एकूण 66 परिणाम
डिसेंबर 04, 2018
कोल्हापूर - आपल्याला कोणीही थंडीने गारठलेले किंवा कुडकुडत रस्त्याकडेला झोपलेले दिसले, तर लगेच आम्हाला फोन करून पत्ता, ठिकाण कळवा. तातडीने स्वेटर, ब्लॅंकेट पोहोच केले जाईल. व्हॉटस्‌ ॲपवर फिरणाऱ्या या मेसेजने ६४ निराधारांना ऊब दिली आहे. मुक्ता फाऊंडेशनच्या वतीने हा मेसेज फॉर्वर्ड केला जात आहे. शिवाजी...
नोव्हेंबर 26, 2018
किल्लारी - एखाद्या सरकारी विभागात नोकरीस असलेल्या पालकाचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यास काही विशेष वाटत नाही. मात्र किल्लारीपासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीहत्तरगा येथील एका मजुराच्या मुलाने मजुरी करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. या तरुणाचे कष्ट पाहणाऱ्या...
नोव्हेंबर 26, 2018
बनोटी - यात्रेत सालाबादप्रमाणे दरवर्षी कुस्त्या होतात. शेवटची मानाची कुस्ती कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारतो. हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील यात्रा महोत्सवात रविवारी (ता. २५) अनेक कुस्त्या झाल्या; पण त्यातील एका कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आखाड्यात एकटीच मुलगी पहिलवान असलेल्या वैजापूरच्या शीतल...
नोव्हेंबर 23, 2018
वाल्हेकरवाडी - दिवाळीसारखा आनंदाचा सण घरी बसून साजरा न करता परिसरातील बालमावळ्यांना सोबत घेऊन गेल्या दोन दशकांपासून किल्ल्याची सफर स्वखर्चातून घडवतोय. या शिवाय किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून ते मुलांना आकर्षक बक्षिसेही देतात. अशोक वायकर असे त्या अवलियाचे नाव असून ते आकुर्डी येथील रहिवासी आहेत...
ऑक्टोबर 14, 2018
नगर परिसरातील वाळू तस्करांच्या प्रतिबंधासाठी बुलेटवरून अचानक जाऊन केलेल्या कारवाईमुळे उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना लोक ‘लेडी सिंघम’ म्हणू लागले आहेत.  निष्ठेने जबाबदारी पेलताना ही तरुणी प्रसंगी रणरागिणी होते. मागासवर्गीयांना शाळाप्रवेशासाठी जातीचे दाखले, जमिनीच्या वादाची प्रकरणं आदी...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - गजानननगर, हडको येथील महिलांनी विविध जाती-धर्मांतील ३० ते ४० महिलांनी गणविश्‍व महिला गणेश मंडळाची स्थापना केली आहे. दहा वर्षांपासून हे मंडळ गणेशोत्सव साजरा करते.  गुलालाऐवजी फुलांची उधळण, डीजेमुक्त मिरवणूक, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पारंपरिक नृत्य, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात गणेशाची...
जुलै 11, 2018
संगमेश्‍वर - जन्मानंतर वर्षातच पोलिओ झालेल्या एका भंगारवाल्याच्या मुलाने वाणिज्य शाखेचा प्रथम श्रेणीतील पदवीधर होण्याचा मान मिळवला. प्रबळ इच्छाशक्‍ती आणि जिद्द एखाद्याला कुठे नेते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मोहंमद तकसिम खान.   मूळ उत्तर प्रदेशमधील अरंज येथील तकसिम खान हे व्यवसायाच्या निमित्ताने  ...
जुलै 10, 2018
जळगाव - मनात जिद्द, दृढ आत्मविश्‍वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. याच त्रिसूत्रीच्या बळावर जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील रूपेशसिंह पाटील या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या २६ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सेंट्रल आर्मी पोलिस फोर्सची परीक्षा...
जुलै 03, 2018
पुनाळ - वडिलोपार्जित शेती म्हणावी, तर गुंठाभरही नाही. राहतं घरच काय ते आपलं. शिक्षणाचा मागमूस नसलेल्या घरात फौजदार झालेला मुलगा पाहून आईबापाचा ऊर भरून आला. काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील वाळवेकरवाडीतील सचिन दगडू भिलारी पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाला. जेमतेम हजार लोकसंख्येच्या वाडीत दगडू भिलारी व...
जून 27, 2018
निरगुडसर - रांजणी (ता. आंबेगाव) येथील नरसिंह क्रीडा मंडळातील खो-खो खेळाडू पल्लवी गोविंद वाघ हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. रांजणी गावातून पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा बहुमान तिने मिळविला आहे.  पल्लवीचे प्राथमिक शिक्षण...
जून 25, 2018
पुणे - शेतात राबत संसाराचा गाडा हाकणाऱ्या आई-वडिलांचे पांग फेडण्यासाठी जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत भावापाठोपाठ बहिणीनेही खाकी वर्दीचा मान पटकावला. लेकीचे हे यश पाहून आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. रूपाली मधुकर काळे असे या लेकीचे नाव. तिने २०१६...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - हॉटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत राहत होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता, तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी अभियांत्रिकीची...
जून 01, 2018
पुणे - वीज न पोचलेले गावं (गाव नव्हे, वाडीच)...रस्ता कसा असतो, याची कल्पनाही नसलेला अतिदुर्गम भाग... शाळा संपल्यावर कॉलेजमध्ये जायचं, हेही माहीत नव्हतं, अशा अत्यंत दुर्लक्षित आदिवासी पाड्यावरचा कल्पेश हा मुलगा. प्रशासकीय सेवेत काम करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले आणि अवघ्या एकविसाव्या वर्षी सहायक...
मे 13, 2018
नागपूर - सोशल मीडियाचा वापर कुणी कसा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न. हुडकेश्‍वर येथील तनिष्का संजय चंबोले हिने यू-ट्यूबवरून नृत्य शिकून विविध स्पर्धांत विजयश्री खेचून आणली. हेडराडून येथील नुकत्याच झालेल्या बहुभाषिक नाटक, नृत्य आणि संगीत स्पर्धेत तिने भाग घेतला. राष्ट्रीय पातळीवरील या मोहन्स रंग...
मे 12, 2018
बावधन - सुतारदऱ्यात त्यांची दहा बाय दहाची छोटेखानी खोली आहे. तिच्या वडिलांचा भाजीचा व्यवसाय, तर आईची धुण्याभांड्याची कामे. पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणाऱ्या आईवडिलांच्या प्रपंचाला मदत करीत पूजा ज्ञानेश्वर शिंदे ही युवती पोलिस कॉन्स्टेबल झाली आहे. जिद्दीच्या जोरावर, सातत्याने परिश्रम करून कौटुंबिक...
मे 10, 2018
निगडी - ग्रामीण भागातील वंचित घटकांशीसाठी ‘समाज कलश’ हा अभिनव उपक्रम प्राधिकरणातील प्रतिभा आणि अर्जुन दलाल या दांपत्याने सुरू केला आहे.  ग्रामीण, दुर्गम भागातील समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात या इच्छेने त्यांना ही संकल्पना सुचली. या संकल्पनेअंतर्गत ग्रामीण भागात सुसज्ज प्रयोगशाळा, विज्ञान...
मे 02, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) :माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) येथील एका गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द व कठोर परिश्रमाने पीएसआय पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन गावातील माळी समाजातील पहिला पीएसआय होण्याचा मान मिळवला आहे. ही यशोगाथा आहे खुडाणे येथील किरण देविदास शेवाळे यांची. खरं तर किरणला...
एप्रिल 28, 2018
कोल्हापूर - अनाथ तसेच आई-वडील हयात नसलेल्या मुलींना गगनबावडा येथील निवासी शाळा मायेचा आधार ठरली आहे. या शाळेच्या प्रवेशक्षमतेत यंदा वाढ झाली आहे. सहावी ते आठवी तसेच नववी ते बारावीसाठी प्रत्येकी ५० जागा शासनाने वाढवून दिल्या आहेत. दोन्ही वर्गांसाठी प्रत्येकी दीडशे अशी तीनशे इतकी प्रवेश क्षमता झाली...
एप्रिल 17, 2018
अकलूज - स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे जीवन असह्य वाटू लागले. तेव्हा धीराच्या माईने त्याच्या पाठीवर हात ठेवला. आपली एक किडनी देऊन तिने आपल्या मुलाला जणू नवा जन्म दिला. जन्म आणि जीवनदान देणाऱ्या त्या आईच्या कुशीत विसावत...
एप्रिल 08, 2018
कोल्हापूर - दहावीला असताना पहिल्या सेमिस्टरनंतरच तिची दृष्टी अंधूक होऊ लागली. रायटर आणि ऑडिओ बुक्‍स ऐकतच मग तिने दहावी, बारावीपासून ते ग्रॅज्युएशन, दोन विषयांत पोस्ट ग्रॅज्युएशन, सेट, नेटसह ‘बी.एड.’ही पूर्ण केले. क्‍वालिफिकेशन एवढे असले तरी अनेकांचे उंबरे झिजवूनही दृष्टिदोषामुळे तिला कुणी नोकरी...