एकूण 91 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरी, ग्रामीण भागात पूरपरिस्थिती पूर्वपदावर येत असताना बदलत्या हवामानामुळे साथीचे आजार फैलावत आहेत. रुग्णालयांमध्ये रुगणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  २६ आणि २७ जुलै आणि ३ आणि ४ ऑगस्ट या दिवशी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर बदलत्या हवामानामुळे अनेक...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई: मुंबईत डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असून, ऑगस्टमध्ये 15 दिवसांत डेंगीचे 465 रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पावसाने उसंत घेतल्याने साथीच्या आजारांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील साथीच्या...
जुलै 31, 2019
मुंबई - पावसाळा म्हटले की विविध आजार आलेच. अनेक संसर्गजन्य आजारांचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. एरवी मलेरिया, डेंगी, स्वाईन फ्लू आदींसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सध्या त्वचारोगाची समस्या भेडसावत आहे. ओले कपडे शरीरावर बराच काळ राहिल्याने नायटा आणि एक्‍...
जुलै 16, 2019
आरोग्य यंत्रणा सतर्क; आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनीही काळजी घेणे आवश्‍यक सातारा - पावसाच्या संततधारेमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’ने डोके वर काढले आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व...
जुलै 12, 2019
नाशिक - एरवी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवतो. परंतु या वर्षात पहिल्या सहामाहीमध्येच नाशिकला स्वाइन फ्लूचा विळखा पडल्याचे राज्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.  भविष्यात प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन राज्यातील तज्ज्ञांचे पथक नाशिकमध्ये येणार आहे. या वेळी...
मे 20, 2019
पुणे - कमाल तापमानाचा पारा चाळिशीवर पोचला असतानाही स्वाइन फ्लूच्या नवीन रुग्णांचे निदान होत आहे. तसेच स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना स्वाइन फ्लूच्या निदानाचे प्रशिक्षण देण्याची गरजही या...
मे 14, 2019
पुणे - शहरात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण व्हेंटिलेटर असून, कडक उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या डॉक्‍टरांपुढे चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्‍टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सर्वसाधारणतः जून-...
एप्रिल 25, 2019
मुंबई -  मुंबईत मार्चमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  या दोघी माझगाव आणि आग्रीपाडा येथील रहिवासी होत्या.  स्वाईन फ्लूचे निदान झाल्यामुळे 65 वर्षांच्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यानंतर...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद - हिवाळा-पावसाळ्यात आढळणारे स्वाइन फ्लूचे रुग्ण यावर्षी भरउन्हाळ्यात आढळू लागल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे; मात्र बेमोसमी आलेल्या स्वाइन फ्लूमध्ये औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यात शहरातील तिघांचा गेल्या दोन...
मार्च 31, 2019
नागपूर - शहरात स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच आहे. अवघ्या ७ दिवसांत संशयित स्वाइन फ्लूच्या बाधेने तब्बल १३ मृत्यू झाल्यामुळे उपराजधानी हादरली आहे. शनिवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयात झालेल्या मृत्यू विश्‍लेषण समितीच्या (डेथ ऑडिट कमिटी) बैठकीत स्वाइन फ्लूच्या १३ मृत्यूंवर चर्चा करण्यात आली असल्याची...
मार्च 24, 2019
नागपूर - मनपाचा आरोग्य विभाग स्वाइन फ्लू प्रतिबंधाबाबत सुस्त आहे. मनपाच्या एकाही हेल्थपोस्टमध्ये गर्भवतींना स्वाइन फ्लूचे लसीकरण होत नाही. विशेष म्हणजे नागपूर विभागात २४१ स्वाइन फ्लू बाधितांपैकी १७१ लागणग्रस्त नागपुरात आहेत. त्या तुलनेत एकूण २२ मृत्यूंमध्ये १३ मृत्यू...
मार्च 21, 2019
श्रीरामपूर (यवतमाळ) : शहरातील स्वाईन फ्लूने पुसद परिसरात पाय रोवले असून मंगळवारी( ता. 19) नागपूर येथे स्वाईन फ्ल्यू आजारावर उपचार घेणारा पुसद येथील एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागरीकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. श्रीरामपूर लगत असलेल्या सप्तगिरी काॅलनीतील रहिवासी प्रकाश...
मार्च 18, 2019
पुणे - स्वाइन फ्लूच्या ‘एच१-एन१’ विषाणूंचा संसर्ग झाल्याने १३ अत्यवस्थ रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात १ जानेवारीपासून आतापर्यंत ९० स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत.  शहरात यंदा कमाल आणि किमान तापमानातील तफावत जास्त होती. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री...
फेब्रुवारी 17, 2019
नागपूर - स्वाईन फ्लू ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. नागपूर विभागात स्वाइन फ्लूने १०४ जण बाधित झाले आहेत. यातील ४१ जण उपराजधानीतील विविध रुग्णालयात भरती असून, दोघांचा श्‍वास व्हेंटिलेटरवर सुरू आहे. नागपूर विभागात एक जानेवारीपासून या आजाराच्या रुग्णसंख्येने शतक गाठले...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्‍मीर या राज्यांतही या आजाराने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या आजारावरील प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार,...
फेब्रुवारी 08, 2019
वातावरणात फार मोठा बदल हा सहसा या रोगांना पोषक असतो म्हणजे दिवसा ऊन, रात्री कडक थंडी किंवा उष्णता व दमटपणा यांचे एकत्रीकरण हे या सूक्ष्म जीवजंतू फोफावण्यास साहायक ठरते. याशिवाय प्रतिकारशक्‍ती, वाढता ताण, अनैसर्गिक व्यवहार, अशक्‍त धातू, मंदावलेला अग्नी, अशुद्धता या गोष्टी संसर्गज, उपसर्गज रोगांना...
जानेवारी 29, 2019
सोलापूर : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाल्याने स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात स्वाईन फ्लूमुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात सद्यःस्थितीत 75 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली...
जानेवारी 26, 2019
मुंबई - वातावरणातील बदलांमुळे राज्यात काही ठिकाणी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. महिन्याभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी विभागाने पाच कलमी कार्यक्रम राबवावा, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यात...
जानेवारी 21, 2019
नवी दिली- भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा रद्द झाला आहे. शहा हे 24 जानेवरीला सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांना आठवडाभर दिल्लीतल्या 'एम्स'मध्ये उपचारासाठी दाखल रहावं लागलं होतं. त्यामुळे...
जानेवारी 20, 2019
नवी दिल्ली : स्वाईन फ्लूमुळे एम्स रुग्णालयात उपचार सुरु असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला. ईश्वर की कृपा से अब मैं पूर्ण रूप से स्वस्थ हूँ और आज अस्पताल से डिस्चार्ज होकर अपने आवास पर आ गया हूँ। मेरे स्वास्थ्य लाभ के लिए आप सभी के द्वारा...