एकूण 57 परिणाम
एप्रिल 29, 2017
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरभरून मिळालेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता जनता पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी झाली, यात नवल काहीच नव्हते! फक्‍त हे फटाके शाब्दिक होते आणि ते फोडण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री...
एप्रिल 19, 2017
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त...
एप्रिल 13, 2017
एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान...
एप्रिल 06, 2017
प्रिय मित्र उधोजीसाहेब  यांसी शतप्रतिशत मुजरा. फारा दिवसांत गाठभेट नाही. बोलणेचालणेही नाही. (तुमचा फोन बंद लागतो आहे...) प्रारंभी वाटलं, महापालिका निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी आपण सहकुटुंब परदेशी (फोटो काढण्यासाठी) गेला असाल. किंवा नवीन घराच्या बांधकामात सिमेंट-वाळूच्या ढिगाऱ्यातून फिरत असाल. म्हटले...
एप्रिल 06, 2017
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असताना सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा तर द्यावाच; पण शेतीच्या मूळ दुखण्याला हात घालणेही अत्यावश्‍यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेते विकासावर...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...
मार्च 31, 2017
बळिराजा वेगवेगळ्या कारणाने सातत्याने संकटांच्या गर्तेत अडकण्याचे चित्र क्‍लेशदायक आहे. नोटाबंदीचे कवित्व तुलनेने शमल्याचे वरकरणी दिसत असले तरी वास्तव वेगळे आहे. शेतीच्या अर्थकारणाचा डोलारा ज्या यंत्रणेवर वर्षानुवर्षे विसंबून राहिला, त्या जिल्हा सहकारी बॅंकांचे अर्थकारण डळमळीत होणे हे ग्रामीण...
मार्च 31, 2017
आम्हाला बस लागते. इथे लागते म्हणजे गरज पडत्ये, असे नव्हे. बोट लागावी, तशी लागत्ये. अगदी अलिबागेस जावयाचे म्हटले, तरी आम्ही आलेपाकाच्या वड्या लेंग्याच्या खिश्‍यात चवडी चवडीने ठेवतो; पण महाराष्ट्रातील रंजल्या गांजल्या शेतकऱ्यांसाठी असा बसप्रवास करणे आम्हाला भागच होते. नतद्रष्ट सरकारने शंभर भूलथापा...
मार्च 25, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विलक्षण विकासवाद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विचक्षण नियोजन अशा दुहेरी शक्‍तीचा संयोग असतानाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तब्बल ६३ जागा जिंकल्या. शिवसेनेने चिवट लढाई दिली. अशा लढवय्या पक्षाचे आज काय झाले आहे? मुंबई आणि ठाणे महापालिका शिवसेनेने...
मार्च 24, 2017
जलसंपदा ही ईश्‍वरदत्त असली, तरी तिचा फायदा घेताना तिच्या संरक्षणाची, व्यवस्थापनाची, तसेच तिच्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरणाची जबाबदारी ही सरकार व जनता यांच्या सहकार्यातून पार पडायला हवी. दरवर्षी मार्च महिना हा जलसंपदेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. चौदाला ‘आंतरराष्ट्रीय नदी दिवस’ तर...
मार्च 24, 2017
सभागृहातील गोंधळाचे आणि वादग्रस्त निर्णयांचे समर्थन ज्या पद्धतीने केले जात आहे त्यामुळे सर्वच पक्षांची स्वतंत्र विचारशक्‍ती गोठून गेली आहे की काय, अशी शंका येते.परस्परांकडे बोट दाखवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे योग्य ठरेल. महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून १०-११ दिवस ठप्प...
मार्च 22, 2017
महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य आहे. राज्याचा औद्योगिक विकास इतर राज्यांच्या तुलनेत नक्कीच समाधानकारक आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पानुसार पुढील वर्षी दोन आकडी वाढीच्या दराचे उद्दिष्ट गाठण्याचे स्वप्न सत्यात उतरवणे अवघड नाही. हा...
मार्च 20, 2017
महाराष्ट्राच्या विधिमंडळात अन्‌ बाहेरही शेतकरी आत्महत्या व त्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा तापलाय. नोंदलेली पहिली आत्महत्या अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या साहेबराव पाटलांच्या एकतिसाव्या वर्षश्राद्धानिमित्त किसानपुत्रांनी "बळिराजासाठी एक दिवस उपवास' केला, तर कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर...
मार्च 20, 2017
सर्वच आघाड्यांवर ढासळलेल्या पंजाबला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची अवघड जबाबदारी नवे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना पेलावी लागणार आहे.  पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (वय 75) यांनी शपथविधीनंतर केलेले वक्तव्य त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे निदर्शक होते. अकाली दल-भारतीय जनता...
मार्च 19, 2017
विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सत्तारूढ शिवसेनेने लावून धरलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीमुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अखेर विधिमंडळात सादर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाब्दिक फुलोरा फुलवत आणि विरोधकांना टपल्या मारत मांडलेल्या या अर्थसंकल्पात...
मार्च 18, 2017
आर्थिक पाहणी अहवालात शेती उत्पादनात वाढ दिसते आहे ती प्रामुख्याने पावसाने हात दिल्याने. तरी शेतकऱ्याची हलाखी कमी झालेली दिसत नाही. अशा अनेक प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी लोकानुनय नव्हे, तर लोकहिताची दृष्टी हवी.   राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थव्यवस्थेच्या एकूण तानमानाचा आरसा दाखविणारा असतो, असे...
मार्च 18, 2017
(राजाधिराज उधोजीराजे अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालीत आहेत. मधूनच तलवारीचे हवेत हात करतात. ‘बघतोच तुला आता!’, ‘अरे मी दोर कधीच कापून टाकलेत!’ ऐशा घोषणा करत कुण्या अदृश्‍य गनिमावर चालून जात आहेत. मध्येच स्टुलावर मटकन बसून ‘अहह! काय हा शाप!’ असे विव्हल उद्‌गार काढत आहेत. अब आगे...) उधोजीराजे : (खोल...