एकूण 4115 परिणाम
जानेवारी 16, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात काम करणारे ६० टक्के कर्मचारी मराठी आहेत. प्रकल्पाच्या कामासाठी मनुष्यबळ नियुक्त करताना स्थानिक आणि मराठी व्यक्तींना प्राधान्य द्यावे, असे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत, असे महामेट्रोने एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.  मेट्रो प्रकल्पात...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरोड संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या मुख्य तीन रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून, सात रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण या दहा पक्‍क्‍या रस्त्यांमुळे...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत.  महापालिकेचा बीआरटीएस, झोपडपट्टी...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची (पीएफ) रक्‍कम न भरणाऱ्या दोनशे कंपन्या शहरात आढळल्या असून, त्यांच्यावर कारवाईला सुरवात झाली आहे. यामध्ये आयटी कंपन्यांना कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे.  पीएफ कार्यालयाने आतापर्यंत पीएफ न भरणाऱ्या ५० कंपन्यांची बॅंक खाती सील केली...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - भोसरी-नाशिक मार्गावरील अमली पदार्थविरोधी पथक कार्यालयाचे मासुळकर कॉलनीलगतच्या भाजी मंडई आवारात स्थलांतर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. २६ जानेवारीला कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे.  पोलिस आयुक्त कार्यालयाअंतर्गत हे कार्यालय सुरू करण्यात आले असून, या पथकामार्फत परिसरात...
जानेवारी 15, 2019
भवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित आईवडिलांनी चारही मुलांना आश्रमशाळेत ठेवलं. दहावीपर्यंत त्यांचा संपर्कही झाला नाही. पण, जग बदलायचे आहे हा जो जो मंत्र आईवडिलांनी दिला. तो मनात साठवला...
जानेवारी 15, 2019
पिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा जाहिरातींद्वारे रुग्णांना फसवणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या बनवेगिरीला अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, फसवणुकीनंतरही बदनामी अथवा प्रतिष्ठेमुळे त्यांच्याविरुद्ध...
जानेवारी 15, 2019
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यानच्या लोकलचे अचूक वेळापत्रक तयार करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. येत्या जून महिन्यापर्यंत या मार्गावरील सर्व लोकल ‘इन टाइम’ धावणार आहेत. त्यामुळे उशिरा धावणाऱ्या लोकलमुळे होणारा प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. सध्या ही लोकल ९४ टक्‍के वेळेवर धावत असल्याचा दावा...
जानेवारी 15, 2019
पिंपरी - निगडीकडून किवळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलासाठी लोहमार्गावर ५० मीटर लांबीचे सात लोखंडी गर्डर टाकण्याचे काम मंगळवारपासून (ता. १५) चार दिवस करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून रोज दुपारी एक तास दहा मिनिटे कालावधीचा ब्लॉक मंजूर केला आहे. रावेतमधील शिंदे वस्तीजवळ दुपारी एक वाजून ४०...
जानेवारी 15, 2019
नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली.  २७६ सदनिका असलेल्या या सोसायटीत रोज एक टन कचरा संकलित केला जातो. त्याचे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा वीस बाय चार फुटांच्या हौदात एकत्र केला. नगरसेवक नाना काटे, शीतल...
जानेवारी 14, 2019
पिंपरी : उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून ट्रक पलटी झाला. ही घटना सोमवारी (ता. 14) सकाळी पावणेसातच्या सुमारास निगडीतील पवळे उड्डाण पूल येथे घडली. पुण्याहून देहूरोडच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक (केए 32, सी 6381) सकाळी पावणे सातच्या सुमारास निगडीतील पवळे उड्डाण पुलावरून आला. उड्डाण पुलाच्या...
जानेवारी 14, 2019
पिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे घडली. विश्वनाथ वाल्हे (रा. दर्शन नगरी, चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने अंबरनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन...
जानेवारी 14, 2019
पिंपरी (पुणे) : प्रवासी म्हणून बसलेल्या चार चोरट्यांनी दमदाटी करित मोटार पळवून नेली. ही घटना चिंचवड ते कात्रज घाट दरम्यान घडली. विशाल नागनाथ रणदिवे (वय २०, रा. ठाणे बँकेच्या मागे, दत्तवाडी आकुर्डी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार चोरटय़ांच्या विरोधात गुन्हा दाखल केला...
जानेवारी 14, 2019
खडकवासला - लग्न ठरल्यानंतर तृप्ती पेंडा यांना मज्जारज्जूशी संबंधित गंभीर आजार आहे, ही बाब चाचण्यांमधून निष्पन्न झाली. सर्व आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर खिळून राहावे लागेल, याचीही डॉक्‍टरांनी कल्पना दिली. मात्र मेजर शशिधरन नायर यांनी ठरलेले लग्न न मोडता, त्यांच्याशीच विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला....
जानेवारी 14, 2019
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि ऑटोमोबाइल हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तळेगाव, चाकण परिसरातील मुख्य चौकांमधे आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाने या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार...
जानेवारी 14, 2019
पिंपरी - पिंपळे सौदागर येथील शिवार चौक आणि पिंपळे निलखमधील बाणेर पुलाजवळ महापालिकेच्या वतीने दोन नवीन उद्याने विकसित केली जात आहेत. तर पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरण केले जात आहे.  पालिकेच्या उद्यान-स्थापत्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबई येथील ‘लिनियर गार्डन’च्या...
जानेवारी 14, 2019
पिंपरी - पिंपरी मंडईत फेरफटका मारताना सत्तरीतील व्यक्ती टाकाऊ भाजीपाला गोळा करताना हमखास दिसते. डोक्‍यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा, भरदार पांढऱ्या मिशा, हातात रबरी मोजे आणि सोबत लाल रंगाचा तीन चाकी ई-रिक्षा टेम्पो, ही त्याची ओळख. विक्रेत्यांकडील टाकाऊ भाजीपाला गोळा करायचा आणि चिंचवड येथील समरसता...
जानेवारी 14, 2019
पिंपरी - मकर संक्रांतीचा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी बाजारात खण (सुगडी), तीळ, हलवा, वाणाच्या साहित्यासह काळ्या साड्यांच्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली. त्यामुळे तिळगूळ, हलवा, खोबरे, सुकामेवा, बांगड्या, मिठाईची दुकानेही सजली आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे....
जानेवारी 13, 2019
पुणे : मुख्यमंत्री साहेब, आम्हाला एक मंत्रिपद देऊन दिलेले आश्वासन पूर्ण करा, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर आमच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्यावा. सत्तेचा कार्यकाळ संपायला दहा महिने राहिल्याने, रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या...
जानेवारी 13, 2019
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. डीपीला लागलेली आग इतकी भयानक होती की व्यक्ती तिथेच जळून खाक झाली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग शमविली आहे.  काळेवाडी फाटा ते डांगे चौक या बीआरटी मार्गालगत हा डीपी...