एकूण 1343 परिणाम
मार्च 17, 2019
राजस्थानात जे जुने राजवाडे आहेत ते आता ‘स्टार हॉटेल’मध्ये रूपांतरित झालेले आहेत. त्यामुळे तिथलं जेवणही राजेशाही पद्धतीचंच असतं. शिवाय, तिथं मारवाडी संस्कृती असल्यामुळे श्रीमंत अशी एक खाद्यसंस्कृती तिथं तयार झालेली आहे. तिथल्या विविध प्रेक्षणीय स्थळांबरोबरच ही श्रीमंत खाद्यसंस्कृती हे या राज्याचं...
मार्च 17, 2019
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येते दीड-दोन महिने प्रचाराची रणधुमाळी उडेल.सरकारनं दिलेली आश्वासनं किती प्रमाणात प्रत्यक्षात आली, याचा जमा-खर्च मांडण्याचाही हाच काळ आहे. हा हिशेब मतदार करतीलच. यासंदर्भात या निवडणुकीत काही मुद्दे पणाला लागणार आहेत. शेतीतली दुरवस्था, बेरोजगारीचं वाढतं संकट,...
मार्च 17, 2019
ज्या मुहूर्तावर शिवी हे ‘शुभवचन’ मानले जाते, अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक होळीचा मुहूर्त! आजमितीस (मध्यमवर्गीय) मराठी माणसे क्‍यालिंडरवाल्यांचे ऐकून निराळेच साडेतीन मुहूर्त साजरे करीत असत. तथापि, आमच्या सांस्कृतिक अभ्यासानुसार गटारी अमावस्या, होळी, एकतीस डिसेंबर आणि अर्धा पोळा हे साडेतीन मुहूर्त...
मार्च 17, 2019
वेळ गेल्यानंतर एखादी गोष्ट केली, तर पश्‍चात्ताप होतो. शारीरिक तंदुरुस्तीपासून इतर अनेक गोष्टींमध्ये हे सांगता येईल. मात्र पश्‍चात्तापाची वेळ येण्यापेक्षा आधीच थोडी तयारी करणं आवश्‍यक आहे. पूर्वतयारी नेमकी, योग्य असली, की मग अनेक गोष्टी सोप्या होतात आणि जगणंही मग आनंददायी होतं. पुण्यातल्या ओशो रजनीश...
मार्च 17, 2019
‘अवगुंठन’ एकांकिका लिहिताना जितका भांबावलो होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त कसरत मला ही एकांकिका दिग्दर्शित करताना करावी लागली. कॉलेजमध्ये त्यावेळी दोन ग्रुप पडले होते आणि दोन वेगळ्या एकांकिका सादर केल्या जाणार होत्या. त्यामुळे संपूर्ण नव्या टीमबरोबर मला काम करावं लागणार होतं. कारण आधीची जुनी टीम...
मार्च 17, 2019
नदीपात्रातल्या खोल घळी, धबधबे, नागमोडी वळणं, वाळूची बेटं, पूरमैदानं हे नदीच्या नैसर्गिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे असतात. ते अबाधित राहणं नदीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. येत्या आठवड्यात (२२ मार्च) जागतिक जलदिन आहे. त्यानिमित्तानं नदीपात्रांच्या सद्यःस्थितीविषयी... आज जगातल्या...
मार्च 17, 2019
‘एम्बेडेड सिस्टिम’ म्हणजे एक प्रकारचा कॉम्प्युटरच असतो. या एम्बेडेड सिस्टिम्स या काही खास किंवा विशिष्ट कामांसाठीच निर्माण केलेल्या असतात. बहुतेक वेळेला त्या डिजिटल घड्याळं, कॅल्क्‍युलेटर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, डिजिटल कॅमेरा, प्रिंटर आदी उपकरणांबरोबर, यंत्रांबरोबर किंवा हार्डवेअरबरोबरच येतात....
मार्च 17, 2019
मला खात्री होती की कुणीतरी त्यांना पाहिलं असणार. आता त्यांना पाहिलं असण्याची शक्‍यता असणाऱ्या या ‘कुणाला तरी’ आम्हाला शोधायचं होतं. मी माझ्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो; पण मी मांडलेल्या तर्कामुळे ते फार काही प्रभावित झाल्याचं दिसलं नाही. अशा पद्धतीनं मला अपेक्षित असणारा माणूस शोधून काढणं...
मार्च 17, 2019
‘लग्नाला यावंच लागेल’ असं सांगून पाहुणे लग्नपत्रिका ठेवून गेले. मी ती पाकिटाबाहेर काढली तेव्हा शब्दांच्या पलटणीच अंगावर चाल करून आल्यासारखं वाटलं. पाहुणे पत्रिकेबरोबर एखादी दुर्बिणही ठेवून गेले असते तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. कारण, त्या लग्नाचं नेमकं ठिकाण, वेळ आणि तारीख तरी नीट पाहता आली...
मार्च 17, 2019
ओंकारनं पक्‍याला भेटता येईल का ते विचारलं. मजूर लोक त्याला इमारतीच्या मागं घेऊन गेले. तिथं एका तुटक्‍या खुर्चीत शून्यात नजर लावून बसलेला पक्‍या दिसला. त्याच्या मजूर मित्रांनी त्याला ओंकारची भेट करून दिली. पक्‍या आपल्या तंद्रीतून बाहेर आला; पण डोळ्यातली उदासी तशीच. ओंकारनं काही पैसे पक्‍याला देऊ...
मार्च 17, 2019
आजोबा खाली मान घालून शांत बसले होते. मात्र, आजींच्या मनात बोलणं दाटून आल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. दुपारी बाराची वेळ, त्यामुळे त्या चिटुकल्या हॉटेलमध्ये आमच्यात व्यत्यय आणणाऱ्यांची संख्या तशी कमीच होती. आजींनी आपली कैफियत थोडक्‍यात सांगायला सुरवात केली...  यंदा मुंबईतला उन्हाळा कमालीचा...
मार्च 17, 2019
दिवसांतून किती वेळा व्यायाम करावा, आहार कोणता आणि तो किती वेळा घ्यावा, हे ज्याचं त्यानं आपल्या शरीररचनेनुसार ठरवायचं असतं. मला कित्येक तरुण फिटनेसबाबत विचारतात. मी त्यांना हेच सांगतो, की तुम्ही सतत व्यायाम करा. दिवसातून एकदा तरी व्यायाम केलाच पाहिजे. केवळ दहा दिवस किंवा एक महिना वर्कआऊट करून...
मार्च 10, 2019
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग यांच्यातल्या दुसऱ्या शिखर बैठकीकडं जगाचं लक्ष होतं. सिंगापूरपाठोपाठ हनोईतल्या वाटाघाटी कसल्याही ठोस तोडग्याविना गुंडाळल्या गेल्या. उत्तर कोरियाला त्यांची सर्वांत मोठी अणुनिर्मिती कार्यक्रमाची जागा नष्ट करण्याच्या बदल्यात 2016...
मार्च 10, 2019
ताणाचा मनावर तीव्र आघात होऊन शारीरिक अस्वस्थतेची लक्षणं जाणवणाऱ्या "पॅनिक ऍटॅक डिसॉर्डर'चं प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. तरुणांमध्ये-विशेषतः आयटीसारख्या क्षेत्रांत काम करणाऱ्यांना पॅनिक ऍटॅक्‍स येण्याचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे. प्रत्यक्ष शारीरिक तपासणीत काही नाही; मात्र लक्षणं...
मार्च 10, 2019
आपल्याकडं कोणा राजकीय अथवा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तीशी ओळख झाली, तर आयुष्यात बदल होईल, असं अनेकांना वाटतं. हे 99 टक्के चुकीचं आहे. बऱ्याच युवकांना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन वृद्धिंगत करावा असंही वाटतं; परंतु याचा अर्थ "आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयावर परदेशात जाऊन एक पदवी प्राप्त करणं आणि मग...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
मार्च 10, 2019
जालंधरला वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख (सिनिअर एसपी) म्हणून नियुक्तीस असताना मी असंच एक शूटआऊट पाहिलं. मी अनुभवलेलं हे पहिलंच शूटआऊट. ती सन 1984 च्या दिवाळीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. "ऑपरेशन ब्लू स्टार' होऊन चार महिने झाले होते. पंजाबमध्ये हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडत होते. वातावरणात सतत एक...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...
मार्च 10, 2019
शरदराव आणि नाना पहाटेच उठून फिरायला जात आणि येताना भाजी, दूध घेऊन येत. दुपारी बारा वाजता सुमनताई आणि माईंचा स्वयंपाक झाल्यावर चौघं एकत्र बसून जेवण करायचे. चारचा चहा झाल्यावर शरदराव-नाना फिरायला जायचे, आणि माई- सुमनताई मंदिरात जायच्या. शरदराव आणि नानांची चांगलीच गट्टी जमली होती. माई तर सुमनताईंवर...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...