एकूण 826 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : सेव्हन हिल्स रुग्णालयाला मरोळ भाडेतत्त्वावर दिलेला मरोळ येथील भूखंड परत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सेव्हन हिल्सने कराराचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. काही वर्षांपासून हे प्रकरण न्याप्रविष्ठ होते. शनिवारी (ता. 16) सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पालिकेच्या बाजूने...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते कुसगावदरम्यान दोन टप्प्यांत बांधण्यात येणाऱ्या बोगद्यासाठी तब्बल पाच हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. ही झाडे कापल्यानंतर नव्याने 48 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला. त्यांना २ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; मात्र उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करताना अजूनही सुरक्षितता वाटत नाही, असे खडे बोल आज मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला सुनावले. महिलांच्या रेल्वे डब्यात तैनात असलेल्या पोलिस हवालदारांना मोबाईल...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाचे शुल्क भरण्याचे आदेश आणि दुसऱ्या तिमाहीतील प्रचंड तोट्यामुळे खचलेल्या १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना ‘व्होडाफोन आयडिया’चे व्यवस्थापकीय संचाकल रविंदर टक्कार यांनी शुक्रवारी (ता.१५) व्हिडीओ कॉलिंगद्वारे धीर दिला. दरम्यान, शुल्क भरण्याच्यादृष्टीने कंपनीने...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; मात्र उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांना महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करताना अजूनही सुरक्षितता वाटत नाही, असे खडे बोल आज मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला सुनावले. महिलांच्या रेल्वे डब्यात तैनात असलेल्या पोलिस हवालदारांना मोबाईल...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. रस्त्यांची अशीच परिस्थिती संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे, परमजीत कलसी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करीत दोष उत्तरदायित्व वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. उच्च...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : "घराला घरपण देणारी माणसं' अशी जाहिरात करणाऱ्या डीएसके कंपनीने स्वतःच्याच घरात भाड्याने राहण्यासाठी केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. याबाबत अपील न्यायाधीकरणाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजनेद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : भिवंडी तालुक्‍यामध्ये सर्रासपणे होत असलेल्या बेकायदा बांधकामांची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून खुलासा करण्यासाठी महसूल विभागाच्या सचिवांना पुढील सुनावणीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भिवंडीमधील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आलेली आहेत. याबाबत...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले विचारवंत गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामिनाबाबत तातडीने कोणताही दिलासा मिळाला नाही. पुणे पोलिसांनी नवलखा यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला असून या प्रकरणात त्यांना अटक होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी...
नोव्हेंबर 15, 2019
पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. त्यांना दोन नोव्हेंबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा यापुढे आनंद तेलतुंबडे आणि नवलाखा यांच्या अटकपूर्व जामीन...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतलेल्या  शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नव्या संभाव्य आघाडीने किमान समान कार्यक्रमाच्या आखणीसाठी कंबर कसली आहे. शेतकरी कर्जमाफी व बेरोजगारीच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्यक्रम मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आज या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणातील आरोपी बॅंकेचे माजी अध्यक्ष, आमदार सुनील केदार यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना आरोपाचे विवरण सुपूर्द केले. प्रकरण तातडीने निकाली...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे : तत्कालीन राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली मुदतवाढ वैध असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. ही मुदतवाढ बेकायदेशीर असल्याने ती रद्द करावी आणि या पदाधिकारी निवडी त्वरित...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : अपंग व्यक्तींच्या हक्क आणि विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना संवेदनशील करण्याची आवश्‍यकता आहे, त्यासाठी राज्य सरकारने प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करायला हव्यात, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अपंग व्यक्तींसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत...
नोव्हेंबर 14, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत एमआयडीसीमधील महापे ते मुकुंद कंपनीपर्यंतच्या रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम करण्यात येत आहे. यात महापेपासून रबाळेपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, रबाळेपासून मुकुंद कंपनी पर्यंतच्या रस्त्यांचे काम मागील चार...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई - तळोजा एमआयडीसी परिसरातील ९०० पैकी प्रदूषणकर्त्या ३२४ कंपन्यांकडून १८ कोटी रुपये तीन महिन्यांत वसूल करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ला दिले आहेत. तोपर्यंत या कंपन्यांचे पाणी कापण्याच्या आदेशापासून दिलासा देण्यासही न्यायालयाने नकार दिला. तळोजा...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री कार्यालय संपुष्टात आले असून, प्रशासकीय कामकाज राज्यपालांच्या सल्लागारांच्या निर्देशानुसार चालणार आहे. राज्यपालांच्या सल्लागारांकडे प्रशासकीय नियंत्रण जाणार आहे. यामुळे नोकरशाहीची जबाबदारी आणखी वाढली आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : भारतातील एक महत्त्वाची दूरसंचार कंपनी म्हणून व्होडाफोनकडे पहिलं जातं. आता लवकरच व्होडाफोन भारतातून गाशा गुंडाळणार असल्याची माहिती आता समोर येतेय. सरकार ऑपरेटरवर लादत असलेला अधिक कर आणि शुल्क यामुळे कंपनीच्या भारतातील भविष्याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय. खुद्द कंपनीचे अधिकारी निक रीड यांनी...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - नागपूरसह पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर, या पाचही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचा आदेशही राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे.   या आदेशानुसार राज्य सरकारने या जिल्हा परिषदांच्या गट...