एकूण 50 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
मोदी लाटेत ऐनवेळी भाजपने दिलेला तरुण चेहरा म्हणून कार्य नसतानाही डॉ. हीना गावित यांनी नऊ वेळा मतदारसंघ राखलेले, ज्येष्ठ नेते माणिकराव गावितांचा पराभव करून नवा इतिहास रचला खरा, पण काँग्रेसने आता भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. आदिवासी जनतेसाठी प्रियांका गांधी यांची सभा घेत राज्यातील प्रचार...
डिसेंबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) शिवारातील नकट्या बंधाऱ्यातून गाळ काढण्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.11) दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका चव्हाण, 'रोहयो'चे सहाय्यक कार्यक्रम...
नोव्हेंबर 15, 2018
कापडणे (ता. धुळे) : जिल्ह्यात दुष्काळामुळे  कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. बागायतदार शेतकरी आणि कोरडवाहू शेतकरी खेडा पध्दतीत कापसाची विक्री करीत आहेत. प्रती क्विंटल पाच हजार आठशे पर्यंतचा भाव मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच सहकारी सुतगिरण्या बंद स्थितीत आहेत. सीसीआय खरेदी केंद्रांना मुहुर्त सापडलेला...
ऑक्टोबर 27, 2018
देऊर : शैक्षणिक गुणवत्ता वाढावी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अडचणी दूर होऊन वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी 75 टक्के पर्यंत वाढावी. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तीन हजार सहाशे माध्यमिक शिक्षकांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील सहा केंद्रावर प्रशिक्षणाची व्यवस्था...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील महा-ई-सेवा केंद्राचे संचालक राजेश बागुल व प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिल्लवस्तीतील गरजू आदिवासी बांधवांना नुकतेच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सुमारे 300 जात प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी...
ऑक्टोबर 02, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : रुग्णांवर विनापरवाना ऍलोपॅथी औषधोपचार करणाऱ्या व बेकायदेशीर वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या येथील एका तथाकथित डॉक्टरवर सोमवारी (ता.1) दुपारी एकच्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत निजामपूर (ता.साक्री) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सुमारे साडेपाच...
सप्टेंबर 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सावता चौकात राहणारे शेतकरी भगवान शामभाऊ सोनवणे (वय : 48) यांचे मंगळवारी (ता.4) रात्री नऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. तर त्यांच्या सोबत असलेले सावता चौकातील रहिवासी जगन माणिक भागवत हे गंभीर जखमी झाले आहेत. तरुण...
ऑगस्ट 01, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जामदे (ता.साक्री) परिसरात 21 जुलैला दुपारी बाराच्या सुमारास भंगार खरेदी-विक्री व पैशांवरून मध्यप्रदेशातील चार व्यापारी व सात स्थानिक रहिवास्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत गोळीबार अर्थात फायरिंग झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यात व्यापाऱ्यांनी...
जुलै 24, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे)- माळमाथा परिसरातील दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील आषाढोत्सव काल (ता.23) जल्लोषात साजरा झाला. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात तहसीलदार संदीप भोसले यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. रथोत्सवाचे यंदाचे अमृतमहोत्सवी (75 वे) वर्ष...
जुलै 03, 2018
आमळी - राईनपाड्यातील (ता. साक्री) पाच जणांच्या क्रूर हत्याकांड प्रकरणी जेही आरोपी असतील त्यांचा लवकर शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करा. गुंड प्रवृत्तींना ठेचून काढा. यात निरपराधांवर कारवाई होणार नाही याची काळजी घ्या, असा सक्त आदेश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर...
जुलै 02, 2018
धुळे/आमळी - आदिवासीबहुल साक्री तालुक्‍यातील राईनपाडा (जि. धुळे) येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून ग्रामस्थांनी अत्यंत अमानुषपणे पाच जणांची दगडांनी ठेचून हत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. यातील चार जण मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील, तर एक जण कर्नाटकातील आहे. सर्व मृत नाथपंथीय डवरी...
जुलै 01, 2018
आमळी (ता. साक्री, जि. धुळे)ः किडनी चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी पकडलेल्या चार जणांना बेदम मारहाण केली. त्या मारहाणीतच यातील तीन जणांचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला केला असून, धुळ्याहून जादा बंदोबस्त पाठविण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी अकराच्या सुमारास...
मे 18, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व आशुमतीबेन शाह विद्यालय या इंग्रजी व सेमीइंग्रजी, मराठी माध्यमाच्या खाजगी विनाअनुदानित शाळांनी आयएसओ मानांकन प्राप्त करून निजामपूर-जैताणे व साक्री तालुक्यासह धुळे...
मे 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसे ही समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. असेच शून्यातून विश्व निर्माण केले आहे साक्रीतील भिल्ल वस्तीत राहणाऱ्या एका सावित्रीच्या लेकीने. बालपणीच पितृछत्र हरपलेल्या त्या चिमुरडीला काबाडकष्ट करून खंबीरपणे उभे केले ते तिच्या विधवा आई निंबाबाई...
एप्रिल 25, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : जम्मू काश्मीरमधील कठुआ गावातील आसिफा बानो सामूहिक अत्याचार प्रकरण व खूनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यातील सर्व आठही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय निषेध मुकमोर्चा काढून आज (बुधवार) अकराच्या सुमारास निजामपूर-जैताणेतील मुस्लिम...
एप्रिल 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील कळंभीर (ता.साक्री) शिवारातील व रायपूर बारीजवळील 'सालदरा' धरणातून लोकसहभागाने गाळ काढण्यासाठी रायपूरवासीयांनी पुढाकार घेतला असून येथील शेतकरी धनराज कारंडे व कळंभीर येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे....
एप्रिल 07, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : ज्येष्ठ नेते कै. रामरावदादा पाटील यांच्या स्मृतिनिमित्त आज (ता.४) सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे कट्टर समर्थक, पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व आदर्श कला महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह यांच्यातर्फे आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आदर्श इंग्लिश...
मार्च 31, 2018
साक्री : धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा राहिलेले जेष्ठ नेते रामराव सीताराम पाटील (वय 92) यांचे आज सकाळी सहाला धुळे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने झाले. त्यांचे शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकिय क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. त्यांच्यावर दुपारी...
मार्च 06, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त रविवारी (ता.4) निजामपूर-जैताणे ह्या दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन शिवभक्त व शिवप्रेमींनी सजीव देखाव्यांसह शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढली. बग्गीवर स्वार...
फेब्रुवारी 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे व निजामपूर (ता. साक्री) येथील 'उम्मीद' फाउंडेशनतर्फे रविवारी (ता.18) दुपारी विष्णुनगरच्या प्रांगणात द्वितीय सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला. आमदार डी. एस. अहिरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत...