एकूण 2322 परिणाम
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 20, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विखेंमुळे भाजपला ताकद मिळण्याची चर्चा आहे. थोरातांनादेखील आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. या...
मे 20, 2019
सोलापूर - नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त सात गावांमधील पाणवठ्याच्या ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. २४ तास केलेल्या या गणनेमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काळवीट व रानडुकरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. या गणनेमध्ये एकही माळढोक पक्षी दिसला नाही. ११...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 17, 2019
खामगाव (बुलडाणा) : पेपर देऊन परत घरी येताना तरुणीचा खून करण्यात आल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास येथील संजीवनी कॉलनी भागात उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. आश्विनी सुधीर निबोकार (वय 27, रा. सनी पॅलेस जवळ, खामगाव) असे तरुणीचे नाव आहे. आश्विनी येथील लक्ष्मी नारायण...
मे 17, 2019
पुणे -  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा "मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या "जगाच्या अंगणात' या ग्रंथास विशेष वार्षिक ग्रंथास दिले जाणारे "मालिनी शिरोळे' पारितोषिक जाहीर झाले आहे....
मे 14, 2019
दोडामार्ग - येथे शहरातील बाजारपेठेत काल रात्री अडीचच्या सुमारास शाँटशर्किटमुळे आग लागली. या आगीत बाजारपेठेतील दुकाने भस्मसात झाली आहेत.  दोडामार्ग मुख्य बाजारपेठेतील सावंतवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. राजेंद्र बोंद्रे,आनंद बोंद्रे यांच्या इमारतींचेही या आगीत नुकसान झाले आहे. या...
मे 14, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघास आता भाजपने मतपेढी बनवलीय. आयात नेते भाजपमय झालेत. जिल्हा परिषद, महापलिका ताब्यात घेत त्यांनी बलाढ्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केलंय. काँग्रेसला तर लोकसभेची जागादेखील ‘स्वाभिमानी’साठी सोडावी लागली. अर्थात, लाटेवर स्वार भाजपला लोकसभेसाठी कसरत करावी लागलीच....
मे 13, 2019
आमलाविश्वेश्वर (अमरावती) ः चांदूररेल्वे तालुक्‍यातील आमलाविश्वेश्वर येथे भीषण पाणीटंचाई आहे. गावकऱ्यांना गुंडभर पाण्यासाठी दररोज भटकावे लागत आहे. ही अडचण पाहून सामाजिक जाण ठेवत श्रीसंत एकनाथ महाराज संस्थान मदतीसाठी पुढे सरसावले. कोणतीही शासकीय मदत न घेता संस्थान मागील दीड महिन्यांपासून आमला...
मे 11, 2019
सावंतवाडी : नरेंद्र डोंगर परिसरातील शौचालयाच्या टाकीत पडलेल्या रेड्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले आहे. जेसीबीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. यावेळी घटनास्थळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, सुरेंद्र बांदेकर यांनी भेट दिली व मदत कार्यात सहभाग घेतला होता....
मे 11, 2019
जळगाव : तरसोद ते फागणेपर्यंतच्या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंशतः सुरू करण्यात आले आहे. सुमारे शंभर मजूर या कामावर तूर्त काम करीत आहेत. संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराचे "फायनान्शिअल क्‍लोजर' बाकी होते. ते आता पूर्ण झाले असून, त्यास काम सुरू करण्याचे आदेशही महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत...
मे 11, 2019
खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) अखेर मुहूर्त सापडला. ‘एनएचएआय’च्या पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, दुकाने आणि फलक हटविले. शिंदेवाडी ते सारोळादरम्यान...
मे 11, 2019
चाकण - प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील दोन रुग्णालयांतील तीन डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.  सपना सुधीर पवळे (वय ३०, रा. वाकळवाडी, ता. खेड, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे...
मे 10, 2019
मंडणगड - तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी मंडणगड तालुक्यातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. भारतीय संघातून मंडणगड तालुका तायक्वॉंदो ऍकॅडमीचे हर्ष नीलेश गोवळे, दुर्वेश नीलेश जाधव, तेजकुमार विश्‍वदास लोखंडे, अभिषेक अशोक मर्चंडे, विशाखा संजय करावडे हे खेळाडू...
मे 10, 2019
पाटोदा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (ता. 10) पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सरकार या कुटूंबियांच्या पाठीशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फेही मदत करण्याचा विश्वास देऊन श्रीमती मुंडे यांनी कुटूंबियांना...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 10, 2019
मुंबई -  सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री...
मे 09, 2019
पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात यावी आणि धनादेश न वटल्याप्रकरणी संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पुणेकर नागरिक कृती समितीने केली आहे. तसेच, बॅंकेचे सभासद सुधीर आल्हाट यांनीही दोषी संचालकांवर फौजदारी दाखल...
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे. सरकारनगरात हरिश्‍...