एकूण 319 परिणाम
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीचा घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद आज (गुरुवार) लोकसभा आणि राज्यसभेत उमटले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तर, राज्यसभेतही गोंधळ पहायला मिळाला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच...
नोव्हेंबर 17, 2016
नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांनी ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार न करता...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावर आतापर्यंत उलटसुलट भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आज या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवत मोदी सरकारला घरचा आहेर दिला. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्स या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करत शिवसेनेनेही लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमी पक्ष, कॉंग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे पोरबंदर येथील खासदार विठ्ठलभाई हंसराजभाई राडदिया यांनीच मोदींच्या...
नोव्हेंबर 13, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर कॉंग्रेसने टीका केल्याच्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेसला उत्तर देण्यात येईल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजु म्हणाले, "लवकरच संसदेचे सत्र सुरू होणार आहे...
नोव्हेंबर 12, 2016
सकाळी सकाळी "हजारपती' सैर भैर होते, बंद बॅंकांच्या शटरांकडे टकमक पाहणारा सर्वसामान्य माणूस पाहून प्रश्न सुटला का निर्माण झाला असा प्रश्नच पडला. नरेंद्र मोदी यांनी स्थिर भाषण करत देशाला अस्थिर केले. दंडाला कापूस लावून नस शोधून मोदींनी इंजेक्‍शनची सुई खुपसली अन्‌ हळुवारपणे आपला आर्थिक कावा केला....
नोव्हेंबर 11, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णयावर टीका करणारे समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष दहशतवाद आणि काळा पैसा यांचे समर्थन करतात का? असा प्रश्‍न भारतीय जनता पक्षाच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. शाह म्हणाले, "मागील दोन दिवसांपासून...
नोव्हेंबर 06, 2016
नवी दिल्ली - छट पूजेदरम्यान मारहाण केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) आमदार ऋतुराज यांना आज (रविवार) दिल्ली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अमन विहार भागात शनिवारी छट पूजा साजरी होत असताना ऋतुराज यांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी काही जणांना मारहाण...
नोव्हेंबर 06, 2016
नवी दिल्ली - दिल्लीमधील प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्‍वभूमीवर या राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (रविवार) सकाळी आणीबाणीची बैठक बोलाविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून यामध्ये प्रदुषणाच्या संकटावर नियंत्रण...
नोव्हेंबर 05, 2016
रामपूर (उत्तर प्रदेश) - 'ओआरओपी'च्या मुद्‌द्‌याचे "राजकीय नाटक' आणि देशाच्या सुरक्षा दलांच्या मानसिकतेच्या खच्चीकरणाचा हा कट असल्याची संभावना करणाऱ्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी निषेध...
नोव्हेंबर 04, 2016
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या रॅलीदरम्यान आत्महत्या करणाऱ्या गजेंद्रसिंह यांच्या कुटुंबियांनी दिल्ली सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न उपस्थित केले असून नुकसान भरपाई देताना दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला आहे. 'वन रॅंक वन पेन्शन'साठी आंदोलन करताना आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या...
नोव्हेंबर 02, 2016
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, लाभाचे पद भूषविल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने 27 आमदारांना नोटीस बजावली आहे.   काही दिवसांपूर्वी या आमदारांचे सदस्यत्व रद्द केले जावे, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. जून महिन्यामध्ये ही याचिका सादर झाल्यानंतर राष्ट्रपती...
ऑक्टोबर 15, 2016
अहमदाबाद - सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसीय दौऱ्यावर असलेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना येथील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे.  पटेल समुदायास ओबीसी दर्जा देण्याच्या मागणीस पाठिंबा दिल्यास "पाटीदार अनामत आंदोलन समिती‘...
ऑक्टोबर 07, 2016
नवी दिल्ली- पाकिस्तानला उघडे पाडण्याच्या कोणत्याही कामात आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत. सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. भारतीय जवानांनी सीमेवर जो पराक्रम केला त्याला आम आदमी पक्ष आणि देशातील प्रत्येक नागरिक सलाम करत आहे, शुभेच्छा देत आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते कुमार...
सप्टेंबर 23, 2016
पंजाबची माती, पाणी आणि माणूस सारेच कसदार, दमदार; परंतु 1980 च्या दशकातील "खलिस्तान‘वाद्यांच्या हिंसक आंदोलनामुळे सारी रया गेली. प्रतापसिंग कैरॉ या कॉंग्रसेच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबला आघाडीचे राज्य बनविण्यासाठी पाया रचला होता. पुढे कॉंग्रेस आणि अकाली दलांच्या राजवटीत राज्याचा आलेख घसरत गेला....
सप्टेंबर 21, 2016
चंदीगड - जैन साधू तरुण सागर यांच्याबद्दल असभ्य शेरेबाजी केल्याप्रकरणी चर्चेत आलेले संगीतकार विशाल ददलानी यांनी आज (बुधवार) जैन साधूंची आश्रमात जाऊन भेट घेत माफी मागितली. जैन साधूंनी विशालची माफी स्वीकारली आहे.   या प्रकरणी विशाल ददलानीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धार्मिक भावना...
सप्टेंबर 09, 2016
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'टीम बी‘ असल्यासारखे वागत असल्याची टीका आम आदमी पक्षाने आज (शुक्रवार) केली आहे.  सिद्धू यांनी आवाज-ए-पंजाब नावाचा नवा पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली आहे. तसेच हा पक्ष...
सप्टेंबर 01, 2016
नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील राजधानी दिल्लीत सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष म्हणजे ‘अलिबाबा आणि 40 चाळीस चोर‘ असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील निलंबित महिला व बालविकासमंत्री संदीप कुमार यांची एक अश्‍लील सीडी समोर आली आहे....
ऑगस्ट 10, 2016
संसद भवनाच्या सुरक्षेतील त्रुटींचे चित्रण करून त्याचा व्हिडिओ "फेसबुक‘वर टाकण्याचे "आप‘चे खासदार भगवंत मान यांचे कृत्य बेजबाबदारपणाचे आहे. त्यांच्या या "दुःसाहसा‘ची दखल घेऊन "आप‘नेही त्यांच्यावर कारवाई करायला हवी. आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांनी संसद भवनाच्या सुरक्षेतील त्रुटींचा...