एकूण 111 परिणाम
सप्टेंबर 26, 2018
हैदराबाद : भारताची फुलराणी साईना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 16 डिसेंबरला कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे....
ऑगस्ट 28, 2018
जकार्ता : महत्त्वाच्या दीर्घ रॅलीज जिंकत पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साईना नेहवाल तई झु यिंगचा झंझावात रोखणार, असे वाटत असतानाच पिछाडीवर जात होती. त्यामुळे सर्वच भारतीयांचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे अंतिम फेरी पाहण्याचे स्वप्न भंगले....
ऑगस्ट 04, 2018
रिओ ऑलिंपिक स्पर्धेनंतर आता भारतीय खेळाडूंचा आशियाई स्पर्धेत कस लागणार आहे. ऑलिंपिकमधील हाताच्या बोटावर मोजता येणारी पदके आशियाई स्पर्धेत वाढलेली असतात यात शंकाच नाही. येथे फरक असतो तो स्पर्धेचा. आशियातील देशच या स्पर्धेत सहभागी असतात. त्यामुळे आपली पदकसंख्या वाढते असे म्हणायला वाव आहे. क्रीडा...
ऑगस्ट 03, 2018
नानचिंग : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील साईनाचे आव्हान आज संपुष्टात आले. रिओ ऑलिम्पिकमधील सुर्वण पदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनने साईनाला उपांत्यपूर्व फेरीत 21-6, 21-11 असा पराभवाचा धक्का दिला.  End of road!@NSaina narrowly miss out on a third World Championship medal after losing to Carolina...
ऑगस्ट 03, 2018
नान्जिंग (चीन)/मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम साईना नेहवालने केला. हा पराक्रम केलेली ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली. भारताच्या पी. व्ही. सिंधू, तसेच बी. साई प्रणीतनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; पण किदांबी श्रीकांतचे आव्हान आटोपले आहे....
ऑगस्ट 01, 2018
नानजिंग (चीन) / मुंबई : साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम जोशात सुरू करताना झटपट विजय मिळविला. साईनाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्या विजयामुळे सर्वच एकेरीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत विजय मिळविला.  जागतिक स्पर्धेत यापूर्वी रौप्य आणि ब्रॉंझ...
जून 29, 2018
मलेशियाः मलेशिया ओपनमध्ये आज झालेल्या सामन्यांमध्ये किदांबी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधू या दोघांनीही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.  साईना नेहवाल पहिल्याच फेरीत बाद झाल्यानंतर श्रीकांत आणि सिंधूने उत्तम खेळ करत भारतीयांच्या आशा कायम ठेवल्या. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या...
जून 29, 2018
क्वालालंपूर (मलेशिया) - भारताच्या साईना नेहवाल हिचे मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. जपानच्या अकाने यामागुची हिने तिचा पराभव केला.  साईनाला या लढतीत सातत्य राखता आले नाही. साईनाला 36 मिनिटे चाललेल्या लढतीत यामगुची हिच्याकडून 15-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. ...
मे 23, 2018
सातारा - केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात जोर मारत असल्याचा व्हिडिओ आज ट्विवट करुन देशातील नागरीकांना #HumFitTohIndiaFit असे सांगून तुम्ही ही तुमच्या फिटनेसचे रहस्य छायाचित्र अथवा व्हिडिओद्वारे अपलोड करावे असे आवाहन केले आहे.  विशेष म्हणजे राठोड यांनी फॉर्मल कपडे...
मे 21, 2018
मुंबई - पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांतची विश्रांती; तसेच एच. एस. प्रणॉयला दिलेला ब्रेक यामुळे भारताच्या दोन्ही संघांना थॉमस उबेर बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला हार पत्करावी लागली. साईना नेहवालच्या पराभवामुळे भारताच्या जखमेवर मीठच चोळले गेले.  बॅंकॉकला सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुषांसमोर...
मे 20, 2018
बॅंकॉक - थॉमस आणि उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही गटांत भारतासमोर कडवे आव्हान आहे. पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर मदार आहे. मागील दोन स्पर्धांत महिला संघाने दोन ब्राँझ जिंकली,...
मे 08, 2018
सिडनी - भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात प्रकाशझोतातील कसोटी खेळण्यास नकार दिल्यानंतर प्रमुख बॅडमिंटनपटूंनी ऑस्ट्रेलियातील स्पर्धेकडे पाठ फिरविली आहे. साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांनी हा निर्णय घेतला. त्यांना अग्रमानांकन होते, पण या स्पर्धेने सुपर सिरीज प्रीमियर दर्जा गमावला, तसेच बक्षीस...
मे 08, 2018
सिडनी - भारताच्या साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांनी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. दोघांना अग्रमानांकन होते. मंगळवारपासून स्पर्धा सुरू होत आहे.  सोमवारी अद्यावत ड्रॉ जाहीर झाला तेव्हा या दोघांसह पी. कश्‍यप याचेही नाव नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला सहावे मानांकन होते. पुरुष...
मे 06, 2018
नवी दिल्ली - साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या सर्वांत यशस्वी बॅडमिंटनपटूंची तुलना गुरू गोपीचंद यांनी हिऱ्याशी केली आहे. ‘माझी दोन अनमोल रत्ने’ अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.  साईनाने गेल्याच महिन्यात सिंधूचाच पराभव करून राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावले होते....
एप्रिल 27, 2018
वुहान (चीन) / मुंबई  - राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेती साईना नेहवाल आणि जागतिक तसेच ऑलिंपिक उपविजेत्या पी. व्ही. सिंधूने चीनमध्येच चिनी भिंत सहज सर करीत आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्याने काही वेळातच सामना सोडून दिल्याने किदांबी श्रीकांतला आगेकूच करण्यासाठी...
एप्रिल 26, 2018
वुहान (चीन)/मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेतील प्रभावी कामगिरी कायम राखताना साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. जागतिक विजेती ओकुहारा सलामीलाच गारद झाल्यामुळे सिंधू, साईनाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.  साईना, सिंधू दोन...
एप्रिल 24, 2018
मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपाठोपाठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतही आपली ताकद दाखवण्याचा साईना नेहवालचा इरादा आहे. वुहानला उद्यापासून (ता. २४) सुरू होत असलेल्या या स्पर्धेत साईनाला मानांकन नसले, तरी स्पर्धेतील विजेतेपदाच्या शर्यतीत तिचे नाव घेतले जात आहे. साईनाला गेल्या आशियाई स्पर्धेत पहिल्याच...
एप्रिल 18, 2018
हैदराबाद - कित्येक वर्षे भारतीय बॅडमिंटनची मदार एखाद्‌ दोन खेळाडूंवर होती. आता चित्र बदलले आहे. अश्‍विनी पोनप्पा - सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलामीची लढत जिंकल्याने श्रीकांत आणि साईना नेहवालवरील दडपण कमी झाले, असे प्रतिपादन भारताचे बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला...
एप्रिल 16, 2018
गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक हे माझ्याकडून आई-वडिलांना, तसेच देशाला गिफ्ट आहे. रिओतील अपयशानंतर सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे, असे साईना नेहवालने सांगितले.  या विजेतेपदाने सर्व टीकाकारांना उत्तर दिले, अशीच फुलराणीची भावना होती. ‘‘हे सुवर्णपदक...
एप्रिल 15, 2018
गोल्ड कोस्ट - बॅडमिंटनमधील भारतीयांची मक्‍तेदारी राष्ट्रकुल स्पर्धेत उद्या अखेरच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू विरुद्ध साईना नेहवाल, असा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे; तर जागतिक क्रमवारीत नुकताच अव्वल स्थानी आलेल्या किदांबी श्रीकांतनेही पुरुषांच्या एकेरीत अंतिम...