एकूण 1751 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
डिस्नेची उपकंपनी असलेला मार्व्हल स्टुडिओज आणि सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट यांच्यातली बोलणी फिसकटली आहेत. अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांवर अखेर पडदा पडला आणि स्पायडरमॅन अखेर ‘मार्व्हल-सोनी’ यांच्या गुंत्यातून मोकळा झाला. खरं तर हे सगळं खूप अचानक घडलं आहे, त्यामुळं नक्की काय होणार हे कुणालाच माहीत नाही...
सप्टेंबर 08, 2019
पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडचं ‘ग्रीनलॅंड’ बेट घेण्याची इच्छा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच व्यक्त केली आहे; पण ते बेट ज्या डेन्मार्क देशाचा स्वायत्त भाग आहे त्या देशाच्या पंतप्रधानांनी त्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावर ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार बरीच आगपाखड केली. हे ग्रीनलॅंड बेट...
सप्टेंबर 08, 2019
कुठलाही प्रश्न न विचारावा लागता आपल्याकडल्या अवाढव्य डेटामधून त्यांच्यातले संबंध किंवा असोसिएशन्स शोधून काढून त्यातून निष्कर्ष किंवा ज्ञान मिळवणं हे डेटा मायनिंगचं वैशिष्ट्य आहे. मात्र, हे काम सोपं नसतं. याचं कारण यात असंख्य व्हेरीएबल्स असतात आणि त्यातल्या कशाकशामध्ये कशा तऱ्हेचे संबंध आहेत हे...
सप्टेंबर 08, 2019
समाजोन्नती होताना खुबीनं अन्न शिजवण्याचं कार्य ‘बेटर हाफां’च्या गळ्यात मारलं गेलं, यावर माझ्या माता-भगिनींचं दुमत असणार नाही. बिचाऱ्या अहोरात्र खपतात, झिजतात तेव्हा कठं रोज रोज नवनवं काही रांधून होतं. घरचे ‘वाहवाई’ करून थकतात. ‘‘मी कशी दिसते?’’ या अजरामर प्रश्नाला जसं ‘‘सुंदर!’’ हे तितकंच अमर उत्तर...
सप्टेंबर 08, 2019
तात्याची बायको कधीच देवाघरी गेली होती. तेव्हापासून तो एकटा पडला होता. आयुष्यभर बायकोनं साथ दिली होती. आठवणीतले तेच क्षण आठवत, मनातल्या मनात कुढत-झुरत तात्या आला दिवस मागं टाकत होता. शेवटचा श्‍वास घेण्यासाठी! गणपा म्हाताऱ्याचं घर आमच्या वस्तीत ऐन मध्यात होतं. म्हाताऱ्याच्या घराशेजारी म्हसोबाचं बारकं...
सप्टेंबर 08, 2019
आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ शिक्षित आणि कळत्या जोडप्यांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात असं त्यांच्या आई-वडिलांना कधी वाटेल? माहीत नाही... मुंबईतल्या ‘फाउंटन’च्या आमच्या ऑफिसखाली सोमवारी गर्दी अधिकच फुलून गेली होती. सकाळचे ११ वाजले असतील. या ऑफिसला लिफ्ट नाही. जुनी...
सप्टेंबर 08, 2019
त्या भव्य मॉलमध्ये फिरताना मी कपड्यांच्या दालनात गेलो. तिथं हॅंगरला लटकवलेले कपडे पाहत तरुण मुलं-मुली फिरत होत्या. एका मोठ्या खोक्यात चुरगळलेले टी-शर्ट ढिगानं पडलेले होते. कुणीतरी कंटाळून ते फेकून दिले असावेत किंवा मॉलच्या मालकानं अथवा मुलानं वापरून ते खोक्यात टाकून दिले असावेत असं वाटत होतं! मी...
सप्टेंबर 08, 2019
रोजचं वेळापत्रक मी अगदी काळजीपूर्वक पाळते. वेळेवर झोपते आणि वेळेवरच उठते. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. चांगल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली राखणं गरजेचं आहे. मात्र, त्यासाठी जास्त वर्कआऊट करणं, किंवा जास्त डाएटिंग करणं चुकीचं आहे. नुसतं जिमला जाणं पुरेसं नाही. त्यासाठी नेमके व्यायाम निवडणं आणि...
सप्टेंबर 01, 2019
जो फिट असतो, तोच ‘हिट’ होतो, यावर माझा विश्‍वास आहे. आपली शरीरयष्टीही चांगली पाहिजे. पॅन्ट-शर्ट घातल्यावरही आपलं व्यक्तिमत्त्व तेवढंच भारदस्त दिसणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकानं दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम केलीच पाहिजे. मी मुंबईत असतो, त्यावेळी न चुकता सकाळी सात वाजताच उठतो. त्यानंतर एक...
सप्टेंबर 01, 2019
राखुंडीनं दात घासून धोंडीभाऊनं फुटक्या कप-बशीतला चहा भुरके मारत संपवला. पार्वतीनं पहाटेच उठून भाकरी थापल्या होत्या. त्यावर लाल मिरचीचा भेळा घालत तिनं फडक्यात दोघांचं जेवण बांधून घेतलं. भाकरीचं गाठोडं घमेल्यात ठेवलं आणि घाईनं ते रानाकडं निघाले. गावचा चौक ओलांडताना त्यांना एकदम तड तड असा फटाक्यांचा...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
सप्टेंबर 01, 2019
सणांच्या मुळाशी कृतज्ञतेची ही आदिम प्रेरणा असावी. बुद्धिपूजा आणि शक्तिपूजा! जगणं सुरंगी करण्याची ही निमित्तं शतका-शतकांपूर्वीची आहेत. ती नितळता आज पुन्हा शोधायला हवी; एका अर्थानं गंगेनं पुन्हा गंगोत्रीकडं जायला हवं. उत्सवाचं केवळ कर्मकांड झालं, की उरतात ते केवळ देखावे! टरफल्यांच्या सजावटीपेक्षा...
सप्टेंबर 01, 2019
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूनं अजिंक्यपद मिळवलं. सिंधूनं केलेली ही कामगिरी क्रीडा स्तरावर महत्त्वाची आहेच; पण इतर अनेक प्रकारांत खेळणारे खेळाडू, पालक, भावी खेळाडू या सगळ्यांसाठीही तिची कहाणी प्रेरणादायी आहे. ही कहाणी अखंड धडपड करत राहण्याची आहे, संकटांवर मात करण्याची आहे, योग्य प्रकारे...
सप्टेंबर 01, 2019
वेळ पहाटेचे साडेचार. काही जण भारतीय तिरंग्याला वंदन करत मोठ्या अभिमानानं राष्ट्रगीत गाऊन दिवसाची सुरवात करतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निग्रही भाव असतात. वेळ दुपारची साडेचारची. तीच माणसं तिरंग्याला वंदन करत असताना, भारताचं राष्ट्रगीत वाजवलं जात असताना त्यांच्या गालावरून आनंदाश्रू ओघळत असतात....
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
सप्टेंबर 01, 2019
अवघ्या पंधरा दिवसांचं हे लेकरू मुंबईच्या त्या जीवघेण्या पावसात कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? रस्त्यावर राहणारी ही सगळी माणसं काही भिकारी नव्हेत, तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग ती करत असतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार? पुण्यात गेल्या महिन्यात...
सप्टेंबर 01, 2019
भारतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं सरासरी दर आठ मिनिटांना एका महिलेचा मत्यू होतो. ह्युमन पॅपिलोमा वायरस म्हणजे एचपीव्हीसंदर्भातल्या चाचण्या केल्या, तर या प्रकारच्या कर्करोगाचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतं. या चाचण्यांचा नेमका काय उपयोग होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय काम सुरू आहे,...
सप्टेंबर 01, 2019
बिग डेटा हे इतकं वाढत चालेलं पकरण आहे, की पूर्वी त्याला खूप महाग सुपर कम्प्युटर्सच लागले असते; पण आता हार्डवेअरच्या किंमतीही कमी होताहेत आणि सॉफ्टवेअर्सही खूपच जलद होत चालली आहेत. त्यामुळे आता बिग डेटा मॅनेज करणं शक्य झालेलं आहे. अशा वेळी आपला डेटा अनेक सर्व्हर्सवर तुकड्यातुकड्यांनी ठेवला जातो....
सप्टेंबर 01, 2019
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी या शहरात एक अनोखं रेस्‍टॉरंट आहे. त्याचं नाव ‘ग्राउंड्स ऑफ अलेक्‍झांड्रिया’. केवळ ‘ग्राउंड्स’ या नावानंच ते ओळखलं जातं. वेगवेगळ्या झाड-झडोऱ्यांनी वेढलेल्या या अनोख्या रेस्‍टॉरंटविषयी... ‘परत निसर्गाकडं’ (Back to nature) ही संकल्पना खरं म्हणजे अनेक वर्षांपासून जगभर लोकप्रिय आहे...
सप्टेंबर 01, 2019
सहामाहीच्या शेवटच्या परीक्षेनंतर सरांनी मला ‘टीचर्स रूम’मध्ये बोलावलं आणि एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितलं : ‘‘ ही चिठ्ठी वडिलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे. तीत तू भाग घे. जायचं भाडं आपल्याला भरायचं आहे. तुझ्या वडिलांना काही ते जास्त नाही.’’ ‘‘घोंगड्या लै डेंजर हाये बर्का...’’ आमच्याच...