एकूण 466 परिणाम
एप्रिल 24, 2019
मुंबई : भारताचा भरवशाचा सलामीवीर , तंत्रशुद्ध आणि फटकेबाज फलंदाज, भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करणारा, उंचीने कमी पण कर्तृत्वाने महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस.  दादरच्या एका महाराष्ट्रीय कुटुंबात त्याचा 1973मध्ये जन्म झालेला. त्याच्या वडिलांनी दिग्गज संगीतकार सचिन देव...
एप्रिल 03, 2019
नागपूर, ता. 3 : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार दिशा कासटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर यजमान विदर्भाने सातव्या साखळी सामन्यात त्रिपुराचा सहा गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.  विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर...
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
मार्च 14, 2019
लंडन - कसोटी क्रिकेट मृतावस्थेत असताना त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी ‘आयसीसी’ने  कसोटी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची घोषणा केली आहे. पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या या जागतिक स्पर्धेस अधिक लोकप्रिय करण्यासाठी मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबने (एमसीसी) कंबर कसली असून, कसोटी क्रिकेट रंजक करण्यासाठी त्यांनी...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
मार्च 08, 2019
रांची : भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेतील आव्हान पणास लागले असताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात काटशह देत पिछाडी कमी केली. भक्कम सुरवातीनंतर 314 धावांचे अपेक्षेपेक्षा काहीसे कमी आव्हान उभारूनही कांगारूंनी 32 धावांच्या अधिक्‍याने विजय मिळविला. कांगारू जवळपास द्विशतकी सलामी देत असताना भारताकडून...
मार्च 05, 2019
नागपूर : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या आठ धावांनी निसटता पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्‍कम आघाडी घेतली. या विजयासह भारताने नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्‌ध शंभर टक्‍के रेकॉर्ड कायम ठेवत विजयाचा चौकारही मारला. शतकावीर विराट कोहली व तीन...
मार्च 05, 2019
नागपूर : सलामीवीर लवकर बाद झाले.. मधली फळीही धावा जोडेना.. तेव्हा केवळ तोच भारतीय संघाचा डाव सावरतो. विराट कोहली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 40वे शतक झळकाविले.  सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन लवकर बाद झाल्यावर पुन्हा एकदा भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी कोहलीवर येऊन पडली...
मार्च 02, 2019
हैदराबाद : ट्‌वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. संथ खेळपट्टीवर केदार जाधवची फलंदाजी दमदार ठरली, तर महेंद्रसिंह धोनीची...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीयांसाठी बुधवारचा दिवस म्हणजे 'रोलर कोस्टर राईड' होता.. सकाळी पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली आणि त्यापैकी एक विमान भारतीय हवाई दलाने पाडले, असे वृत्त झळकले.. त्यानंतर भारतीयांचा जल्लोष कालच्यासारखाच 'टॉप'वर होता.. पण या कारवाईमध्ये आपलेही एक विमान पडले आणि त्यात भारताचा एक...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई ः ज्या इंग्लंड संघाकडून विश्‍वकरंडक हातचा निसटला होता, त्याच संघाचा सलग दोन सामन्यांत पराभव करून भारतीय महिलांनी त्यांच्याविरुद्ध प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. तीन दिवसांत दोन विजय मिळवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. झूलन आणि शिखा या वेगवान...
फेब्रुवारी 24, 2019
महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर... गेल्या काही वर्षांपासून...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होत असलेल्या ट्‌वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज (ता. १५) मुंबईत संघ निवड होत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची ही अखेरची मालिका असल्यामुळे निवड समितीसाठी ही एकप्रकारे ‘सेमीफायनल’ असणार आहे. या मालिकेनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी प्रथम संभाव्य आणि नंतर मुख्य...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेन्टी-२० मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला असला तरी या मालिकेत ज्या दोघींनी भारताचा लढा कायम ठेवला त्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांना ट्‌वेन्टी-२० क्रमवारीत चांगला फायदा झाला. जेमिमा दुसऱ्या तर स्मृती सहाव्या स्थानी आली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही आहे....
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन- महेंद्रसिंग धोनी एक असामान्य अवलिया आहे. ग्रेट मॅच फिनिशर, कॅप्टन कूल, दोन विश्वकरंडक विजेता असे किती तरी अनेक मानाने तुरे त्याने आपल्या मुकूटात रोवलेले आहेत. कर्णधारपद कधीच सोडले आहे पण विराट कोहली आथवा त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा कर्णधारपद भुषवत असला तरी पडद्या (यष्टींच्या) मागून...
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन : यष्टीमागे जगात सर्वांत चतुर यष्टीरक्षक म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात हिच चतुराई दाखविली. धोनीची चतुराई पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल! न्यूझीलंडचा जिमी निशम भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना केदार जाधवच्या गोलंदाजीवर...
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन : कमी धावसंख्येतही भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत न्यूझीलंडचा डाव 217 धावांत संपुष्टात आणून पाचव्या एकदिवसीय सामन्यात 35 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळविला. चौथ्या सामन्याप्रमाणे पाचव्या सामन्यातही भारताच्या...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
फेब्रुवारी 02, 2019
दुबई : भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत महिला विभागात फलंदाजीत अव्वल स्थानावर आली आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत शतक आणि नाबाद 90 धावांच्या खेळीमुळे स्मृतीने क्रमवारीत तीन क्रमांकाची झेप घेत ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरी आणि मेग लॅनिंग यांना मागे...