एकूण 52 परिणाम
जुलै 04, 2017
सोल - उत्तर कोरियाने आज त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतील अलास्का राज्यापर्यंत पोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चाचणीमुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान...
मे 17, 2017
लंडन - अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील "अर्न्स्ट अँड यंग' संस्थेच्या मानांकनातून हे मंगळवारी स्पष्ट झाले. "अर्न्स्ट अँड यंग'च्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठांच्या मानांकनात पहिल्या 40 देशांमध्ये चीन...
मे 05, 2017
वॉशिंग्टन : दहशतवादाचा प्रभाव असलेल्या भागांमधील नागरिकांना अमेरिकेचा व्हिसा हवा असल्यास त्यांना सोशल मिडीयावरील त्यांचे अस्तित्व, ई मेल अॅड्रेस व दूरध्वनी क्रमांक, अशी सर्व माहिती तपासणीसाठी द्यावी लागणार आहे. सरकारला या प्रस्तावित निर्णयासंदर्भात जनमत जाणून घ्यावयाची इच्छा आहे. मात्र या योजनेची...
एप्रिल 21, 2017
न्यूयॉर्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत फक्त दोन भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व ब्रिटीश...
एप्रिल 14, 2017
सोल : अमेरिकेने कोणत्याही प्रकारे आगळिक केल्यास त्याला निर्दयपणे प्रत्युत्तर देण्याचा इशारा उत्तर कोरियाच्या लष्कराने दिला आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून आणि हा देश नव्याने शस्त्र चाचण्या घेणार असल्याच्या संभाव्य वृत्ताने सध्या तणाव निर्माण झाला आहे.  उत्तर कोरियाचा अण्वस्त्र...
एप्रिल 07, 2017
सीरिया : अमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 लहान मुले आणि 20 महिलांसह शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर चारहशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे 'अल-जझिरा'ने म्हटले आहे. गुरुवारी रात्रीपासून अमेरिकेने सीरिया सरकारच्या हवाई तळांवर 50 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे...
एप्रिल 04, 2017
वॉशिंग्टन : 'एच-1बी' व्हिसाचा गैरवापर करून अमेरिकी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यांना कडक कारवाई करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दिला आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि व्यावसायिकांकडून 'एच-1बी' व्हिसाला सर्वाधिक मागणी आहे.  अमेरिकी...
एप्रिल 03, 2017
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनर हे इराकच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकन लष्कराचे प्रमुख मरीन जनरल जोसेफ डनफोर्ड हेही त्यांच्यासोबत असल्याचे ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  कुशनर यांना स्वतःला...
मार्च 29, 2017
हवामान बदलांसंदर्भात ओबामांनी घेतलेले निर्णय मागे घेण्यास मंजुरी वॉशिंग्टन- हवामान बदलासंदर्भात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतलेले निर्णय मागे घेण्याबाबतच्या आदेशावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या या निर्णयावर विरोधी पक्ष आणि पर्यावरणवाद्यांनी...
मार्च 21, 2017
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी रशियन अधिकाऱ्यांशी खरंच समन्वय साधला का याचा तपास अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) तपास संस्था करीत आहे.  अशा तपासांबाबत सहसा माहिती जाहीर केली जात नाही. मात्र, 'या प्रकरणाचा तपास करण्यात...
फेब्रुवारी 26, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षांचे सरकारी निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसतर्फे आयोजित पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी आज (रविवार) ट्विटरद्वारे या वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले. आपल्या सर्वांना...
फेब्रुवारी 17, 2017
नेपल्स- अमेरिकेत अल्पसंख्यांक असणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी करून उपजीविका करणारे अमेरिकन नागरिकही स्थलांतरितांवरच टीकेची झोड उठवत असल्याचा प्रकार आता समोर येत आहे.  एका शैक्षणिक संस्थेत नोकरी करणाऱ्या अमेरिकन शिक्षिकेने स्थलांतरितांवर कुत्सितपणे जाहीर...
फेब्रुवारी 13, 2017
प्योंगयांग - उत्तर कोरियाकडून "बॅलिस्टिक' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. "जमिनीवरुन जमिनीवर मारा करु शकणाऱ्या या मध्यम ते मोठ्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची' यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे वृत्त येथील सरकारी माध्यमांनी दिले आहे. "पुकगुक्‍सॉंग 2' या या...
फेब्रुवारी 08, 2017
भावना, अस्मितांच्या लाटांवर निवडून आलेल्या सत्ताधीशांना मनास येईल तसा कारभार करण्याची मोकळीक मिळाल्याचा समज होण्याची दाट शक्‍यता असते. असा समज झाल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत संतुलन साधणाऱ्या किंवा नियमन करणाऱ्या संस्था या आपल्या मार्गातील धोंड आहेत, अशी त्यांची धारणा बनते. अमेरिकेचे नूतन अध्यक्ष...
जानेवारी 31, 2017
पाठबळ पुरविण्याचे सौदीकडून मान्य वॉशिंग्टन/रियाध: सीरिया आणि येमेनमधील संरक्षित प्रदेश (सेफ झोन) निर्माण करून त्यांना पाठबळ पुरविण्याचे सौदी अरेबियाने अमेरिकेबरोबर झालेल्या चर्चेत मान्य केले आहे. सौदीचे राजे सलमान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर हा...
जानेवारी 30, 2017
टोरॉंटो - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत तात्पुरती प्रवेशबंदी केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या नागरिकांना कॅनडाने मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेकडून प्रवेश नाकारण्यात आलेल्या कुठल्याही प्रवाशाला कॅनडाचे तात्पुकते...
जानेवारी 28, 2017
ट्रम्प सरकारचा इशारा; भिंत उभारण्यासाठी निधी संकलित करणार वॉशिंग्टन- मेक्‍सिकोसह इतर देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के कर लादण्याचा विचार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या करीत आहेत. अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमेवर भिंत उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद...
जानेवारी 21, 2017
वॉशिंग्टन - "अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा जनतेचे सरकार आले आहे. यापुढे अमेरिकेमध्ये "अमेरिका फर्स्ट' या नव्या दृष्टिकोनातून सरकार चालविले जाईल आणि आपण सर्वजण मिळून अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवू,' असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वांत शक्तिमान देशाचे अध्यक्षपद आज...
जानेवारी 13, 2017
बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रामधील बेटांवर नियंत्रण मिळविण्यापासून चीनला रोखावयाचे असल्याचे अमेरिकेस चीनबरोबर युद्धच करावे लागेल, असा थेट इशारा येथील सरकारी मालकीच्या ग्लोबल टाईम्स या प्रभावी वृत्तपत्रामधून देण्यात आला आहे. दक्षिण चिनी समुद्रामधील बेटे चीनला गिळंकृत करुन दिली जाणार नाहीत, असे विधान...
जानेवारी 09, 2017
वॉशिंग्टन - रशियाबरोबर मैत्री असणे ही चांगली गोष्ट आहे, फक्त "मूर्ख' लोकांनाच ही मैत्री नको वाटते, असे सांगत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबाबतचे आपले धोरण स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हॅकिंगच्या माध्यमातून ढवळाढवळ केल्याचा आरोप सध्याचे...