव्ह रिडले...
January 14, 2021
नागपूर:  अठराव्या शतकातील सर्वात रक्तरंजीत युध्द हरयाणातील पानिपतावर लढल्या गेले. अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात १४ जानेवारी १७६१ रोजी भीषण रणसंग्राम झाला. दोन्ही बाजूंनी मोठा संहार झाला. या युध्दात दिल्लीच्या रक्षणासाठी पानिपतावर लढता लढता देह ठेवलेल्या दोनशेपेक्षा जास्त...
January 14, 2021
नागपूर : बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शहरातील नायलॉन मांजामुळे होणाऱ्या घटनांची न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. ॲड. देवेंद्र चौहान यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली असून गुरुवारी सुनावणी आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर केला...
January 12, 2021
मल्हारपेठ (जि. सातारा) : विभागातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई-पाटणकर गटांतच कॉंटे की टक्कर सुरू आहे. मंद्रुळहवेली आणि ठोमसेत जोरदार लढत होत असून, ठोमसेत एक जागा बिनविरोध करत पाटणकर गटाने विजयाचे खाते खोलले आहे. सहा जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, तर मंद्रुळहवेलीतही...
January 12, 2021
चाफळ (जि. सातारा) : विभागातील आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने होत आहेत, तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पाटणकर-देसाई गटांकडून मोर्चेबांधणी सुरू असून, त्यांच्यात कडवी झुंज आहे. आठपैकी पाच ग्रामपंचायतींवर देसाई गटाची तर तीन ग्रामपंचायतींवर पाटणकर...
January 12, 2021
पाटण (जि. सातारा) : चोपडी, मुळगाव व त्रिपुडी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत देसाई-पाटणकर असा चुरशीचा सामना रंगतदार होणार आहे. कवरवाडी ग्रामपंचायतीची बिनविरोधची दिंडी लक्ष वेधून घेत आहे. मात्र, चोपडी व मुळगावात देसाई गटांर्गत मतभेदाचा अचूक फायदा राष्ट्रवादीने उचलला तर सत्तांतर...
January 11, 2021
पावस (रत्नागिरी) : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोकणातल्या स्पर्धकांनी आपला ठसा उमटवला. प्राजक्ता काकतकर (ठाणे) हीने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. तन्वी मोरे (रत्नागिरी) आणि महेंद्र मराठे (सिंधुदुर्ग)...
January 11, 2021
पाटण (जि. सातारा) : चोपडी, मुळगाव व त्रिपुडी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) - युवा नेते सत्यजीत पाटणकर या दाेन गटातच चुरशीचा सामना रंगतदार होणार आहे. कवरवाडी ग्रामपंचायतीची (Gram Panchayat Election) बिनविरोधची दिंडी लक्ष वेधून घेत...
January 09, 2021
विसापूर (जि. सातारा) : केंद्राचे अन्यायी कृषी विधेयक मागे घेऊन महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच्या तत्त्वावर नवे कृषी धोरण अवलंबले पाहिजे, यासाठी श्रमिक मुक्ती दलाने महात्मा फुले यांच्या मूळ गावी कटगुण येथे आज ठिय्या आंदोलन केले.  या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष...
January 08, 2021
चिपळूण : शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या पोटात गॉज पॅड राहिल्याची घटना समोर आहे आहे. याघटनेचा मानसिक त्रास आणि उपचारासाठी झालेला लाखो रुपयांचा खर्च, या प्रकरणात पेढांबे येथील संजय मधुकर शिंदे यांचा तक्रार अर्ज बुधवारी मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या जनता दरबारात दाखल झाला. खुद्द आरोग्यमंत्री राजेश...
January 08, 2021
मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील मोरणा विभागातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर दुरंगी लढत होणार आहे. त्यामध्ये देसाई गट विरुद्ध पाटणकर गट असाच संघर्ष पाहण्यास मिळत आहे. शैलक्‍या भाषेतील टीका आणि एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या चर्चा चौकाचौकांत सुरू आहेत. ग्रामपंचायचत...
January 07, 2021
मुंबई: कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्ये साधारणतः खोकला, ताप, अंगदुखी, मेंदूविकार, थकवा जाणवणं आणि श्वास घेण्यास अडचणी येणं अशी लक्षणे दिसून येतात.  अतिसार, अपचनाची समस्या, यकृताची सूज, रक्तातील सारखेचं प्रमाण कमी होणं आणि स्वादुपिंडातील समस्या उद्भवू लागल्या आहेत. मात्र, पोस्ट कोविड रूग्णांमध्ये...