एकूण 49 परिणाम
सप्टेंबर 16, 2018
दलित शब्दाविषयी राष्ट्रीय माध्यमांत जे काही प्रसिद्ध होत आहे ते सर्व खरे नाही. दलित म्हणजे कोण आणि अनुसूचित जाती, जमाती म्हणजे काय? याचा अभ्यास खोलवर जाऊन केला पाहिजे. ‘दलित’ या शब्दाची व्याख्या केवळ बौद्धांपुरतीच मर्यादित नाही. आता नागपूर खंडपीठानेही ‘दलित’ हा शब्द वापरण्यासच मनाई करणारा आदेश दिला...
ऑगस्ट 27, 2018
सरळमार्गी चाललेल्या जीवनात अचानक एखादी घटना घडते आणि सारं आयुष्यच गुंतागुतीचं बनून जातं. अशावेळी परिस्थितीला शरण न जाता विशेषत: स्त्रिया त्यातूनही मार्ग काढत जीवनातील आनंद शोधतात. वरकरणी त्या आनंदी, समाधानी दिसत असल्या, तरी आत कुठंतरी धुमसत असतात. असं का घडलं, हा प्रश्न त्यांना सतावत असतानाच त्याचं...
ऑगस्ट 19, 2018
बेनामसा ये दर्द ठहर क्‍यूँ नही जाता जो बीत गया है वो गुजर क्‍यूँ नही जाता -निदा फाजली, (1938-2016) एरिक लोमॅक्‍स नावाच्या एका युद्धसैनिकाचं तर अवघं आयुष्य असं वेदनामय होतं. एरिकची जगावेगळी गोष्ट सांगणारा चित्रपट "द रेल्वेमॅन' सन 2013 मध्ये येऊन गेला. अद्भुत अभिनय आणि वेगळाच आशय असलेला हा चित्रपट...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 24, 2018
एकीकडं स्त्रियांना अजूनही अनेक क्षेत्रांत डावललं जात असताना एक मुलगी स्पेशल फोर्समध्ये सामील होते. कुटुंबातसुद्धा डावलली गेलेली ही मुलगी लष्करातल्या कडक प्रशिक्षणाला उत्तमपणे सामोरी जाते. एका विशिष्ट प्रसंगातून सगळ्यांनाच एक धक्कादायक माहिती समजते आणि त्यातून तिचा कणखरपणा आणखी ठळक होतो....
जून 17, 2018
तापसी पन्नू अभिनित ‘नीतिशास्त्र’ हा एक मिनिटांचा अगदी तर्कशुद्ध असा लघुपट आहे. बलात्कारासारख्या कृत्यावर चीड येऊन बदला घेण्याची तीव्र भावना उत्पन्न झालेल्या मुलीच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयावर हा लघुपट सकस आणि नेमकं भाष्य करतो. दोन महत्त्वाचे संदेश पोचवण्याचं काम ही उत्तम कलाकृती करते. एक म्हणजे...
मे 27, 2018
झपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. या अंमलबजावणीबाबतचा जागतिक पातळीवरील धावता आढावा घेत त्याचे पडसाद आपल्या देशात कसे उमटले जाणं आवश्‍यक आहे, याचं चांगलं विवेचन अभियंता अनिरुद्ध...
मे 20, 2018
आजकाल फेसबुकवर सतत "अपडेट' टाकत राहणं हे जणू फारच जिवंतपणाचं लक्षण झालं आहे! आपण काय करतो, कुठं जेवतो, काय खातो, आज कोणते कपडे घातले आहेत अशा अनेक गोष्टी सातत्यानं "फेसबुक अपडेट'च्या नावाखाली जाहीर करून आपणच आपला खासगीपणा नष्ट करत असतो, सगळं काही चव्हाट्यावर मांडत असतो, याचं भान मुलींनी-महिलांनी...
मे 11, 2018
आसारामबापूच्या निमित्ताने भोंदूबाबांच्या आहारी जाणाऱ्यांनी स्वतःचेच कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वीच अशा बाबांवर प्रहार करत, सावधगिरीचा सल्ला दिला होता. आज आपल्याला आसाराम नव्हे तर तुकाराम महाराजांच्या मार्गावरून चालण्याची खरी गरज आहे.  काही महिन्यांपूर्वीची...
एप्रिल 15, 2018
भारतातील जनतेने मागील ५० वर्षांच्या कालखंडात मोठे बहुमत असलेल्या तीन पंतप्रधानांना सत्तेचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करताना अनुभवले आहे. पहिल्या म्हणजे इंदिरा गांधी. त्या १९७१मध्ये मोठ्या बहुमताच्या जारोवर सत्तेत आल्या होत्या. दुसरे राजीव गांधी. त्यांनाही १९८४मध्ये मोठे बहुमत मिळाले होते. सध्याचे...
एप्रिल 14, 2018
उन्नाव व कठुआ या दोन ठिकाणी झालेल्या अमानुष बलात्कारानं सगळा देश हादरला आहे.. आपण सर्वांनीच त्याबद्दल ऐकलं, वाचलं आणि कदाचित सोडूनही दिलं..! आपल्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत का, असा प्रश्न आता पडत आहे. मेंदूला झिणझिण्या याव्या, असा प्रकार घडतोय आणि आम्ही आज यावर व्यक्त झालो नाही, याला विरोध केला...
मार्च 08, 2018
गोष्ट फार लांबची नाही. साधारणपणे 5-6 वर्षांपुर्वी पुण्यात घडलेल्या अनेक प्रकरणांपैकी एक प्रकरण. ठिकाण नेहमीचचं आपलं हिंजेवाडी.  अमेरिकेवरुन भारतात वडिलांकडे आलेली तरुणी. नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी हिंजवडीत आली. मुलाखत संपल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहन मिळेना तेव्हा मिळेल त्या कॅबमधे बसली....
मार्च 04, 2018
'थ्री बिलबोर्डस आउटसाइड एबिंग, मिसूरी.' डोक्‍याला कम्प्लीट शॉट देणारा हा ब्लॅक कॉमेडी म्हणावा तसा सिनेमा आहे! उद्या - सोमवारी पहाटे टीव्हीवर ऑस्करसोहळ्याचं थेट प्रक्षेपण होईल, तेव्हा त्या सोहळ्यात हा 'थ्री बिलबोर्डस...' धमाल करताना दिसेल. या चित्रपटाला तब्बल सात नामांकनं आहेत. हा चित्रपट थोर...
फेब्रुवारी 11, 2018
विघातक गोष्टींत गुंतलेली मुलं सर्व स्तरांतली, सर्व वर्गांतली, कोणत्याही घरातली आहेत, हे वास्तव आहे. आज जी मुलं चौदा वर्षांच्या पुढं आणि अठराच्या आसपास आहेत, त्या वयात ‘हे कुठलं वळण?’ असं म्हणण्याची वेळ आई-बाबांवर आणि शिक्षकांवर आलेली आहे. कारण टीनएजमधलं मूल घर-कुटुंब आणि शाळेपेक्षा अगदीच वेगळं...
जानेवारी 14, 2018
पूर्व आफ्रिकेतल्या रवांडा या देशातलं ‘सामूहिक हत्याकांड-स्मारक’ पाहून झाल्यावर ते उभारण्यामागची संकल्पना आणि अधिक संदर्भ मिळवण्यासाठी तिथल्या माहिती-केंद्रातल्या एका महिला-अधिकाऱ्याला भेटलो. हस्तांदोलन करताना माझी ओळख करून दिली आणि सहजच बोलून गेलो, की मी भारतातून आलोय... त्यावर त्या आनंदानं...
डिसेंबर 10, 2017
महाराष्ट्र राज्य सरकारने पटसंख्या कमी असल्याचं कारण दाखवत राज्यातील जवळपास 1300 शाळा बंद करण्याबाबतचं परिपत्रक काही दिवसांपूर्वी काढलं. कमी गुणवत्तेमुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे असं सांगत, दहा पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या...
डिसेंबर 01, 2017
(लेखामधील पहिल्या परिच्छेदानंतरचे तीन परिच्छेद उपहासात्मक आहेत) अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याच्या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. राज्यभर गंभीर पडसाद उमटलेल्या या प्रकरणाचा निकाल हा बहुप्रतीक्षित...
नोव्हेंबर 12, 2017
वर्णद्वेष, जातीयता, बलात्कार, खून असल्या गोष्टी असूनही हा चित्रपट आग्रहानं मुला-बाळांना दाखवला गेला. हे उदाहरण विरळाच मानावं लागेल. शाळा सुरू होते, त्या वयात मुलांची जडणघडण वेगानं होत असते. भल्याबुऱ्या गोष्टी ती शिकत असतात. अशा वयात ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ बघायला मिळाला तर काम बरंचसं सोपं होऊन जातं....
ऑक्टोबर 23, 2017
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अन्तोनिओ गुटरेस यांची सध्या झोप उडाली आहे. ते म्हणतात, की राष्ट्रसंघातील नोकरशाहीच समस्या बनली असून (तिच्या विचारानं भंडावून सोडल्यानं) ‘रात्री झोपच येत नाही.’ गुटरेस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान व राष्ट्रसंघातील शरणार्थी विभागाचे माजी प्रमुख उच्चायुक्त. १ जानेवारी...
सप्टेंबर 25, 2017
एखादी तरुणी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रात्री उशिरा चित्रपट पाहण्यासाठी का जात असेल? आणि तेही अतिशय घट्ट जिन्स आणि टी-शर्ट घालून. हा स्वैराचार नव्हे काय आणि याबाबत तिने आपल्या पालकांना आणि महाविद्यालयाला काहीही माहिती दिलेली नसते, हे असे का? चालकासह स्वतःची कार या तरुणीला पुरवू शकतील एवढे तिचे वडील...