एकूण 8494 परिणाम
एप्रिल 04, 2017
कोल्हापूर - देशी-विदेशी दारू दुकाने, बार, परमिट रूम व वाइन शॉपी यांना परवाना द्यायचा धडाका राज्य उत्पादन शुल्क विभागानेच लावला आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईचा भारही याच विभागावर आला. बार, दारू दुकान व वाइन शॉपी याचा अतिरेक जरूर झाला होता. पण महसुलाचे साधन म्हणून या अतिरेकाकडे...
एप्रिल 04, 2017
नाशिक - गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये नोटाबंदीच्या काळात बनावट नोटा छपाई प्रकरणातील मुख्य सूत्रधार छबू नागरे याला आज मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. नागरे याच्यासह 11 जणांना गेल्या 23 डिसेंबर 2016 रोजी एक कोटी 35 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक करण्यात आली होती...
एप्रिल 04, 2017
नागपूर - नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरून तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठाशी संलग्न रामलाल आनंद महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक प्रो. जी. एन. साईबाबा यांच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिर्की, पांडू नरोटे, विजयी तिर्की यांनी...
एप्रिल 04, 2017
मुंबई - कथित गुन्हेगार जमातींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी ब्रिटिश काळापासून राखीव असलेल्या सोलापूरमधील जमिनीबाबत राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 3) दिले.  या जमातींच्या पुनर्वसनाबाबतच्या मागण्यांचाही...
एप्रिल 04, 2017
सातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग आणि राज्य मार्गालगतची दारू दुकाने बंद झाल्यानंतर त्याच परिसरात बेकायेदशीर दारूविक्री करणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी आज अटक केली.  महामार्ग आणि राज्य मार्गालगत असणारी दारू दुकाने आणि बिअरबार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते....
एप्रिल 03, 2017
नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या दिल्लीतील महरौली भागातील फार्महाउसवर आज सक्तवसुली संचालनालयाने जप्ती आणली. या फार्महाउसची किंमत सुमारे 27 कोटी रुपये इतकी आहे. हे फार्महाउस त्यांच्या मुलाच्या कंपनीच्या मेपल डेस्टिनेशन अँड ड्रीमबिल्डच्या नावावर...
एप्रिल 03, 2017
मुंबई - वाढते रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनासह केंद्र, राज्य सरकार, महापालिका आणि सामाजिक संस्थांनीही प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत आणि प्रसिद्धिमाध्यमांद्वारे मोहीम सुरू करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.  रेल्वे मार्गावरील वाढते अपघात ही चिंताजनक बाब...
एप्रिल 03, 2017
सांगली - राज्यातील बहुतांश सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांतील सर्व खातेदारांची केवायसी तपासणी करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने नाबार्डला दिले आहेत. नाबार्डचे पथक तपासणीसाठी सांगलीत सहा एप्रिलला येणार आहे. नोटाबंदीच्या काळात ५००, १००० रुपयांच्या नोटा भरणाऱ्या सर्व खात्यांचीही तपासणी केली जाणार आहे...
एप्रिल 02, 2017
नवी दिल्ली - खासदारांना दुसऱ्या क्षेत्रात काम करण्यास अटकाव करावा, अशा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्याने केलेली मागणी योग्य असली, तरी हे प्रकरण न्याय व्यवस्थेच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश जे. एस. खेहर...
एप्रिल 02, 2017
अलाहाबाद : "तंत्रज्ञानाने न्याय व्यवस्था अधिक सक्षम बनेल, तसेच पैसा आणि वेळ वाचेल. तंत्रज्ञानाच्या साह्याने न्यायालयीन कामकाजदेखील सोपे करता येऊ शकेल," असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत...
एप्रिल 02, 2017
खेड - महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आज खेड तालुक्‍यातील एक वाइन शॉप, 22 परमिट रूम, 6 बीअर शॉपी व 5 देशी दारू दुकाने उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सील केली. ही कारवाई सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. खेड तालुक्‍...
एप्रिल 02, 2017
नगर  - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 500 मीटरपर्यंत असलेली दारूची दुकाने आज बंद करण्यात आली. जिल्ह्यातील 825 पैकी 700 बीअर बार व परमिट रूम बंद झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली. मद्यपी चालकांमुळे अपघात वाढल्याने...
एप्रिल 02, 2017
मुंबई - राज्यभरातील अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकांच्या समन्वयाने ठोस धोरण तयार करण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये अनधिकृत बांधकामे निर्माण होत आहेत. या पार्श्‍...
एप्रिल 02, 2017
मुंबई - पुण्यातील हिंजवडी येथील सॉफ्टवेअर तरुणीच्या हत्याप्रकरणातील आरोपी भावेन सैकियाने पुणे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. पुण्यात इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या रसिला हिची भावेनबरोबर शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशाराही तिने दिला...
एप्रिल 02, 2017
मुंबई - बत्तीस शिराळ्याचा हा नागपंचमीचा सण "कम्युनिटी रिझर्व्ह' करून तो संरक्षित करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी याबाबत सरकारचे लक्ष वेधले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपंचमीचा हा सण...
एप्रिल 02, 2017
मुंबई - बेकायदा बांधकामांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकांच्या समन्वयाने ठोस धोरण तयार करण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच केली. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. त्यांना प्रतिबंध...
एप्रिल 02, 2017
पिंपरी - राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार शनिवारपासून (ता. १) पिंपरी-चिंचवड शहरातील १९८ दारूची दुकाने सील करून बंद करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. अनेक वाहनचालक दारू पिऊन वाहने...
एप्रिल 02, 2017
नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आजपासून शहर व जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील, तसेच महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत येणाऱ्या सर्व देशी, विदेशी दारू दुकानांसह बिअर बार आणि हॉटेल बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आजपासून त्याचा कडक अंमल सुरू झाला. उद्याही सील...
एप्रिल 02, 2017
जळगाव - देशभरात बहुचर्चित "सिमी'च्या (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) खटल्यात जिल्हा न्यायालयाने आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा. जळगाव) या दोन्ही आरोपींना शनिवारी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड ठोठावला. फौजदारी कटकारस्थान 120 (ब) या कलमान्वये शुक्रवारी न्या...
एप्रिल 02, 2017
परवाना नूतनीकरण जूनपर्यंतचा असल्याने तूर्त कारवाई टळणार बेळगाव - कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावरील बार व मद्यविक्रीच्या दुकानांना जूनपर्यंत दिलासा मिळाला आहे. कर्नाटकात जून ते जून असा परवाना नूतनीकरणाचा कालावधी असून, आणखी तीन महिने तरी कारवाई होणार नसल्याचे सूतोवाच उत्पादन शुल्क विभागाने...