एकूण 807 परिणाम
December 03, 2020
मुंबई-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर बॉलीवूडशी संबंधित अनेक मुद्दे चर्चेत होते. मग तो नेपोटिझमचा मुद्दा असो किंवा मग एनसीबीचा ड्रग प्रकरणाचा मुद्दा. या सगळ्या प्रकरणांमध्ये सोशल मिडियावर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोल केलं गेलं. त्यांच्या फोटोपासून ते पोस्टपर्यंत...
December 03, 2020
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईतील बॉलीवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात नेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही. त्यातल्या त्यात दिवास्वप्न पाहण्यात तर मुळीच कसला उपद्रव नाही. पण योगीजी ही जी उठाठेव करत आहेत ती उत्तर प्रदेशच्या विकासासाठीची आहे की महाराष्ट्राचे...
December 03, 2020
मुंबई ः मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व सातही आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये प्रमुख आरोपी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह राजपूत यांचाही समावेश आहे. हेही वाचा - शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी जवळपास एक हजार झाडांचा बळी मागील सहा...
December 02, 2020
उजळाईवाडी - खंडणी प्रकरणातील "किशोर माकडवाला गॅंग' विरोधात पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली. गॅंग प्रमुख किशोर मानेसह सहा जणांचा यात समावेश आहे. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यामार्फत टोळीविरोधात दाखल झालेल्या प्रस्तावास आज विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. त्यानुसार संबधित टोळी...
December 02, 2020
नवेखेड (सांगली) : दिल्ली येथे देशातील सर्व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जाचक कृषी कायदा रद्द करा व एम. एस. पी. लागू करा या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात महाराष्ट्रातून सुमारे तीनशे शेतकरी सहभागी झाली आहेत. प्रसंगी गोळ्या झेलू परंतु मागे हटणार नाही असा पवित्रा घेऊन शेतकरी या...
December 02, 2020
मुंबई - योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबईत आले आणि त्यावरुन मोठया गोंधळाला सुरुवात झाली आहे. योगी यांना बॉलीवूड हे युपीला न्यायचे आहे अशी चर्चा आहे त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आहे. मात्र योगी यांच्या मुंबईत येण्याचे आणि आम्ही बॉलीवूड मुंबईपासून बॉलीवूड न्यायला काही आलेलो नाही असे...
December 02, 2020
मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मॉडेल रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला आज विशेष एनडीपीएस न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मागील तीन महिन्यांपासून शौविक कारागृहात होता. 'ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपीकता...
December 02, 2020
औरंगाबाद : कोरोना महामारीचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसला. यात सुमारे पाचशे कोटींचे नुकसान झाले. औरंगाबादेतील पर्यटनस्थळांसह अजिंठा, वेरूळ लेण्या बंद असल्याने पाच लाख देशी व पंधरा हजार विदेशी पर्यटकांना या जागतिक स्थळांना भेटी देता आल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, एका पर्यटकामुळे स्थानिक अकरा...
December 02, 2020
मुंबई - कॉमेडियन भारती सिंहवर ड्रग्जचे आरोप करण्यात आले होते. तिला आणि तिच्या पतीलाही याप्रकरणी अटक केली होती. आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. पतीच्या सुटकेनंतर त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली त्यात तिनं आपल्या पतीविषयी लिहिले आहे. त्याच्याबद्दल गौरवादगार काढले आहेत. भारतीनं...
December 01, 2020
धुळे  ः शहरातील अंबिकानगरमधील एका बंद घरातून पोलिसांची काल (ता.३०) रात्री अकराच्या सुमारास चार ते पाच लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आवश्य वाचा-  अंगावर साधी जखम नाही तरी बिबट्याचा मृत्यू ? - शहरातील...
December 01, 2020
पुणे : मेट्रोच्या 10 मीटर उंचीवरील सिमेंटच्या खांबाला बसविलेले नटबोल्ट काढताना कामगाराचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यु झाला. कामगाराच्या मृत्युस जबाबदार असल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनंदनकुमार नंदकिशोर रमाणी (वय 23 , रा.नागपूर चाळ, येरवडा...
December 01, 2020
कोल्हापूर :  “मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”,अस सूचक वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी करत जयंत पाटील यांच्याविषयी बोलण्यास नकार दिला. आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात...
December 01, 2020
नागपूर : मानकापूर येथे सहा वर्षांपूर्वी नागपूरकरांसाठी सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलाला ५० मीटर लांब भागाला भगदाड पडल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा वर्षांमध्येच या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जाचे पितळ उघड पडले आहे.  सहा वर्षांपासून नागपूरकर कुठल्याही भीतीशिवाय मानकापूर उड्डाणपुलावरून ये...
November 30, 2020
रत्नागिरी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे हे सरकार नाही. त्यामुळेच सुनावणी दरम्यान वकील गैरहजर राहिले आणि अपेक्षित कागदपत्रही दिली नाहीत. अशी भयावह परिस्थिती आरक्षणाबाबत आहे. स्थगिती उठावी, असा अर्जही सरकारणे दिलेला नाही, असे परखड मत भाजपचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले.  शासकीय...
November 30, 2020
नाशिक : मंत्रीमंडळात, विधानसभेत ज्या-ज्या वेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला. त्यावेळी आपण स्वतः मराठा आरक्षणाला पाठींबा जाहीर केला. इतकेच नव्हे तर, समता परिषदेच्या अधिवेशनातून पाठींब्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, आम्हाला आरक्षणातून काढून टाकण्याची भूमिका समाजातील काही नेत्यांकडून घेतली...
November 30, 2020
सोलापूर : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रामांच्या प्रवेशांसाठी झालेल्या एमएचटी-सीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेत सोलापूर शहर व परिसरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. यावर्षी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती.    एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर...
November 29, 2020
मालेगाव (नाशिक) : तालुक्यात कापसाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय कापुस खरेदी केंद्रामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनामार्फत सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी (ता. 29) केले. महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस...
November 29, 2020
नाशिक : दिल्‍ली येथे रविवारी (ता.२९) झालेल्‍या एअरटेल दिल्‍ली मॅरेथॉन स्‍पर्धेत नाशिकच्‍या धावपटूंनी चमकदार कामगिरी करतांना यशाची परंपरा कायम राखली आहे. अर्ध मॅरेथॉन गटातून भारतीय महिला गटातून नाशिकच्‍या संजीवनी जाधव हिने दुसरा तर कोमल जगदाळे हिने तिसरे स्‍थान पटकावले आहे. भारतीय पुरूषांच्‍या गटात...
November 29, 2020
राजीवनगर (नाशिक) :  एक डिसेंबर पर्यंत नितीन घरी येणार होते, त्या संबंधित कालच सायंकाळी  (ता 28)  व्हिडिओ कॉल वर कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांची चर्चा देखील झाली होती. एवढेच नाही तर सुट्टीहून परत जाताना ते पत्नी, मुलगी आणि आईला देखील आपल्या सोबत नेणार होते. मात्र आज पहाटे रायपूर येथील रुग्णालयातून...