एकूण 1504 परिणाम
फेब्रुवारी 02, 2017
बिहार - मुजफ्फरपुरमध्ये 2014 मध्ये रोगाची साथ पसरुन 122 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे रहस्यमयी मत्यूचे सत्र सुरुच आहे. मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे होत आहे समजू शकले नव्हते . स्थानिक लोक या रोगाला 'चमकी' म्हणतात एवढीच या रोगाबद्दल माहिती उपलब्ध होती. आता मात्र या प्रकरणाने एक...
फेब्रुवारी 01, 2017
देवास - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी हत्याप्रकरणातून देवास येथील न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर, वासुदेव परमार आणि आनंद राज कटारिया यांच्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र कुमार वर्मा यांनी कलम 120 (बी) (...
जानेवारी 31, 2017
भारतानेही अमेरिकेप्रमाणे प्रवेशबंदी करावी बुलंदशहर- "राम हे अस्मितेचे प्रतीक असून, उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार बनल्यास एक वर्षाच्या आत राम मंदीर बांधून तयार होईल," असे प्रतिपादन भाजपचे खासदार आणि गोरक्षपीठाचे महंत योगी आदित्यनाथ यांनी केले. आदित्यनाथ म्हणाले, "देशात आता असे वातावरण...
जानेवारी 30, 2017
नवी दिल्ली - स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापु याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) फेटाळून लावला. याचबरोबर, अर्जास खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्याबद्दल आसाराम याच्याविरोधात नवीन प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले. कोणतेही गंभीर कारण...
जानेवारी 28, 2017
ओ. पनीरसेल्वम; लवकरच कारवाईचे आश्‍वासन चेन्नई: जलिकट्टूप्रकरणी मरिना सुमद्र किनाऱ्यावर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला असून, त्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन आज मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी दिले आहे. आंदोलकांवर झालेल्या...
जानेवारी 27, 2017
भुवनेश्वर (ओडिशा)- येथील एका युवकाने तृतीयपंथीयाशी विवाह केला असून, विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बसुदेव नायक या युवकाने मेघना या तृतीयपंथीयाशी हिंदू परंपरेनुसार विवाह केला. नयापल्ली भागातील दुर्गा मंडपात हा विवाह झाला. विवाह सोहळ्यावेळी प्रसारमाध्यमांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती....
जानेवारी 26, 2017
चेन्नई: तमिळनाडूत जलिकट्टूला परवानगी देणाऱ्या नवीन विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या संदर्भात प्राणी कल्याण मंडळ आणि प्राणी हक्क संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला याचिकेवर लवकर सुनावणी करण्याची मागणी...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली- देशभरात पोलिसांची पाच लाख पदे रिक्त असून, याबाबत चार आठवड्यांत सर्व स्तरातील रिक्त जागांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांच्या गृहसचिवांना दिले. हा फार गंभीर विषय असून जी राज्ये याबाबतची माहिती सादर करणारी नाहीत त्यांच्या गृहसचिवांना समन्स बजावू...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली : गैरव्यवहार किंवा गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात अडकलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुढे न्यायालयाने निर्दोष मुक्त केले तर त्यांना पदोन्नती मिळू शकते. यासंबंधीचा खटला जर वरिष्ठ न्यायालयामध्ये सुरू असला तरीदेखील त्याचा या पदोन्नतीवर आता परिणाम होणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. कार्मिक...
जानेवारी 24, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासनासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमधील सदस्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकार व बीसीसीआयने बंद पाकिटाच्या माध्यमामधून करावी, असे निर्देश आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय...
जानेवारी 24, 2017
चेन्नई - तमिळनाडुमधील जल्लिकट्टू या बैलांच्या पारंपारिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाकडून घालण्यात आलेल्या बंदीस ठाम विरोध केलेले प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी आपला सर्व प्रकारच्या बंदींस विरोध असल्याचे आज (मंगळवार) स्पष्ट केले. जल्लिकट्टू असो; वा माझे चित्रपट, माझा कोणत्याही प्रकारच्या बंदीस विरोधच...
जानेवारी 23, 2017
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अर्थसंकल्प पुढे ढकलण्याबाबतीतील याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आता केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच सादर होण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. चार...
जानेवारी 23, 2017
नवी दिल्ली : गया जिल्ह्यातील 1992 रोजी झालेल्या सामूहिक हत्याकांड प्रकरणातील चार आरोपींना आज नववर्षानिमित्त राष्ट्रपतींकडून दिलासा मिळाला. राष्ट्रपतींनी चौघांची फाशीची शिक्षा रद्द करत शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. विशेष म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाने या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करू नये,...
जानेवारी 23, 2017
नवी दिल्ली / बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (ता. 23) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत साक्षी, पुराव्यांचे सादरीकरण होण्याची शक्‍यता आहे. सीमाप्रश्‍न निर्णायक वळणावर आल्यामुळे न्यायालयीन कामकाजाला गती आली आहे. याआधी 11 जुलै रोजी सीमाप्रश्‍नी सुनावणी...
जानेवारी 22, 2017
चेन्नई - जलिकट्टूच्या अध्यादेशाला तमिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी मंजुरी दिली. त्यानुसार आता तमिळनाडूत तीन वर्षांनंतर जलिकट्टूचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला. आज (रविवार) तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे जलिकट्टू खेळाचे उद्‌घाटन करणार आहेत. दरम्यान, जलिकट्टूवरील बंदीच्या...
जानेवारी 19, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदी मोहिमेद्वारे बॅंकांमध्ये किती पैसे जमा झाले याचे तपशील रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज अर्थ मंत्रालयाशी संलग्न संसदीय स्थायी समितीसमोर सादर करू शकले नाहीत. यामुळे समितीमधील काही सदस्यांच्या टीकेचे ते धनी झाले. मात्र, आतापर्यंत 9.2 लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात...
जानेवारी 18, 2017
चेन्नई - तमिळनाडू राज्याची राजधानी असलेल्या चेन्नई शहरामध्ये आज (बुधवार) हजारो आंदोलकांनी जल्लिकट्टु खेळासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आंदोलनास प्रारंभ केला. आंदोलकांमध्ये विद्यार्थी व तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. तमिळनाडुमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या जल्लिकट्टु या...
जानेवारी 18, 2017
जोधपूर - अभिनेता सलमान खान याच्यावर 18 वर्षांपासून सुरु असलेल्या बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणातून आज (बुधवार) जोधपूर सत्र न्यायालयाकडून दोषमुक्त ठरविण्यात आले आहे. या निर्णयामुळे सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे.  मुख्य न्यायदंडाधिकारी दलप्रीतसिंह राजपुरोहित यांनी आज या प्रकरणी...
जानेवारी 18, 2017
नवी दिल्ली : 'गंगा शुद्धीकरणाच्या मोहिमेची सद्यस्थिती काय आहे,' अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने काल (मंगळवार) केली. या मोहिमेत आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.  या प्रकरणी 1985 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सद्यस्थितीचा अहवाल...
जानेवारी 18, 2017
सिवान: तुरुंगातून सेल्फी व्हायरल झाल्याप्रकरणी मंगळवारी माजी खासदार शहाबुद्दीन आणि अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने तक्रार दिली होती. बिहारच्या सिवान तुरुंगात असलेला राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार मोहंमद शहाबुद्दीन याच्यासमोरील अडचणी कमी होण्याची चिन्हे...