एकूण 932 परिणाम
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 18, 2019
नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पदुकोनचे दोन दिवसांपासून काही फोटो व्हायरल होत आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील हे फोटो असून ती एका हटके लूकमध्ये दिसत आहे. तिचा ड्रेस, अॅक्सेसरीज, मेकअप आणि तिची स्टाईल अशा सर्व गोष्टींचं कौतुक होत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हे खास फोटो शेअर केले आहेत...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 15, 2019
ऐन पावसाळ्यात खांडस गावापासून भीमाशंकरच्या चढाईला सुरवात केली होती. त्या अवघड रानवाटा, ते बेलाग सुळके, ती गर्द वनराई यांची आपल्याला एवढी भूल का पडते, ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’ म्हणत वारकऱ्याप्रमाणं डोंगरांच्या भेटीला आपण पुनःपुन्हा का येतो, याचं मनोमन आश्‍चर्य करत चालत होते. एका कड्याशी क्षणभर...
मे 12, 2019
भक्तिभावानं परिक्रमा करणारे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नर्मदेच्या तीरावर परिक्रमा करणारे या दोघांच्या पारड्यात नर्मदा कसं पुण्य टाकते, हे काही सांगता येणार नाही; पण नर्मदेच्या तीरावर असणारं प्रत्येक लेकरू हे माता नर्मदेला आपलं लेकरू वाटत असावं आणि त्याच वात्सल्यातून ती आपल्या लेकरांना कुरवाळत असावी...
मे 09, 2019
समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या...
मे 06, 2019
सांगली - समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव साजरा होत आहे. गेल्या १५ एप्रिलला १७४ वर्षे पूर्ण झाली असून सध्याचे १७५ वे वर्ष आहे. यंदाचे हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे व्हावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव या...
मे 03, 2019
पुणे - घरासाठी आणि घरसजावटीसाठी आवश्‍यक असलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या वस्तू एकाच छताखाली असलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला नागरिकांची चांगली पसंती मिळाली. म्हात्रे पूल आणि राजाराम पुलामधील डीपी रस्ता येथील पंडित फार्म येथे सुरू असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी...
मे 03, 2019
चित्रकार प्रभाकर बरवेंच्या ‘चित्र वस्तुविचार’ पुस्तकाच्या संपादनाची गोष्ट हेमंत कर्णिक सांगत होते. ते म्हणाले, ‘बरवेंच्या डायऱ्या, त्यांनी लिहिलेलं सगळं वाचून काढण्याचा पहिला प्रवास खूपच आनंद देणारा होता. बरवे सगळं काही पाहत ते आकार, अवकाशात. म्हणजे समोर झाड आहे, तर त्यांना झाडाची स्मृती नसेच,...
मे 02, 2019
बाभूळगाव (जि. यवतमाळ)  : अपत्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात मुलगा झाला तर सांगायलाच नको. पूर्वी मुलाच्या जन्माचा आनंद गावभर साखर वाटून साजरा केला जात असे. परंतु, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तालुक्यातील कोलही येथील काजळसरे दाम्पत्याने विविध प्रजातींची 25 झाडे लावून ते तीन वर्षे जगविण्याचा निर्धार...
एप्रिल 25, 2019
काही दिवसांपासून दक्षिणेकडील अभिनेत्री साई पल्लवी हिने एका सौंदर्य प्रसाधनाची दोन कोटींची जाहिरात नाकारली असल्याची बातमी सगळीकडे दिसत होती. सर्वत्र तिच्या या निर्णयावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, साईने जाहिरात नाकारून "चेहरा क्‍या देखते हो... दिल में उतरकर देखो ना!',...
एप्रिल 24, 2019
नव्या पैठणीत मैत्रीण छान सजली होती. ‘‘सुरेख दिसतेयंस!’’ या माझ्या अभिप्रायावर उसळून म्हणाली, ‘‘होच मुळी! पण, कुणाला कदर आहे का त्याची? ‘एफबी-इन्स्टा’वर फोटो टाकायचे म्हणून सकाळपासून केवढा खटाटोप केला. तास घालवला पार्लरमध्ये. पण, जेमतेम पन्नासेक लाइक्‍स आणि चार कमेंट्‌स...’’ फोटोशॉपनं देखणे केलेले...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली -  जगभरात 22 एप्रिल वसुंधरा दिन. यानिमित्त गुगलने आज खास डूडल केले आहे. गुगलने एक ऍनिमेटेड डुडल केले आहे.  या डुडलवर क्लिक केले असता एक व्हिडिओ प्ले होतो. यामध्ये पृथ्वी दाखविण्यात आली असून, तिचे सौंदर्य दाखविण्यात आले आहे. या गुगल डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील...
एप्रिल 20, 2019
पर्यावरणाचा ऱ्हास कमी करून पृथ्वीचं सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर अथक प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात २२ एप्रिलला ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात येतो.   नि सर्गात ‘एकाकी’ अशी कोणतीही गोष्ट नसते. सृष्टीतील अनेक गोष्टी...
एप्रिल 19, 2019
ठाणे - रस्त्यांवरील फलक, रथयात्रा, जाहीर सभा आणि काही वर्षांपासून समाज माध्यमे असे पर्याय प्रचारासाठी वापरले जात होते; मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेतील फेरीवाल्यांचीही मदत राजकीय पक्षांकडून घेण्यात आली असून, या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न विविध पक्षांकडून...
एप्रिल 14, 2019
"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा वैशिष्ट्यांमुळंच रेखीव नि घोटीव शैलीतून ते आपल्या प्रिय व्यक्ती क्ष-किरणांच्या भेदकतेनं जिवंत करतात,' असं निरीक्षण "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे माजी अधिष्ठाता प्रा...
एप्रिल 13, 2019
पिंपरी (पुणे) : प्रॉपर्टीचे पैसे मागते म्हणून बहिणीचा डोके आपटून तिचा खून केला. हा खून लपविण्यासाठी हृदयविकाराचा झटका आलेल्या बहिणीला रुग्णालयात नेत असताना मोटारीला आग लागून त्यात तिचा मृत्यू झाल्याचा देखावा भावाने निर्माण केला. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत अपघाताचा बनाव आठ महिन्याने उघडकीस आला...
एप्रिल 13, 2019
चेतना तरंग आपण एकदा शब्दांची निरर्थकता ओळखल्यास आपले जीवन सखोल होऊ लागते आणि आपण ‘जगणं’ सुरू करतो. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत शब्दांमध्ये जगत असतो. या उद्देश आणि उद्देशपूर्तीच्या शोधात आपण सर्व उद्देशच हरवून बसतो. त्यामुळे आपण शांतपणे झोपूही शकत नाही. आपण रात्रीही शब्दांमुळे चिंताग्रस्त होतो. अनेक...
एप्रिल 11, 2019
चेतना तरंग समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात. त्यापैकी काही समुद्राच्या मध्यभागीच नष्ट होतात. त्या किनाऱ्यापर्यंत पोचू शकत नाहीत. पाठीमागील लाटांकडून त्या ओढल्या जातात. सौंदर्याची मोठी लाट फक्त निरागसतेतून निर्माण होऊ शकते. तुम्ही कधी याचे निरीक्षण केलेय का? सौंदर्याची लाट अशा प्रकारे निरागसतेतून...
एप्रिल 07, 2019
शिरढोण - कवठेमहांकाळ तालुक्‍यातील शिरढोण गावापासून चार किमी तर बोरगावपासून अडीच किमी अंतरावर कलावंतीणीचे कोडे हे ठिकाण आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या याला आजही महत्त्व प्राप्त आहे. हे कोडे अध्याप सुटत नाही याबाबत लोकांत कुतूहल आहे.  कलावंतीणचे कोडे हे आज अखेर न सुटलेले कोडे आहे हे सोडवण्याचा...