एकूण 173 परिणाम
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर: 'मी शपथ घेतो की आजपासून प्लास्टिकच्या कॅरिबॅग किंवा अन्य प्लास्टिक वापरणार नाही.. जे कोणी वापरतील त्यांनाही प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करेन..' स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकचा ध्वज वापरणार नाही.. अशी प्लास्टिक मुक्तीची शपथ 'सकाळ'च्यावतीने एसव्हीसीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. ...
ऑगस्ट 14, 2018
सोलापूर : भारतीय मसाल्यांचे पाश्‍चात्त्य देशांना पूर्वीपासूनच आकर्षण... ते आजही टिकून असल्याचा अनुभव आला चक्क मूळचा सोलापूरचा असलेल्या ओंकार जंजिराल या आंतरराष्ट्रीय ब्लॉगरमुळे... भारतीय मसाल्यांवर ओंकारने लिहिलेल्या ब्लॉगची भुरळ चक्क गुगलला पडली असून गुगलने त्याला थेट आपल्या सिलिकॉन व्हॅलीतील...
ऑगस्ट 14, 2018
आपल्याला स्वातंत्र्य हवं असतं. हक्क हवे असतात. अधिकार हवे असतात. मात्र, या सगळ्या बाबींबरोबर येणाऱ्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक जबाबदाऱ्यांचं भान आपण कितपत बाळगतो? हे भान बाळगण्यासाठी काय काय करावं लागेल? हक्क-अधिकारांबाबत दाखवली जाणारी जागरूकता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावण्यासंदर्भातही आपण दाखवायला...
ऑगस्ट 14, 2018
अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा "लूक' बदलणार नागपूर : महापालिकेतील अग्निशमन विभागाचे कर्मचारी, अधिकारी अन्‌ खाकी गणवेश, असे अनेक वर्षांपासूनचे सूत्र आता बदलणार आहे. स्वातंत्र्यदिनापासून अग्निशमन विभागातील कर्मचारी व अधिकारी नव्या गणवेशात दिसून येणार आहेत. एखाद्या दुर्घटनेदरम्यान खाकी रंगाच्या...
ऑगस्ट 13, 2018
गोवा - स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमावेळी सभापती प्रमोद सावंत यांना ध्वजारोहण करण्यासाठी गोवा सरकारने नेमणूक केल्याप्रकरणी त्याविरोधात अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पत्रवजा याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची...
ऑगस्ट 13, 2018
नगर : भारतीय जनता पक्षातर्फे 15 ते 31 ऑगस्ट या कालखंडात "नमन वीर जवानांना आणि वंदन बळिराजाला' नारा देत तिरंगा यात्रा व भारत गौरव पर्वचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पालकमंत्री राम शिंदे हे या यात्रेचे उद्‌घाटन करतील, अशी माहिती खासदार दिलीप गांधी...
ऑगस्ट 13, 2018
बुलडाणा : काही दिवसांपूर्वी जंतर मंतर येथे काही समाजकंटकांनी भारताचे संविधान फाडले होते, तसेच थोर नेत्यांबाबत अपशब्द वापरले होते, त्यामुळे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे, अशी पोस्ट भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने सोशल...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे...
ऑगस्ट 12, 2018
औरंगाबाद - देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलाची शस्त्रे कशी असतात, हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, या हेतूने शनिवारी (ता. ११) भारतीय लष्करातर्फे ‘नो युअर आर्मी मेला’अंतर्गत छावणीतील मैदानावर शस्त्रप्रदर्शन भरवण्यात आले होते. यात तब्बल २,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शस्त्रांची माहिती घेतली. टीव्ही...
ऑगस्ट 12, 2018
मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही...
ऑगस्ट 12, 2018
प्रत्येक वेळी केवळ "भारत माझा देश आहे' म्हणून भागत नाही. "भारत माझा देश आहे' म्हणताना "मी देशाचा कोण आहे,' हा प्रतिप्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. माझी कर्तव्यं मी करतो का? "स्वच्छ भारत' होताना त्याचं लघुरूप "नागरिक' म्हणून स्वच्छतेची काही तत्त्वं पाळावीत हे महत्त्वाचं नसतं का?... मी भरलेल्या कराचा...
ऑगस्ट 10, 2018
सावंतवाडी - सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांचा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी  होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव घ्यावा व...
ऑगस्ट 09, 2018
महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ आंदोलनातून सामान्य भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध एकत्र केले. आजच्या बदलत्या परिस्थितीत जातीयता, विषमता, महिला अत्याचार, भ्रष्टाचार आदी सामाजिक अपप्रवृत्तींना ‘चले जाव’ म्हणायला हवे. भा रतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्यदिनाबरोबरच क्रांतिदिनालाही वेगळे स्थान आहे. खरे तर,...