एकूण 754 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
इस्लामाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ओसामा बिन लादेनसंदर्भातील आरोपावरुन पाकिस्तानने मंगळवारी अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून ट्रम्प यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत पाकिस्तानने त्यावर कडाडून निषेध नोंदविला. इतिहासातील हे प्रकरण आम्ही बंद केले असून, यामुळे...
नोव्हेंबर 20, 2018
इराणवर निर्बंध लादताना भारताला त्या देशाकडून तेलाची आयात करण्यास तूर्त सवलत देण्याचा अमेरिकेचा निर्णय हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजय म्हणावा लागेल. त्यामुळे तेलसंकट लांबणीवर पडले आहे. परंतु, ते पूर्णपणे टळलेले नाही, याचे भान ठेवलेले बरे.  डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय...
नोव्हेंबर 19, 2018
सौदी अरेबियातून अमेरिकेत स्थायिक झालेले पत्रकार जमाल खशोगी यांची तुर्कस्तानात झालेली क्रूर हत्या जेवढी खळबळजनक होती, तेवढेच या हत्येच्या तपासावरून सुरू असलेले राजकारण आणि टोलवाटोलवी धक्कादायक नि संतापजनक आहे. ही हत्या नेमकी कुणी केली, तिच्या कटाचे सूत्रधार कोण, याच्या मुळाशी जाण्याची कोणाची इच्छा...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या चर्चेनंतरही...
नोव्हेंबर 17, 2018
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या "नाटो" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे वेगळे स्वतंत्र सैन्य निर्माण करायचे काय, याचा विचार करू लागलाय. या संदर्भात पुढाकार घेतलाय, तो फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांनी. पहिल्या...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण होऊन तो बुधवारी प्रतिबॅरल ६५.१७ डॉलरवर आला. खनिज तेलाच्या भावात आज ७ टक्के घसरण झाली.  तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ने तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचे धोरण कायम ठेवावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले...
नोव्हेंबर 15, 2018
वॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (ता. 13) व्यक्त केला.  ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये काल दिवाळी साजरी केली. या प्रसंगी भारतीय व अमेरिकी उच्चपदस्थ उपस्थित होते....
नोव्हेंबर 13, 2018
युद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीचे स्मरण करताना निर्माण झालेल्या या वादंगाचा विचार जगाला करावाच लागेल.  नव्वद लाखांच्या आसपास सैनिक आणि सत्तर लाखांवर नागरिकांचा बळी घेणाऱ्या...
नोव्हेंबर 10, 2018
आधुनिक लोकशाहीचा पाया हा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रेंच राज्यक्रांती, तसेच अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झालेल्या यादवीद्वारे घातला गेला. अर्वाचीन इतिहासात अमेरिकेची लोकशाही सर्वांत जुनी ठरली. अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाच्या मंथनातून जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन अशी रत्ने निघाली, तर...
नोव्हेंबर 06, 2018
अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारसंघर्षाची पाकिस्तान ही आणखी एक रणभूमी होत असल्याचे दिसते. या संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक भूमिका घेत आहेत आणि चीनला नमविण्यासाठी पाकिस्तानचा प्याद्यासारखा वापर करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. प्र स्थापित सरकारच्या विरोधात आंदोलन करताना खुशाल...
नोव्हेंबर 04, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा मांडत यामुळे अमेरिकेतील करदात्यांना दरवर्षी शंभर कोटी डॉलरचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. बेकायदा स्थलांतरितांसाठी अमेरिकेच्या सीमा खुल्या केल्या जाव्यात, या विरोधकांच्या मागणीचाही...
ऑक्टोबर 28, 2018
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी संचलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी दिलेले निमंत्रण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले आहे. या संदर्भात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पत्र दिले आहे. या पत्राच्या...
ऑक्टोबर 26, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक सेलफोनवरील संभाषण रशिया आणि चीनचे गुप्तहेर चोरून ऐकत असतात, असा दावा करणारे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. आता या वृत्ताची 'व्हाईट हाऊस'ने दखल घेत ट्रम्प यांच्याकडे केवळ एकच अधिकृत आयफोन असून त्याचे...
ऑक्टोबर 26, 2018
वॉशिंग्टन - ‘फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन’च्या (एफईआरसी) अध्यक्षपदी भारतीय वंशाचे नील चटर्जी यांची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवड केली. ही संस्था अमेरिकेच्या पॉवर ग्रीडची देखरेख आणि अब्जावधी डॉलरच्या ऊर्जा प्रकल्पांबाबत निर्णय घेते.  ‘एफईआरसी’चे विद्यमान...
ऑक्टोबर 17, 2018
न्यूयॉर्क - भारताने चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत २२ अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका अहवालातून समोर आली आहे. परकी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या ‘टॉप-१०’ देशांच्या यादीत भारताने यंदाही आपले स्थान कायम राखले आहे.   यूएनच्या व्यापार व विकास...
ऑक्टोबर 17, 2018
सौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत आहेत. जमाल खशोगी हे त्यातील ताजे उदाहरण. या घटनेतून त्यांनी आपल्या पुढील कारभाराची दिशाच सूचित केली आहे. सौ दी अरेबियाच्या अभ्यासकांच्या यादीमध्ये...
ऑक्टोबर 16, 2018
सौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका त्यांना परिणामकारक विरोध करण्याची शक्यता खूपच क्षीण आहे. ‘स र्व प्रकारच्या युद्धांत काही ना काही चुका होतातच.’ येमेनमधील हौती बंडखोरांच्या विरोधातील...
ऑक्टोबर 14, 2018
पुरुषसत्ताक पद्धतीवर नेमकेपणानं भाष्य करणारी आणि स्त्रीच्या मुक्ततेचा एक क्षण अधोरेखित करणारी "ज्यूस' ही शॉर्टफिल्म अतिशय उत्तम आहे. "मसान' या चित्रपटामुळं प्रसिद्धीच्या झोतात आलेले नीरज घेवन यांनी दिग्दर्शित केलेली ही शॉर्टफिल्म. समाजव्यवस्थेवर अतिशय तरलपणे भाष्य करणाऱ्या या शॉर्टफिल्मविषयी......
ऑक्टोबर 11, 2018
देशांतर्गत बँकिंग आणि बिगर वित्तीय कंपन्यांना लागलेल्या ग्रहणातून भारतीय शेअर बाजार सावरत असतानाच आज पुन्हा एकदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. आज सेन्सेक्स 759 अंकांनी घसरून 34,001 वर स्थिरावला तर निफ्टी 225 अंकांच्या घसरणीने 10,234 वर बंद झाला. जागतिक घडामोडी आणि त्यातही प्रामुख्याने...
ऑक्टोबर 11, 2018
न्यूयॉर्कः #MeToo ही मोहीम जगभरात गाजते असून, अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तनाबाबत बोलत आहेत. परंतु, आरोप करणाऱयांनी सबळ पुरावे द्यावेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फस्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर #...