एकूण 18 परिणाम
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
फेब्रुवारी 24, 2019
महिला क्रिकेटमध्ये अल्पावधीत सर्व पुरस्कार मिळवत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सांगलीच्या स्मृती मानधनाची फोर्ब्जच्या अंडर 30 श्रेणीत अव्वल तीस खेळाडूंत निवड झाली. पुरुषप्रधान भारतीय क्रीडा संस्कृतीला स्मृतीच्या रूपानं आणखी एक आयकॉन मिळाला आहे. स्मृतीच्या या वाटचालीवर एक नजर... गेल्या काही वर्षांपासून...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
जुलै 29, 2018
इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणं म्हणजे काय दिव्य असतं हे विराट कोहलीला २०१४च्या दौऱ्यात लगेच समजलं. पाच कसोटी सामन्यांत त्याला फलंदाज म्हणून मोठं अपयश आलं होते. त्याच जखमा उरात घेऊन विराट इंग्लंड दौऱ्यात सहभागी झाला आहे. कर्णधार म्हणून कोहलीला आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीला इंग्लंड दौऱ्यातल्या...
मे 13, 2018
कसोटी क्रिकेटमध्ये आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन देशांचं पदार्पण होतंय. इतके दिवस दहा देशांमध्ये चालणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये आणखी दोन देशांचा समावेश होत असल्यामुळं ही मैदानावर ही "बाराशाही' तळपेल. आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या समावेशाच्या निमित्तानं त्यांची वाटचाल आणि एकूणच कसोटी क्रिकेटमधल्या काही...
मार्च 11, 2018
'माही' या नावानं चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या महेंद्रसिंह धोनी अजूनही पाय रोवून उभा आहे. 'विकेटकीपर' म्हणून तब्बल चारशे बळी घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमधल्या दहा हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. धोनी क्षेत्ररक्षणाच्या या क्षेत्राकडं कसं बघतो, त्यानं कोणतं तंत्र विकसित केलं, कोणत्या गोष्टीमुळं...
फेब्रुवारी 26, 2018
विराट कोहली हे एक अजब रसायन आहे. भरपूर ऊर्जा असलेला आणि जोरदार कामगिरी करणारा हा खेळाडू नेमका कसा विचार करतो? दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींकडं बघण्याचा त्याचा दृष्टीकोन कसा आहे? महेंद्रसिंह धोनीबाबत त्याच्या मनात काय भावना आहेत?...अशा सगळ्या प्रश्‍नांबाबत थेट त्याच्याशी...
फेब्रुवारी 11, 2018
रियान मॅनसर हा एक अवलिया साहसपटू. खेळाच्या आणि साहसाच्या आवडीतून या अवलियानं ज्या एकेक करामती केल्या, त्या ऐकून थक्क व्हायला होतं. सायकलवरून एकट्यानं ३५ देशांमधून फिरणं, कयाक बोट वल्हवत मादागास्कर बेटावर जाणं अशा त्याच्या मोहिमा गाजल्या. अवघ्या चाळीस वर्षांच्या रियानकडे आता थरारक आठवणींचा खजिनाच...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
जानेवारी 21, 2018
मायदेशातल्या विजयी मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ परदेशांतही चमकदार कामगिरी करेल, अशी रास्त अपेक्षा होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन मैदानावर भ्रमाचा भोपळा फुटला. अव्याहत सामन्यांपासून फलंदाजीतल्या समस्यांपर्यंत अनेक गोष्टींमुळं भारतीय संघाची ‘कसोटी’ लागली आहे. या सगळ्या गोष्टींचं विश्‍...
डिसेंबर 10, 2017
दिल्लीतल्या प्रदूषणाचे ढग नुकतेच भारत-श्रीलंका क्रिकेट सामन्यावरही जमल्याचं चित्र दिसलं. श्रीलंकेचे खेळाडू मास्क घालूनच मैदानावर उतरले आणि सामना काही काळ थांबवावा लागला. हा श्रीलंकेचा ‘रडीचा डाव’ असल्याची टीका सुरू असताना, दुसरीकडं शहरांमधल्या घुसमटलेल्या श्‍वासाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली....
नोव्हेंबर 26, 2017
एकदिवसीय सामन्यांत ३२ आणि कसोटी सामन्यांत १८ शतकं करून धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं एक अजब झेप घेतली आहे! सध्याच्या घडीला तो जगातला सर्वोत्तम फलंदाज मानला जात आहे. सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट नक्की पार करेल, असा विश्‍वास सगळ्यांना वाटू लागला आहे. मात्र,...
ऑक्टोबर 15, 2017
‘प्रो-कबड्डी’ची लोकप्रियता वाढत आहे, तसतसे अनेक अंधारातले नायकही प्रकाशात यायला लागले आहेत. वेगवेगळी गावं, दुर्गम भागांतून आलेले हे खेळाडू. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या, कथा वेगळ्या. रोहितकुमार, गिरीश एर्नाक, दीपक हुडा हे असेच खेळाडू. त्यांच्या संघर्षाच्या या चकित करणाऱ्या कहाण्या. ‘‘आम्हाला मॅच...
जून 18, 2017
कोणत्याही खेळात दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना समान संधी असेल, तरच मजा येते. क्रिकेटमध्ये तर बॅट-बॉलचं युद्ध रंगलंच पाहिजे. मात्र, गेले काही दिवस गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना पोषक वातावरण तयार केलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ही गोष्ट अनेकांना खटकली. इयान चॅपेल, सचिन...