एकूण 4676 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अमेरिका- इराक युद्धाच्या भौगोलिक कारणमीमांसेवर डॉक्‍टरेक्‍ट मिळविली आहे. आता त्यांची दिल्लीच्या भारतीय अनुसंधान परिषदेने उच्च संशोधनासाठी...
नोव्हेंबर 21, 2018
टाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले तर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. अशी खैरेनगर (ता. शिरूर) येथील महिलांनी समस्या मांडल्या. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी पिशव्यांना वाढलेली मागणी...
नोव्हेंबर 21, 2018
माळीनगर - सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात १८ नोव्हेंबरअखेर २६ लाख ५० हजार ६८० टन उसाचे गाळप होऊन २४ लाख चार हजार ३६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखाना गाळपात, तर पांडुरंग कारखाना सरासरी साखर उताऱ्यात जिल्ह्यात आघाडीवर आहेत. चालू गळीत हंगाम २० ऑक्‍टोबरपासून सुरू झाला....
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : वसुलीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी (ता.19) रात्री उशिरा काढले आहेत. वसुलीच्या कामात गंभीर नसल्यामुळे गेल्या आठवड्यातच आयुक्तांनी एकाला निलंबित केले होते.  महापालिकेची...
नोव्हेंबर 20, 2018
चोपडा : चोसाका मंडळाने शेतकऱ्यांना पेमेंटचे दिलेल्या धनादेशाचा अनादर झाला आहे. संचालक मंडळ संवेदनशील नसल्याने त्यांच्या विरोधात आज शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असल्याची माहिती कृती समितीचे प्रमुख एस. बी. पाटील यांनी दिली.  चोसाका मंडळाने 2017-2018च्या गळीत हंगामात उसाचे पेमेंट...
नोव्हेंबर 20, 2018
इराणवर निर्बंध लादताना भारताला त्या देशाकडून तेलाची आयात करण्यास तूर्त सवलत देण्याचा अमेरिकेचा निर्णय हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजय म्हणावा लागेल. त्यामुळे तेलसंकट लांबणीवर पडले आहे. परंतु, ते पूर्णपणे टळलेले नाही, याचे भान ठेवलेले बरे.  डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय...
नोव्हेंबर 20, 2018
मनपा कन्हान नदीतून घेणार अधिक पाणी नागपूर : जानेवारीनंतर शहरावर पाणीटंचाईचे संकट असून त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पूर्ण क्षमतेने पाणी घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे कन्हान नदीतून पाण्याचा अधिक उपसा करावा लागणार आहे....
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत पहिल्या लढतीपासून वर्चस्व राखणाऱ्या सातारा यशवंत संघाला विजेतेपदाच्या लढतीत मात्र यशवंत होण्यात अपयश आले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पुणेरी उस्ताद संघ खऱ्या अर्थाने ‘उस्ताद’ ठरला. अंतिम फेरीत त्यांनी...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत, यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. टंचाई काळात जे अधिकारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिला. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम...
नोव्हेंबर 18, 2018
सोलापूर : मागील दोन वर्षांत राज्यातील 20 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी रब्बीसाठी पीकविमा भरला. मात्र, त्यापैकी फक्‍त सहा लाख 27 हजार शेतकरीच भरपाईसाठी पात्र ठरले असून उर्वरित 14 लाख शेतकऱ्यांना भरपाईच मिळाली नाही. विमा भरूनही भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांची वणवण सुरू असताना दुसरीकडे मात्र विमा कंपन्यांना...
नोव्हेंबर 18, 2018
औरंगाबादः फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी(ता.17) भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सगळे पदाधिकारी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते....
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने निश्‍चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यासोबत दुष्काळी...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : धावण्यामुळे शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्या आपण अधिक सक्षम बनतो. त्यामुळे मॅरेथॉनपटू जीवनाच्या कणखर प्रसंगांमध्येही कधीच हार मानत नाही. जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाऊन यशस्वी होण्यासाठी अगदी मॅरेथॉन नाही, पण एकदा तरी छोट्या-मोठ्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये नक्की भाग घ्यायला हवा, असा सल्ला...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
नोव्हेंबर 16, 2018
उंब्रज (कराड) : राज्यसह परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा आराखडा पाच डिसेंबर अखेर पूर्ण करावा. त्याचा अहवाल प्रांताधिकारी व देवस्थानला सादर करावा, आपत्कालीन रस्त्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या.  पाल यात्रा...
नोव्हेंबर 16, 2018
अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत अमलात अाणलेले महाडीबीटी हे पाेर्टल फेल झाले अाहे. यामुळे शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपची सर्व कामे मनुष्यबळाद्वारे हाेत असल्याने २०१८-१९ ची शिष्यवृत्ती...
नोव्हेंबर 16, 2018
राजापूर - सुपारीच्या पिकावर काळ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या गळतीद्वारे सुपारीचे उत्पन्न घटले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये थैमान घातलेल्या या रोगाच्या प्रादुर्भावाने कोकणपट्ट्यातील सुपारी बागायतदार हैराण झाले आहेत. मात्र तालुक्‍यातील तेरवण येथील प्रकाश जोग यांनी त्यावर ‘जीवामृता’...
नोव्हेंबर 16, 2018
येवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर तुलसीविवाहाच्या अगोदरच मुहूर्त दिल्याने आच्छर्य व्यक्त होत आहे.असे असले तरी २१ तारखेपासून विवाह सुरु होत असून या वर्षी ७५ वर विवाह मुहूर्त असले तरी दुष्काळाने...
नोव्हेंबर 16, 2018
मनमाड - येथून जवळ असलेल्या अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी गेलेले ग्रामसेवक अमोल आहिरे यांच्यावर ढाबा मालक हरमनसिंग सेखो व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची गंभीर घटना आज घडली. या घटनेमुळे ग्रामस्थ व ग्रामसेवक संघटनेमध्ये संतापाची लाट आहे. याप्रकरणी तक्रार...