एकूण 46 परिणाम
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 18, 2018
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण निवडणुकीच्या भाषणासारखे झाल्याने त्याची दखल घेणे आवश्‍यक आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतरच सारे काही चांगले घडले, असा त्या भाषणाचा आविर्भाव होता. त्यांच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, हे नाकारण्याची गरज नाही. त्यामुळे केलेल्या कामाचे त्याचे...
ऑगस्ट 11, 2018
स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही स्वतःच्या विकासासाठी आदिवासी समूह लढा देत आहे. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा प्रकाश आदिवासींच्या पाड्यांपर्यंत पोचला आहे का, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. आदिवासी शब्दाचा अर्थ आदि निवास करणारा. ज्या वेळी इंग्रज भारतात आले, त्या वेळी इंग्रजांच्या दृष्टीने जे त्या वेळी...
ऑगस्ट 11, 2018
बालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. बा रा वर्षांखालच्या बालिकांवरील बलात्काराच्या...
जुलै 28, 2018
दक्षिण आशियात भारतानंतर भौगोलिक, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य या दृष्टीने त्याच तोलामोलाचा देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. तेथे नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या; पण त्या लोकशाहीच्या कसोट्यांवर उतरल्या काय, हा प्रश्न संपूर्ण जगाला पडलेला असला तरी याचे उत्तर "नाही' हेच आहे. असे का? याची उकल...
जुलै 26, 2018
झुंडशाहीकडून केल्या जाणाऱ्या "इन्स्टन्ट' न्यायदानाच्या घटनांनी आपल्या वर्तमानाचे तोंड काळे झालेले असताना राजकारणातील वाचाळवीरांच्या जिव्हांना फुटलेले धुमारे चिंताजनक आहेत. आज काय तर गाईची तस्करी केल्याच्या संशयावरून अमक्‍याला संतप्त जमावाने ठेचून मारले, उद्या काय तर दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न...
जून 30, 2018
एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारत हा स्त्रियांसाठी जगातला सर्वाधिक धोकादायक आणि असुरक्षित देश असल्याचे जाहीर झाले आहे. हा अहवाल तयार करताना ‘थॉम्सन रायटर्स फाउंडेशन’ संस्थेने जगातल्या तज्ज्ञांचे मत विचारात घेतले. त्यात भारतातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे निकषांचा आधार घेऊन जगातल्या...
मे 28, 2018
आयर्लंडमध्ये गर्भपातविषयक कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूने सार्वमतातून प्रकटलेला जनमताचा हुंकार हा तेथे आधुनिकतेची पहाट उगवत असल्याचा निर्वाळा आहे. या हक्कासाठी तेथील स्त्रियांना तीन दशके चळवळ करावी लागली, ही बाब स्त्री-स्वातंत्र्याच्या बाबतीत विविध समाजांची वाटचाल कशी रखडणारी आहे, याचेच द्योतक....
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
एप्रिल 26, 2018
बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे तथाकथित ‘बाबा’ आसारामला भले धडा मिळाला असेल; पण त्यापासून खरा बोध घ्यायला हवा तो अशा भोंदूबाबांच्या नादी लागून आपले सर्वस्व गमावणाऱ्या भाविकांनी. त थाकथित ‘बाबा’ आसाराम याला एका अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची...
एप्रिल 24, 2018
बलात्कारांच्या बातम्यांनी, अत्याचारांच्या अफवांनी मागण्यांच्या मोर्च्यांनी दगडफेक्‍यांच्या दंगलींनी बडबोल्यांच्या बातांनी थापाड्यांच्या थापांनी बापजाद्यांच्या बापांनी उबून गेला कुणी एक, त्याचा अखेर फुटलाच बांध... आभाळाकडे हात उभारुन वाकडे बोट रोखून ओरडला तो खच्चून- ‘‘अरे, तुझ्या काळरात्रीला नाहीच...
एप्रिल 23, 2018
जम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लंडन दौऱ्यात संतप्त निदर्शनांचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तीन लेगार्ड यांच्यासह...
एप्रिल 19, 2018
वक्‍तृत्वकला हे काही फक्‍त निवडणुका जिंकण्यापुरते अस्त्र नसते, हा गुण कारभार करतानाही वापरण्याची परिपक्‍वता नेत्याच्या ठायी असायला हवी. डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबद्दल लगावलेला टोला त्यामुळेच त्यांनी गांभीर्याने घ्यावा. व्य वहारात वाणीचा जेवढा उपयोग होतो, त्यापेक्षा...
एप्रिल 16, 2018
जम्मू भागातील कथुआमध्ये आठ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या पाशवी बलात्कारप्रकरणी सर्वप्रथम मौन सोडताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी लिहिले - ‘वुई हॅव फेल्ड असिफा ॲज ह्यूमन्स!’  व्ही. के. सिंह माजी लष्करप्रमुख आहेत. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया येणे अनपेक्षित होते; पण जम्मू-काश्‍मीर- लडाख...
एप्रिल 13, 2018
उन्नाव आणि कथुआतील बलात्काराच्या घटना ‘कायद्याचे राज्य’ या तत्त्वाच्या चिंधड्या उडविणाऱ्या आहेत. पोलिसच गुन्हेगारांशी हातमिळवणी करीत असतील, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचे, असा प्रश्‍न त्यामुळे उपस्थित झाला आहे. उ त्तर प्रदेश या देशातील सर्वांत मोठ्या राज्यात वर्षभरापूर्वी दणदणीत बहुमत मिळवून...
मार्च 29, 2018
‘आम्ही समाजाच्या भल्यासाठी काम करतो’, या दाव्याच्या आधारावर खाप पंचायतींची मनमानी चालते, ती मोडून काढायलाच हवी. त्यासाठी केवळ सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पुरेसा नाही. अनिष्ट प्रथांच्या विरोधातील बंडाला सामाजिक पाठबळ मिळाले पाहिजे. ‘परंपरेच्या बागेत संस्कृती बहरत असते,’ असे म्हटले जात असले तरी साऱ्याच...
फेब्रुवारी 13, 2018
पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीला अटक व्हावी म्हणून लोकांना अलीकडेच रस्त्यावर यावे लागले. पोलिसांच्या निष्क्रियतमुळे ते संतप्त झाले आहेत. वास्तविक स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार अशी प्रकरणे हाताळण्यातील तिथल्या...