एकूण 1543 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - गणिताचे पाढे, विज्ञानाचे धडे, भाषेचे व्याकरण यांची घोकंपट्टी होणाऱ्या वर्गांमध्ये आता संगीताचे सूरही निनादणार आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्यांदाच गायन आणि वादन या कलांचे धडे गिरविण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात  काही निवडक...
नोव्हेंबर 19, 2018
लातूर - वाल्याचा वाल्मीकी झाला, ही पौराणिक कथा आपल्याला माहिती आहे. अशीच एक खरीखुरी घटना मध्य प्रदेशातील चंबलघाटी गावात घडली. पैशांसाठी शंभरहून अधिक लोकांना ठार मारलेला, कित्येक लोकांचे अपहरण केलेला, हजारो ठिकाणी दरोडे घातलेला एक कुख्यात डाकू गांधी विचारांच्या संपर्कात आला आणि त्याचे जीवनच बदलून...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना पौड रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात मारहाण झाल्याची चर्चा रविवारी होती. मात्र, याबाबत तरडे यांनी असे काही झाले नसल्याचे  सांगितले. तरडे यांच्या कार्यालयात दुपारी जमाव आला होता. त्यांनी चित्रपटातील एका गाण्यातील नृत्याबाबत...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
नोव्हेंबर 18, 2018
मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर गमतीदार होतं. जोशी यांनी ‘सत्यकथा’ मासिकासाठी एकदाच कथालेखन केलं. नंतर त्यांनी कधीच ‘सत्यकथा’साठी लिहिलं नाही. याचं कारण...
नोव्हेंबर 18, 2018
अनेकदा आपण नकारात्मक विचारांनी स्वतःला इतकं बंदिस्त करून घेतो, की मार्गच सापडत नाही. "राइज' या वेब सिरीजचा नायक असाच दिशाहीन झालेला आहे. एका "रोड ट्रिप'मुळं त्याला अक्षरशः "दिशा' सापडते आणि जगण्याचं गमकही कळतं. अतिशय छोट्याछोट्या प्रसंगांतून, संवादांतून जगण्याचं मर्म सांगणाऱ्या या वेब सिरीजविषयी...
नोव्हेंबर 14, 2018
बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे बालपण ज्यांच्या मानसपुत्रांच्या सान्निध्यात गेले, ते "सुपरहिरोंचे बाप' स्टॅन ली आता या जगात नाहीत. "बचपन का खेल है, बच्चों का नही' असे एक पृच्छवाक्‍य...
नोव्हेंबर 13, 2018
कवठेमहांकाळ - देशिंग येथील अग्रणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  डॉ. सुनीलकुमार लवटे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अग्रणी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी दयासागर बन्ने यांनी दिली. राज्यस्तरीय अग्रणी साहित्य पुरस्कार आणि देशिंग भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा देशिंग भूषण...
नोव्हेंबर 13, 2018
नागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आज (सोमवार) शिक्कामोर्तब केले. गेल्या अनेक दिवसांपासून या  विषयावर शक्‍यता आणि अशक्‍यतांचे सावट होते, मात्र मंजुळे यांनी...
नोव्हेंबर 13, 2018
गाव म्हटलं की टपऱ्या आल्या. तिथे चहाची टपरी असतेच. वाफाळलेला चहा आणि सभोवार गप्पांचा फड असे चित्र प्रत्येक खेड्यात दिसते; पण असेही गाव आहे, की जिथे चहा विकला जात नाही. pic.twitter.com/PX2K0DgO8d — sakal kolhapur (@kolhapursakal) November 13, 2018 कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा...
नोव्हेंबर 12, 2018
भुकेल्यांच्या हाती क्रांतीचा उजेड देणारे "गुलसितां' नागपूर : लक्ष्मीच्या कपाळावर कुंकू नाही, तरीही तीन लेकरांसहित जीवनाचं हिरवं स्वप्न डोळ्यात. परंतु, भूकबळी ठरलेल्य लक्ष्मीच्या जाण्याने लेकरांचा आधार गेला. मोठा मुलगा "वामन्या'च्या डोळ्यांतून रक्ताश्रू वाहत होते. परंतु, न खचता दुःख झेलत वाघिणीचं...
नोव्हेंबर 11, 2018
नाशिकः ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.अविनाश डोळस यांचे औरंगाबाद येथे आज सकाळी 5.30 वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. गेल्या तीन महिन्यांपासून मी त्यांच्या सतत संपर्कात होतो. ' त्यांचे निधाची घटना अंत्यत दुखद आणि धक्का देणार आहे, अशा शब्दात नाशिकचे जेष्ठ लेखक प्रा.गंगाधर अहिरे यांनी...
नोव्हेंबर 10, 2018
मुंबई : नेटफ्लिक्स या अमेरिकन स्टुडिओकडून येत्या वर्षभरात भारतीय कथांवरील चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या 'कोबाल्ट ब्लू' या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सचिन कुंडलकर यांनी स्वतः याबाबतची माहिती फेसबुकवर प्रसिद्ध केली आहे....
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही..! त्यामुळेच "सकाळ माध्यम समूहा'ने यंदा दिवाळी अंकांमधील निवडक मजकुराचा "ऑडिओ दिवाळी अंक' प्रकाशित केला आहे. "सकाळ' आणि "स्टोरीटेल' यांनी मिळून हा ऑडिओ दिवाळी अंक सजविला आहे.  "शब्ददीप', "तनिष्का', "सकाळ साप्ताहिक', "प्रीमिअर', "...
नोव्हेंबर 06, 2018
रोजच्या जगण्यातील नानाविध समस्यांचे भेंडोळे काही काळ मनाबाहेर करून लक्ष दिव्यांनी घर उजळून टाकण्याची ऊर्मी म्हणजे माणसाच्या सकारात्मकतेचेच एक रूप आहे. ही सकारात्मक परंपराच आपल्याला पुढील संघर्षासाठी बळ देत असते. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी आश्‍विन आणि कार्तिकाच्या संधिकालात गारठा नुकताच पाणवठ्यांवर...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...