एकूण 418 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - तूर, हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ‘एनसीडीईएक्‍स ई-मार्केट लि.’ या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र ‘नाफेड’ने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक...
फेब्रुवारी 17, 2019
जळगाव ः शाळेत जाणाऱ्या मुलांना आहार देवून तंदुरुस्त बनविण्याऐवजी ठेकेदारांचे पोषण करणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेत यंदा शिक्षण संचालकांकडून पुन्हा एकदा दरांमध्ये फेरफारीचा प्रताप केला आहे. राज्यातील ठेकेदारांकडून शासन बाजारपेठेत सध्या असलेल्या दरापेक्षा दुप्पट दराने डाळी, तेल आणि मसाले खरेदीचे दर...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या व्यवस्थांनी शेतकऱ्यांनाच ओरबडण्याचे काम केले. किंबहुना, अनेकांनी शेतकऱ्यांना लुटण्यातच धन्यता मानली. हजारो वर्षांपासून हा लुटीचा इतिहास असाच आहे’, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.  येथील ताराराणी विद्यापीठातर्फे आयोजित ‘...
फेब्रुवारी 15, 2019
मालवण - शेतकर्‍यांच्या ३४ हजार कोटीची कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली जाईल यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. मात्र गेल्या दिड वर्षात याची कार्यवाही न करता शेतकर्‍यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले, असा आरोप किसान क्रांती...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - साखरेच्या किमान विक्री किंमतीत प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवर पोचला असून, साखर उद्योगाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  यावर्षीच्या साखर हंगामात साखरेची ठप्प मागणी आणि निर्यात साखरेचा...
फेब्रुवारी 13, 2019
खामखेडा (नाशिक) - जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र, गेल्या आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मक्याला २ हजारांचा दर ओलांडून तो २१००रुपयांवर पोहोचला. वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असले तरी...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - खरीप हंगाम 2017-18 मध्ये तूर हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने एनसीडीईएक्‍स ई-मार्केट लि. या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र "नाफेड'ने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांनी...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली- स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य बनले आहे. दिल्लीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्याचे मानले जात आहे.  केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी : लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. तसेच लोकायुक्ताच्या नव्या कायद्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) सांगितले. तसेच अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या...
फेब्रुवारी 04, 2019
बारामती - केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली वार्षिक सहा हजारांची मदत ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. आम्हाला ही तुटपुंजी मदत आणि सरकारची दयापण नको. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या आणि घामाला योग्य दाम द्या, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मोदी सरकारवर घणाघाती टीका केली....
फेब्रुवारी 03, 2019
लोणी काळभोर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक अंत्यत गांभीर्याने घेतली आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीस पराभूत करण्याची ताकद एकाही विरोधी पक्षात नसतानाही, केवळ आमच्याच पक्षातील लोकांनी, विशेषतः पक्षाच्या स्टेजवर मिरवणाऱ्यांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड...
फेब्रुवारी 02, 2019
कडेगाव -  सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीबद्दल आणि शेतीमालाला हमीभाव देण्याबद्दल चकार शब्दही नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये म्हणजे महिन्याला ५०० रुपये  दिले जाणार आहेत. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न आहे. सुशिक्षित बेरोजगारांना...
फेब्रुवारी 01, 2019
राळेगणसिद्धी : केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे इलेक्शन स्टंट आहे. हे सरकार म्हणजे घोषणाबाज व फसवे सरकार आहे, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. अण्णा म्हणाले, की निवडणूका आल्या की घोषणा खूप होतात. निवडणूक काळात आश्वासनांची गाजरे दाखवली जातात. मात्र अंमलबजावणी होत नाही....
जानेवारी 26, 2019
सोलापूर : दुष्काळ, गारपीट, अवकाळी अन्‌ गडगडलेले शेतमालांचे दर, बॅंकांचा कर्जवाटपात ठेंगा व सरकारी मदतीची प्रतीक्षा आणि डोक्‍यावरील सावकाराचे कर्ज या प्रमुख कारणांमुळे मागील पाच वर्षांत राज्यात तब्बल 14 हजार 74 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये अमरावती विभाग अव्वल असून औरंगाबाद विभाग...
जानेवारी 26, 2019
देशाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर असणारा तरुणवर्ग लोकशाहीकडे कसं बघतो? हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रजासत्ताकदिनी तर याची चर्चा व्हायलाच हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग असून सोशल मीडियाच्या जमान्यात अभिव्यक्त होणं तुलनेने खूपच सोप्पं झालंय. विविध आर्थिक-सामाजिक...
जानेवारी 08, 2019
सातारा - राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची थकित एफआरपीची रक्कम चार हजार कोटींवर गेली आहे.  तर जिल्ह्यातील कारखान्यांकडून 15 टक्के व्याजासह ही रक्कम 100 कोटींच्या घरात जात आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. याची पहिली ठिणगी उद्या (सोमवारी)...
जानेवारी 03, 2019
जळगाव - भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधक असताना कापसाला सात हजारांचा भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग आठ दिवस आंदोलन केले. ते सत्तेत आल्यानंतर हमीभावाविषयी बोलत नाही. तुम्ही ‘एसी’त बसून हमीभाव कसा अधिक मिळवता येईल ते सांगताहेत, यापेक्षा शेतकऱ्यांना अधिक हमीभाव...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 26, 2018
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कापसाने शेतकऱ्यांना सुरुवातीस चढे दर देत दिलासा दिला खरा; मात्र हंगाम संपत येत असताना होत असलेली घसरण आता त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवू लागली आहे. डिसेंबरमध्ये कापसाच्या दरात तब्बल साडेतीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. उत्पादनाच्या सरासरीने आधीच घायकुतीला आलेला...
डिसेंबर 24, 2018
भडगाव : शासनाने मोठा गाजावाजा करत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. मात्र, खरेदीची सक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर हमीभावाचा नुसता पोरखेळ सुरू असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात 16 पैकी 11 खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यातून मका 4...