एकूण 3525 परिणाम
डिसेंबर 12, 2018
मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त दुसरा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार "जैत रे जैत' या चित्रपटाला जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना सन्मानित...
डिसेंबर 12, 2018
जम्मू-कश्‍मीरकडील संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीत आणि चित्रपट तसंच सुगम संगीतातही मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व शिष्य असलेले राहुल शर्मा स्वतःही प्रयोगशील संतूरवादक म्हणून देशपरदेशात ख्याती मिळवीत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्यांचं वादन पूर्वीही झालेलं...
डिसेंबर 12, 2018
पतियाळा घराण्याचा तालीमदार, जोरकस गायकी जपणारा सौरभ साळुंखे हा तरुण गायक. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथम पदार्पणाच्या संधीमुळे तो सध्या भारलेल्या अवस्थेत आहे. हैदराबादच्या निजामांकडे राजगायक असलेल्या पूर्वजांच्या कामगिरीचा वारसा पुढे न्यायची जबाबदारी पेलतानाच चित्रपट व अल्बमसाठी...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील वर्षी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का यापूर्वीच झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटी घेऊन ऑस्ट्रेलिया पोहोचली आहे...
डिसेंबर 11, 2018
राजापूर - काकस्पर्श, नटसम्राट आदी  गाजलेल्या चित्रपटांसह टीव्ही मालिका आपल्या दमदार अभिनयाने गाजविणाऱ्या सविता मालपेकर यांनी ग्रामीण भागातील परिस्थितीला गांजलेली पत्नी आणि आई अशी दुहेरी भूमिका ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटामध्ये साकारली आहे. संवेदनशील सामाजिक विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - करातून सवलत देण्याच्या मागणीसाठी "व्हॅनिटी व्हॅन' कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला. त्यामुळे मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर काहीअंशी परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आझाद मैदान पोलिसांना निवेदन सादर केले. कलाकारांनी मात्र पाठिंबा दिलेला नाही, असे "व्हॅनिटी...
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...
डिसेंबर 10, 2018
'कॉमेडीकिंग' भाऊ कदम अभिनित 'नशीबवान'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. अचानक त्यांच्या आयुष्यात असे काहीतरी घडते ज्यानंतर त्यांचे नशीब पालटते. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी...
डिसेंबर 10, 2018
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण 50 ते 60 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या...
डिसेंबर 10, 2018
घोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांचे दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर देहूरोड (पुणे) येथील सैनिकी स्थळावर झाले. ब्रिगेड कमांडर ओ. पी. बिष्णोई, लेफ्टनंट कर्नल...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. ‘...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘नाळ’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला. या चित्रपटांनी महिनाभरातच एकूण ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या चित्रपटांच्या यशामुळे मराठी चित्रपटांच्या...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत स्थलांतरित झाले आणि अतिदुर्गम भागातील मातीशी सुधाकरचीही "नाळ' जुळली. लहानपणापासूनच चित्रपटांचा लईभारी शौक म्हणून त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
डिसेंबर 08, 2018
प्रश्न : राज्यसभेत नियुक्त सदस्य म्हणून काम करताना कलावंत म्हणून आपला अनुभव कसा होता? बी. जयश्री : काम करण्याची ऊर्मी असेल तर कुठेही काम करता येतं. मात्र, कलावंत या नात्यानं मला सरकारकडून कला व संस्कृतीशी निगडित कार्यक्षेत्रांत काम करायला मिळालं असतं, तर आणखी चांगली कामगिरी करता आली असती. मला...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : "सॅनिटरी नॅपकिन'विषयी घरात कधीही मोकळेपणाने बोलले जात नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी आलेल्या अक्षय कुमारच्या "पॅडमॅन' चित्रपटामुळे महिलाच नव्हे, तर पुरुष मंडळीही आता व्यक्‍त होऊ लागले आहेत. नागपूरच्या काही तरुण मंडळींनी जागोजागी "सॅनिटरी नॅपकिन्स'च्या विक्रीचा अनोखा उपक्रम राबवून...
डिसेंबर 08, 2018
ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं,...
डिसेंबर 07, 2018
राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने खराखुरा अस्सल ग्रामीण बाज असलेला ‘हॅलो मी चेअरमन बोलतोय’ या नाटकाचा प्रयोग बुधवारी (ता. ५) भुयेवाडी (ता. करवीर) येथील संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या टीमनं सादर केला. दोन वर्षांपासून स्पर्धेत दचकतच प्रवेशिका भरणाऱ्या या टीमचा हा प्रयोग तितकाच रंगतदार झाला.  नाटक...
डिसेंबर 07, 2018
नागपूर - ‘झुंड’ चित्रपटाच्या ‘शूटिंग’च्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन चार दिवसांपासून उपराजधानीत आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड तगमग सुरू आहे. मात्र, कडेकोट बंदोबस्त व ‘बाउन्सर्स’च्या मनमानीमुळे त्यांची घोर निराशा होत आहे. अगदी घराच्या पल्याड ‘शूटिंग’ सुरू असूनही परिसरातील...