एकूण 1329 परिणाम
मे 22, 2019
ढेबेवाडी - गेल्या अनेक महिन्यांपासून पाटबंधारे विभागासह ठेकेदाराने वाळूसाठी मोठे प्रयत्न केले. पण, जिल्हा प्रशासनाने त्याला दाद न दिल्याने अखेर मराठवाडी प्रकल्पाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे वाळूने मारले; स्टोनक्रश सॅण्डने तारले, असाच काहीसा प्रकार येथे दिसत आहे...
मे 22, 2019
वडगाव पंगू (जि. नाशिक) - गाव तस सधन. ग्रामविकासात उमद्या तरुणांची फळी. ‘जलयुक्त’ योजनेत गावाने कामांची विकास गंगा आणून ती पूर्णत्वास नेली. गावाने जिल्ह्यात दुसरा क्रमांकही मिळविला. मात्र, वरुणराजाने व पाणी योजनेच्या अभावाने गावाला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.  नांदगाव तालुक्‍याच्या शिवजवळ...
मे 20, 2019
औरंगाबाद : पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून वैजापूर, गंगापूर तालुक्‍यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, यामागणीसाठी सोमवारी (ता. 20) आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर उपोषणास बसले आहेत.  पाण्याचा...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
सोलापूर - नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त सात गावांमधील पाणवठ्याच्या ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. २४ तास केलेल्या या गणनेमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काळवीट व रानडुकरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. या गणनेमध्ये एकही माळढोक पक्षी दिसला नाही. ११...
मे 20, 2019
पुणे - मागील वर्षी तब्बल साडेतेराशे तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्येच शहरामध्ये आगीच्या तब्बल २७६ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणातील वित्तहानीबरोबरच पाच जणांचे जीव जाण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. घर, दुकाने, गोदामांच्या आगीपासून ते मोठमोठे कारखाने, कंपन्यांमध्ये लागणाऱ्या...
मे 20, 2019
राजापूर - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा फटका तालुक्‍यातील ओणी बाजारपेठेला बसणार आहे. ओणी येथे होणाऱ्या उड्डाणपुलामुळे बाजारपेठेचे दोन भागामध्ये विभाजन होणार आहे. त्यातून, अनेक वर्षांपासूनची दुकाने विस्थापित झाली. स्थलांतरामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट येण्याची भीती व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 17, 2019
नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा, विदर्भ विरुद्ध मराठवाडा, हा पाणीवाद नवा नाही. उत्तरेकडे अजिंठा, तर दक्षिणेकडे पसरलेल्या बालाघाटच्या डोंगररांगा व पठारावर वसलेल्या मराठवाड्यात पाण्याचे शाश्वत असे स्त्रोत नाहीत. याच डोंगररांगांनी विभागलेल्या गोदावरी, मांजरा व भीमा नदीच्या खोऱ्यात बहुतांश मराठवाडा वसलेला...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 15, 2019
आटपाडी - पाचवीला पूजलेल्या दुष्काळाने मेंढपाळ व्यवसायावर घाला घातला आहे. मोठे कळप केव्हाच मोडीत निघाले. पाचशेवर मेंढ्यांच्या कळपांसह मेंढपाळांनी यंदा तालुका सोडला आहे. तालुक्‍यातील जवळपास चारशेंवर मेंढपाळांनी कुटुंबासह मेंढ्यांसोबत स्थलांतर केले आहे. हे मेंढपाळ कोकण, वाई, सातारा आणि...
मे 15, 2019
आटपाडी - तालुक्यातील लेंगरेवाडी गावात दुष्काळामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोजगारासाठी अनेक गावकऱ्यांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे.  गावात फक्त अबाल वृद्ध आणि सुनसान वाटच पहावयास मिळत आहे. कायमचा दुष्काळ, ना रोजगार, ना पाणी, ना चारा, जगावे तर कसे? हा प्रश्न निर्माण झाल्याने गाव सोडण्याची...
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान...
मे 14, 2019
जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर व पोहाळे परिसरातील डोंगर पठारात असणारे वन्यजीव लांडगा, कोल्ही, साळींदर, इजाट,  ससे, रानडुक्कर, रानमांजर तसेच मोर, लांडोर, चिमण्या, टिटवी, बगळा, भोरड्या  अशा १२० प्रकारच्या पशुपक्षी यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. भागातील दोन  तीन तलाव कोरडे...
मे 14, 2019
पंढरपूर : दुष्काळात पाण्यासाठी रानमाळ हिंडणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना गेल्या सहा वर्षापासून एक तरुण स्वतःची शेती पडीक ठेवून तेच पाणी ग्रामस्थांना मोफत पुरवण्याचे काम करतोय तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील सुदाम शिंदे असे या अवलीया तरुणाचे नाव आहे....
मे 14, 2019
मुंबई - देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पाच उपकंपन्यांची कार्यालये मुंबईवरून गुजरातमधील अहमदाबादला स्थलांतर केली आहेत. पाचपैकी चार कंपन्या जिओशी संबंधित आहेत. एक कंपनी रिलायन्सला लागणाऱ्या गुंतवणुकीचा कारभार बघते. यापुढे या कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये...
मे 14, 2019
नवी मुंबई - मोठा उलवे येथील जिल्हा परिषदेची मराठी शाळा स्थलांतरित करण्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना आल्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित ग्रामस्थांनी सोमवारी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. या वेळी शाळेसंदर्भातील प्रलंबित  मागण्या पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 13, 2019
दहिवडी - संकट मोठं आहे, पण धीर सोडून चालणार नाही. सगळ्यांना एकत्र येऊन या संकटावर मात करावी लागेल. सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. ते देण्याचा आग्रह आम्ही करू. नाही दिलं तर सरकारचा काय बंदोबस्त करायचा तोही विचार करू, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी माणदेशी जनतेला दिलासा दिला. ...