एकूण 2155 परिणाम
जून 02, 2019
मुंबई - सीएनजी दरवाढीचे कारण पुढे करत टॅक्‍सीचे किमान भाडे २२ वरून ३० रुपये आणि रिक्षाचे किमान भाडे १८ वरून २२ रुपये करण्याची मागणी चालकांच्या संघटनांनी केली आहे. तसे पत्र मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियनने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले आहे. या मागणीबाबत १५ दिवसांत निर्णय न झाल्यास संपाचा इशारा या...
जून 02, 2019
औरंगाबाद - कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. यावर सरकारने तत्काळ अनुदान जाहीर करीत पहिल्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा केले; परंतु दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी...
जून 02, 2019
विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता...
जून 02, 2019
पुणे - एकीकडे मिळकतकर थकबाकीदारांच्या घरापुढे जाऊन बॅंड वाजविण्याची वेळ महापालिकेपुढे येत असताना, दुसरीकडे शिस्तबद्ध पुणेकरांचा ऑनलाइन मिळकतकर भरण्याकडे कल वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत साडेपाच लाख नागरिकांनी तब्बल ६९९ कोटी ८१ लाख ६५ हजार ६९० रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यापैकी...
जून 01, 2019
नांदेड : ओळखीचा फायदा घेऊन एका महिला वकिलावर तीन वकिलांनी अत्याचार करून चित्रिकरण केले. बदनामीची धमकी देऊन पुन्हा अत्याचार करणाऱ्या वकिलांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.  पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन अहमदपूर (जिल्हा लातूर) येथील एक महिला वकिली...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 31, 2019
नागपूर - स्वस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. परंतु, खचाखच गर्दीमुळे रेल्वेप्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. सव्वा वर्षात केवळ नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतच रेल्वेप्रवासात ५९१ प्रवाशांनी जीव गमावला. याच काळात धावत्या रेल्वेतून पडून तब्बल १४६ जणांचा मृत्यू झाला. माहिती...
मे 31, 2019
पवनानगर - पवना धरणात २० टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो १५ जुलैपर्यंत पुरेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली माहिती.  पवना धरणात २०.५१ टक्के साठा शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत तो सात टक्के कमी झाला आहे. मॉन्सून लांबणीवर पडल्यास मावळसह पिंपरी-चिंचवडकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो....
मे 31, 2019
सातारा - ‘तंबाखूसेवन जानलेवा है, तंबाखू से कॅन्सर होता है!’ हे तंबाखूच्या पुडीवर लिहिलेले असते; पण ते वाचतो कोण? आणि वाचले तर त्याचे पालन करतो कोण? तब्बल दहा भारतीयांपैकी एक जण तंबाखूचे धूम्रपान करत असल्याचे ‘गॅटस’च्या सर्वेक्षणात सामोरे आले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ११.९ टक्‍के, शहरी भागांमध्ये...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 30, 2019
पुणे : गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेस मुक्कामी असलेल्या मॉन्सूनने अखेर आज (ता. ३०) चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्रातील मालदिव बेटांच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे.   नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग...
मे 30, 2019
पुणे - इमारतीच्या बांधकामांसंदर्भात लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासंदर्भात पूर्वलक्ष्यीप्रभावाने अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर दोन गट पडल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशा बांधकामांना लष्कराकडून ‘ना हरकत...
मे 30, 2019
मुंबई - बनावट मद्य रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन ‘ॲप’ विकसित करणार आहे. मद्याच्या बाटलीच्या झाकणावरच बारकोड लावण्यात येणार असून, ते झाकण मोबाईलमध्ये असणाऱ्या ‘ॲप’द्‌वारे स्कॅन केले तर मद्य बनावट आहे की अस्सल, हे ओळखता येणार असल्याचा दावा राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे...
मे 30, 2019
पुणे - साबुदाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने भावात वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात साबुदाण्याचे भाव प्रति किलो वीस ते तीस रुपयांनी वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यापारीही अडचणीत आले आहेत. दर कमी झाले नाही, तर आम्ही साबुदाण्याची विक्रीच करणार नाही, अशा इशारा साबुदाणा व्यापारी...
मे 30, 2019
एका वर्षात प्रवाशांची संख्या चार हजारांवरून ४४ हजारांच्या पुढे पुणे - रेल्वे प्रवाशांना अनारक्षित तिकिटे ऑनलाइन पद्धतीने काढता यावीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या ‘यूटीएस मोबाईल ॲप’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ॲपद्वारे तिकिटे काढणाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. एका...
मे 29, 2019
औरंगाबाद - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (ता. २८) जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.२२ टक्‍के इतका लागला आहे. यंदाही जिल्ह्यात मुलांपेक्षा नेहमीप्रमाणे मुलींनीच आघाडी...
मे 29, 2019
सुहृदांनी व्याजासह फेडले १४ लाख रुपये सांगली - सलगरे येथील शिक्षक राजू सातपुते (वय ३२) यांचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. वृद्ध आई-वडील, पत्नी, सहा वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी असा संसार उघड्यावर पडला. त्यातच घरासाठी काढलेल्या १३ लाख ६८ हजार रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा...
मे 29, 2019
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाने एक महत्त्वाचे वळण घेतले आहे आणि ते म्हणजे तंत्रज्ञानावरील बंदीचे. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले, पहिल्या क्रमांकाचे आणि श्रेष्ठ स्थान गमवायचे नाही. चिनी तंत्रज्ञान कंपन्या आपली विविध उपकरणे, उत्पादने, तुलनेत स्वस्तात विकून...
मे 28, 2019
सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा ठिकाणी, सर्वेक्षण आणि अभ्यास करून, योग्य जागा नक्की करून भूमिगत बंधारा बांधावा. या उपायामुळे विहिरीतील पाणी साठवण्याचा कालावधी साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो.  मागील भागात आपण भूमिगत...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी शंका व्यक्त...