एकूण 83 परिणाम
डिसेंबर 11, 2018
खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सिंहगडावरील...
डिसेंबर 10, 2018
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे 3600 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघातील महत्त्वपूर्ण नगर परिषद घेऊन वर्चस्व सिद्ध केले.  या नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - गोरेगावमधील आरे वसाहतीमधील जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरवात झाली आहे. कारण, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. ‘आरे’तील जंगलाला आग लागली, की लावली याबाबत वन विभागाने तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. तसेच या...
डिसेंबर 03, 2018
अकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन रिलायन्स सोबत आहे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून, वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची तर पाळीव प्राणी गाय, बैल, म्हैस यासारख्या पशूंची वन्यजीव प्राण्यांनी शिकार केली तर प्रत्येकी 60 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल,...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 13, 2018
यवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले. भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनीही वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या पार्श्‍वभूमिवर बोलताना केंद्रीय...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई - नरभक्षक टी- वाघिणीला जेरबंद करण्याचा अथवा तो प्रयत्न फसल्यास ठार मारण्याचा आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नव्हता, असे स्पष्टीकरण देत मुनगंटीवारांची पाठराखण करण्यासाठी तब्बल आठ दिवसांनी वन विभाग पुढे आला आहे.  वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार व एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे हे आदेश...
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप झालेले अंजली दमानिया यांचे प्रकरण हे प्रत्यक्षात केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. या मागे कोण आहे, हे राज्यातील जनतेला उघडपणे माहीत झाले आहे. या प्रकरणात मी दोषी असेल, तर आपल्यावर कारवाई करावी. अन्यथा आपल्याला निर्दोष जाहीर करावे, अशी सडेतोड भूमिका...
ऑक्टोबर 26, 2018
औरंगाबाद - दुष्काळी स्थितीमध्ये जनावरांना चारा कमी पडू नये, यासाठी कमी पाण्यातील चारा पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा विचार आहे. येत्या काही दिवसांत या योजनेचे मूल्यांकन करून पुनर्विचार करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. राज्याच्या तिजोरीवर पहिला...
ऑक्टोबर 12, 2018
सोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप, कॉंग्रेस व सर्वच राजकीय पक्षांकडून पेन्शन मुद्याचे राजकारण होत आहे. असे चित्र असताना राज्यातील कर्मचाऱ्यांना "आप'कडून अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच...
ऑक्टोबर 12, 2018
पंढरपूर - नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत पंढरपुरात नामसंकीर्तन सभागृहाचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे 2 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या नामसंकीर्तन सभागृहामुळे पंढरीतील नाट्यकलावंत व नाट्यरसिकांची नाट्यगृहाची गैरसोय दूर होणार आहे. दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्बन बॅंकेच्या...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी : वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगर वाडी येथील सुमारे 50 अधिक कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत, निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई : बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी रस्त्यावर येत असल्याने अनेक अडचणी येतात होते. त्यामुळे उद्यानातील रस्त्यांवर कुंपणच घाला, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मंगळवारी उद्यानात झालेल्या "आरंभ' या कार्यक्रमात केली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला.  उद्यानात...
सप्टेंबर 06, 2018
लखमापूर (मालेगाव) - सोमवार दि.३ सप्टेंबर रोजी परमोरी (लखमापूर) येथे बिबट्याने कु.सार्थक ज्ञानेश्वर दिघे या ३ वर्षाच्या कुटुंबातील एकुलत्या एक मुलाला ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीतील शेतकरी, मजूर भयभीत झालेले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी तालुक्यातील शेतकरी...
जुलै 23, 2018
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यासह विदर्भातील अनेक मंत्री, आमदारांचे पारडे सरकारमध्ये जड असल्याने पावसाळी अधिवेशन विदर्भात झाले. अधिवेशनात विदर्भातील अनेक गंभीर मुद्द्यांवर, ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होईल व प्रश्न सुटतील असे मानले जात होते. त्यामुळे 46 वर्षांनंतर...
जुलै 22, 2018
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे दुपारी साडे आकराच्या दरम्यान मुंबईत आगमन झाले. शहा या भेटीत महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादात दोन्ही राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघानूसार आढावा घेतला...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...
जुलै 01, 2018
कल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...