एकूण 24 परिणाम
जानेवारी 11, 2020
संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणासाठी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली; पण या विषयावर बोलणे दिब्रिटो यांनी टाळले. त्यांना पूर्ण भाषण करता न आल्याने काही लेखकांनी...
जानेवारी 05, 2020
लातूर : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर लातूरातील एका विद्यार्थ्याने ‘वुमन सेफ्टी डिव्हाईस’ तयार केले आहे. विशेष म्हणजे हे डिव्हाईस केसांना लावलेल्या हेअर पिनसारखे, लिपस्टीकच्या नळीसारखे आणि चावीला लावलेल्या किचनसारखे आहे. त्याचा वापर करून महिलांना समोरच्या व्यक्तीला शॉक देऊन...
जानेवारी 02, 2020
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांना पाठविण्यात आले आहे. यापैकी कोणकोणते नेते रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित राहणार आणि ते उपस्थित राहिले तर साहित्य महामंडळ...
जानेवारी 01, 2020
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दरवर्षी वेगवेगळे ठराव मांडले जातात. पण, ते कागदावरून प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीत. मात्र, २०१५ मध्ये घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनातील एक ठराव पाच वर्षाने का होईना प्रत्यक्षात उतरत आहे. त्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने राज्य सरकारला पत्र पाठविले....
डिसेंबर 30, 2019
लातूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. त्यामुळे हा तपास एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. मारेकऱ्यांना पकडलं गेलेलं आहे. पण, सूत्रधार अद्याप पकडला गेला नाही. तो पकडणं, ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या...
नोव्हेंबर 29, 2019
लातूर : गेल्या साडेपाच महिन्यात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल ४५ लाख ४७ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईतून नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, ट्रीपल सिट प्रवास करणे, कागदपत्र नसताना वाहन चालवणे या घटनांमध्ये शहरात आणि जिल्ह्यात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत...
नोव्हेंबर 29, 2019
लातूर : ई-मेल आणि सोशल मीडियाच्या अति वापरामुळे पत्र लेखन करणे आणि नातेवाईकांना पत्र पाठविण्याची परंपरा इतिहास जमा होत चालली आहे. अशा काळात पुन्हा एकदा पत्र लिहिण्याची मजा अनुभवता यावी, त्याची सवय लागावी म्हणून टपाल विभागाने विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष...
नोव्हेंबर 19, 2019
लातूर  : सातत्याने वातावरणात होणारा बदल, संसर्गजन्य आजारात होत असलेली वाढ, डेंगी-मलेरिया अशा आजारांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रमाण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शहरातील रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात रक्त देता का रक्त, अशी विचारणा करण्याची वेळ रक्तपेढ्यांवर आणि...
नोव्हेंबर 17, 2019
लातूर : शहरातील वातावरणात गेल्या काही महिन्यांत धुलिकणांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. लातूरकर प्रत्येक श्वासातून धूळ फुफ्फूसात घेत आहेत; पण धुळीचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कुठलीही पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच हवेची गुणवत्ता ढासाळली असून ती आता धोक्याच्या पातळीपर्यंत पोचली...
ऑक्टोबर 24, 2019
लातूर : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अमित आणि धीरज या दोन्ही पुत्रांनी लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. विजयाचा टप्पा गाठल्यानंतर दोघांनीही बाभळगावातील विलासबागेत जाऊन विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळीला भेट दिली. वडिलांना विजय अर्पण करीत देशमुख पुत्रांनी...
एप्रिल 10, 2019
पुणे : पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार सुनिल चावके, सुशांत सांगवे, विनायक करमकर आणि अद्वैत मेहता यांना जाहीर. पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. मराठी पत्रकारितेत महत्वपूर्ण योगदान दिलेल्या पत्रकारास 'मुख्य पुरस्कार' आणि पत्रकारितेत उल्लेखनीय...
डिसेंबर 15, 2018
लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी अधिक जाणकार...
जून 08, 2018
राज्यभरातून कौतूकाचा वर्षाव; निकालानंतर ‘लातूर पॅटर्न’ चर्चेत लातूर : मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राज्यातील १२५ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. त्यात लातूर विभागातील तब्बल ७० विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. त्यांनी ‘लातूर पॅटर्न’चा झेंडा आणखी उंचावर नेला आहे. त्यामुळे या...
जानेवारी 26, 2018
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यामुळे साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर मराठीला अभिजात...
जानेवारी 12, 2018
गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रदेशाच्या नावांबरोबरच जात-धर्म यांच्या नावांवरसुद्धा संमेलने होत आहेत. याकडे पाहून तुम्हाला काय वाटते? - साहित्य, राजकारण, समाजकारण असे कुठलेही क्षेत्र असेल किंवा या क्षेत्रातला कुठलाही आविष्कार असेल तो जातीच्या नावाने आपण...
जानेवारी 10, 2018
विविध चित्रपट-लघुपटांच्या माध्यमातून तुम्ही समाजदर्शन घडविले आहे. आता या टप्प्यावर कोणते संकल्प तुम्ही केले आहेत? चित्रपटासाठी कुठला विषय खुणावतो आहे? - कुठलाही चित्रपट कोणा एकट्यामुळे तयार होत नाही. भोवतालच्या वेगवेगळ्या लोकांच्या मदतीने, त्यांच्या कौशल्याने तो आकाराला येतो, याचे मला भान आहे....
जानेवारी 03, 2018
चित्रकार ही तुमची मूळ ओळख. मग बालसाहित्याकडे कसे वळलात?   खरंय... मुळात मी चित्रकार आहे; पण शाळेत होतो तेव्हापासून लिहीत आलोय. माझी पहिली कथा 1965 मध्ये एका मासिकात प्रसिद्ध झाली होती. ती प्रसिद्ध झाल्यानंतर "मानधन घेऊन जाण्यासाठी या', असे पत्र मला आले. मी शालेय विद्यार्थी आहे, हे संपादकांना माहिती...
नोव्हेंबर 28, 2017
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या 'आपलं घर' या नळदुर्ग (उस्मानाबाद) स्थित सेवाभावी संस्थेला विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत देण्यात आली. सेवा दलाच्या पुणे मुख्यालयात झालेल्या विशेष बैठकीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - असे जगावे दुनियेमध्ये,  आव्हानाचे लावून अत्तर...  नजर रोखुनी नजरेमध्ये,  आयुष्याला द्यावे उत्तर...  अशा अनेक कवितांमधून वाचकांना प्रेरणा देणारे, कधी खळखळून हसविणारे तर कधी गंभीर होऊन विचार करायला लावणारे कविवर्य विंदा करंदीकर यांचे स्मारक उभे राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कोल्हापूर...
जुलै 20, 2017
पुणे - बेरोजगारीची लागण आता थेट कलाकारांपर्यंत येऊन पोचली आहे. हे वाचून अंगभूत कलेवर स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या कलाकारांवर अशी वेळ का आली असेल, असा प्रश्‍न नक्कीच तुमच्या मनात पडला असेल. याला कारण आहे, सरकारने नव्याने आणलेल्या "जीएसटी'चे. हा कर लागू होताच शहरात होणारे सांस्कृतिक...