एकूण 18 परिणाम
डिसेंबर 21, 2018
मुंबईः सकाळी साडेसहाच्या सुमारास कारागृह उप अधीक्षक आले आणि म्हणाले तुझी सुटका होत आहे, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. वाक्य कानावर पडताच प्रचंड आनंद झाला आणि एक क्षणही वाया न घालवता अर्धा तास काय तर काही मिनिटातच तयार झालो अन् पळत-पळत जाऊन गाडीत बसलो, असे पाकिस्तानी कारागृहातून सहा वर्षे शिक्षा...
ऑगस्ट 12, 2017
हमीद अन्सारी यांचे वक्तव्य हे अल्पसंख्याक समाजाच्या भावनांचे प्रतीकात्मक उद्‌गार समजून त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. त्याऐवजी त्यांना थेट प्रत्युत्तर दिल्याने सत्ताधारी वास्तवाकडे कशी पाठ फिरवू पाहत आहेत, याचेच दर्शन घडले.  भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्षी...
मे 19, 2017
नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो)ला आज 2014च्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2014 मध्ये या पुरस्काराची...
एप्रिल 19, 2017
नवी दिल्ली: संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी कायम आपले भरीव योगदान देणाऱ्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच राज्यसभेचा 65 वा वर्धापन दिन सोहळा आज बालयोगी सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. राजकारणाचा वाराही न लागलेल्या या कार्यक्रमाला राज्यसभा सचिवालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते....
एप्रिल 18, 2017
नवी दिल्ली : नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांचे आज भारत भेटीवर आगमन झाले. अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. भारताबरोबरील संबंध मजबूत करण्यासाठी त्या भारतीय नेतृत्वाबरोबर चर्चा करणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने ट्‌विटरद्वारे दिली आहे.  भारत आणि...
एप्रिल 09, 2017
अलिगढ - "केवळ तीन वेळा "तलाक' असे म्हटल्याने घटस्फोट होत नाही. मुस्लिम महिलांनी धर्मगुरूंवर अवलंबून न राहता कुराणचा सखोल अभ्यास करावा,'' असे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी व्यक्त केले.  तोंडी तलाकच्या मुद्‌द्‌यावर देशभर सध्या...
एप्रिल 01, 2017
राज्यसभेत दिग्विजयसिंह यांचे मानले "खास आभार' नवी दिल्ली- कॉंग्रेसला जबरदस्त धोबीपछाड देऊन भाजपचे सरकार बनविणारे गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पंधरवड्यानंतर आज अचानक काही मिनिटांसाठी राज्यसभेत प्रकटले आणि त्यांना नुसते पाहूनच कॉंग्रेस सदस्यांचा भडका उडाला. पर्रीकरांनीही,...
मार्च 22, 2017
जेटलींवर अप्रामाणिकपणाचा आरोप; भाजप सदस्य संतप्त नवी दिल्लीः राम जेठमलानी यांनी आज खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच अप्रामाणिकपणाचा जाहीर ठपका ठेवल्याने राज्यसभेत एकच गदारोळ माजला. जेठमलानींच्या ताशेऱ्यामुळे खवळलेल्या भाजप सदस्यांनी त्यांना बोलूच न देण्याचा पवित्रा घेतला. या वेळी अनेक मंत्रीच...
मार्च 09, 2017
नवी दिल्ली: अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरवातीलाच होळीच्या निमित्ताने सुट्यांचे दिवस एका दिवसाने वाढवण्याची मागणी राज्यसभेतून समोर आली आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत अनेक पक्षनेत्यांनी, होळीनिमित्त एकाऐवजी दोन दिवस (ता. 13 व 14 मार्च) सुटी देण्याची मागणी केल्याचे समजते....
फेब्रुवारी 13, 2017
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा पूर्वार्ध नुकताच पूर्ण झाला. आता उत्तरार्ध किंवा दुसरा भाग नऊ मार्चला सुरू होणे अपेक्षित आहे. पहिल्या भागाची समाप्ती ज्या कडवट पद्धतीने झाली, ती पाहता पुढील भाग सुरळीत चालण्याबद्दल आताच शंका व्यक्त होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक ठरावावर...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली - आभासी जगात झालेली ओळख... ओळखीतून प्रेमाची अनुभूती... त्यानंतर प्रेयसीचे कुटुंबीयांकडून जबरदस्तीने लग्न ठरविल्याने प्रियकर निराशेतून सीमापार आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात जातो. मात्र तिथे पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात सापडून त्याची रवानगी तुरुंगात होते....
डिसेंबर 16, 2016
नवी दिल्ली- विरोधी खासदारांनी सातत्याने कामकाज बंद पाडल्याने राज्यसेभेचे 241 वे सत्रामधील कामकाज अजिबात पार पडू शकले नाही. यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.  सभागृहातील सर्वच घटकांनी सतत कामकाज बंद पाडल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हमीद...
डिसेंबर 02, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीवर राज्यसभेतील चर्चा गेला आठवडाभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावे, यासाठी रोखणाऱ्या कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आज पंतप्रधान आले, तरी ही चर्चा होऊ दिली नाही. नोटाबंदीवर संसदेबाहेर विरोधकांवर काळा पैसा दडविल्याचा सर्रास आरोप करणाऱ्या मोदींनी माफी मागावी, अशी मागणी पुढे...
नोव्हेंबर 20, 2016
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींसह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अभिवादन केले. सफदरजंग रोडवरील त्यांच्या घरी सर्व मान्यवरांनी तर पंतप्रधान...
ऑक्टोबर 20, 2016
नवी दिल्ली - उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आज आपला हंगेरी आणि अल्जेरियाचा पाच दिवसांचा दौरा पूर्ण करून मायदेशी परतले. या दोन्ही देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान हंगेरी आणि अल्जेरियाने दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी धोका असून, त्याचा समूळ नायनाट झाला पाहिजे...
ऑक्टोबर 02, 2016
नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पना, गरीब आणि अन्यायग्रस्तांसाठी काम करण्यासाठीची समर्पित वृत्ती प्रेरणादायी असल्याचे म्हणत त्यांनी जगाला आणखी सुंदर बनविल्याच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. महात्मा गांधी यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त राजघाट येथे त्यांना...
सप्टेंबर 30, 2016
‘एलओसी’ओलांडून सर्जिकल स्ट्राइक; उरी हल्ल्याचा घेतला बदला नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ११ दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी काल मध्यरात्रीपासून आज...
सप्टेंबर 29, 2016
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ठार मारल्याची घोषणा भारताने केल्यानंतर या कारवाईवर अचानक प्रकाशझोत पडला आणि पाकिस्तानने थयथयाट सुरू केला. पार्श्‍वभूमी उरीतील दहशतवादी हल्ल्यात आपले 18 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी...