एकूण 2485 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
फेब्रुवारी 16, 2019
प्रश्‍न - संघर्षाची धार कमी झाली की वाढली?मेघा पानसरे : गोविंद पानसरे यांच्या विचारांचा आवाज जिवंत आहे, हे आम्ही आज चार वर्षांनंतरही दाखविले आहे. विचारांची हत्या होऊ शकत नाही, आम्ही निर्भय आहोत. हे दाखविण्यासाठीच आम्ही प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला ‘निर्भया वॉक’ करतो. वीस फेब्रुवारी २०१५ला...
फेब्रुवारी 16, 2019
नवी दिल्ली : फरार उद्योगपती विजय मल्ल्या याने गुरुवारी (ता. 14) ब्रिटनच्या उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत आपल्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यास त्याचे प्रत्यार्पण आणखी काही महिने रखडण्याची शक्‍यता आहे.  वेस्टमिनिस्टर न्यायालयाने मल्ल्याच्या...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - राज्यातील विविध तुरुंगांमध्ये तुरुंगाधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची किती पदे रिक्त आहेत, याचा अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. १४) राज्य सरकारला दिले. तुरुंगामधील सोई-सुविधांबाबत राधाकृष्णन समितीने दिलेल्या शिफारशींवर काय अंमलबजावणी केली, अशी विचारणाही...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची जीवनशैली राजासारखी आहे. त्यांना राफेल डीलसाठी खर्च करायला पैसे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील आमचे 550  कोटी रुपये दिले नसल्याने त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे. असा युक्तिवाद स्वीडनची...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे पुणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासाठी हजर झाले आहेत. डॉ. तेलतुंबडे यांच्यावर बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी ठेवला आहे. यापूर्वी त्यांना पोलिसांनी अटकही केली होती, मात्र जिल्हा सत्र...
फेब्रुवारी 14, 2019
संशयाचे मळभ एकदा निर्माण झाले, की त्याचा कल्लोळ सर्वत्र व्यापून राहतो अन्‌ त्यात वास्तव शोधणे कठीण होते. राफेल विमानांच्या खरेदीवरून गेले वर्षभर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि सरकारी कागदपत्रांच्या जंत्रीसह वस्तुस्थिती मांडण्याचा माध्यमांत सुरू असलेला प्रयत्न, यामुळे जनतेच्या...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शहरांमधील वाढते अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने उपाय-योजना सुरू केल्या आहेत. आता अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे हटविण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगासह भ्रष्टाचार प्रतिबंधक...
फेब्रुवारी 13, 2019
नोकरशाही ही मुळात नियमांच्या चौकटीला बांधलेली असते; मात्र काही क्षेत्रे अशी असतात, की तेथे परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित अधिकाऱ्यांना असते. याचे कारण त्या कामाचे स्वरूपच तसे असते. काही वेळा निवड करण्याचा (डिस्क्रिशनरी पॉवर) अधिकारही वापरावा लागतो. "सीबीआय'सारख्या...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - गेल्या दहा ते बारा वर्षांपासून चर्चेत असलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेवर मंगळवारी (ता. 12) अखेरचा पडदा पडला. कंपनीसोबतचे तडजोडीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा पर्याय समोर आणला होता. त्यावर सर्वसाधारण...
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका अधिकाऱ्याची बदली करणारे 'सीबीआय'चे हंगामी संचालक एम. नागेश्‍वर राव यांना आज (मंगळवार) न्यायालयाने दिवसभर कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे नागेश्‍वर राव यांनी बिनशर्त माफी...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. अटकेपासून संरक्षणाची मुदत मंगळवारी (ता. १२) संपत असून, तेलतुंबडे यांनी १४ व १८ फेब्रुवारीला तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. अटक झाल्यास त्यांची वैयक्तिक हमीपत्रावर...
फेब्रुवारी 12, 2019
लष्कर आणि ‘आयएसआय’ला राजकारणापासून दूर राहण्याचा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य इम्रान खान सरकारमध्ये नाही. इतकेच नव्हे, तर न्यायपालिकेतही तशी धमक नाही. लोकशाही व्यवस्था यशस्वी होणे अनेक घटकांवर अवलंबून असते. या...
फेब्रुवारी 11, 2019
अनेक राजकीय नेत्यांना जिवंतपणीच आपले पुतळे आपणच "याचि देही, याच डोळा' बघावे, अशी आस असते. मुंबईचे एकेकाळचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील यांच्या हयातीतच त्यांचा पुतळा गिरगावातील एका उद्यानात उभारला गेला होता. इतरही अनेकांना ही इच्छा असते. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे - शहरातील विनापरवाना हजारो हॉटेलांवर कारवाई करण्यास सरकारी  यंत्रणा टाळाटाळ करीत असून, परवानाधारक हॉटेलांची मात्र अडवणूक करण्यात येत आहे, अशी तक्रार हॉटेलचालकांनी केली. तसेच, ऑनलाइन पद्धतीने घरपोच खाद्यपदार्थ पोचविणाऱ्या कंपन्यांचे कमिशन निश्‍चित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. ‘सकाळ’ने...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक - उत्तरेतील शीतलहरींच्या आक्रमणामुळे द्राक्षपंढरीत दवबिंदू गोठले आहेत. शिवडी, उगाव, पिंपळगाव व मांजरगाव परिसरात पारा शून्यावर घसरला असून, कुंदेवाडीत तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठ्यात कुडकुडून गोदाकाठी रामकुंड परिसरातील तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने उत्तर...
फेब्रुवारी 10, 2019
वंगभूमीतल्या "सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा "लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात भावनिक आंदोलनं निर्माण केली अन्‌ पाहता पाहता त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले. आज ममतादीदी केवळ पश्‍चिम बंगालपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत...
फेब्रुवारी 09, 2019
नवी दिल्ली/ बंगळूर : कर्नाटकात घटनात्मकरीत्या अधिकारावर आलेल्या कॉंग्रेस व धजद युती सरकारचे पतन करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते राज्यपालपदाचा वापर करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला. नवी दिल्ली येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेसच्या 20 आमदारांना 450 कोटींचे आमिष दाखविण्यात आल्याचेही ते...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : ''कोणत्याही व्यवसायात भांडवल गुंतविताना अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार अंमलबजावणी व्हावी. तसे न झाल्यास अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालया पर्यंत जातात. अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिल्यानंतर सरकारने तो स्वीकारला पाहिजे....
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : पत्रकारिता हे मनोरंजन किंवा माहिती सांगणारे नव्हे तर सत्य सांगण्याचे माध्यम आहे. त्यामुळे फक्त इंटरनेटवर उपलब्ध माहिती न देता घटनेमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीयमंत्री अरुण शौरी यांनी केले...