एकूण 2157 परिणाम
जानेवारी 21, 2019
पाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या आविष्कार आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात त्यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील २०...
जानेवारी 21, 2019
नाशिक - यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आले, हे गैर आहे. साहित्यिकांनी समाजाचे दुःख साहित्यात प्रखरपणे मांडत पीडितांच्या व्यथा, यातना सर्वांसमोर आणल्या पाहिजेत; परंतु यंदाच्या साहित्य संमेलनात निमंत्रण रद्दच्या घटनेनंतर बेअब्रू...
जानेवारी 21, 2019
हिंगोली - जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती विभागाचे पथक लवकरच औरंगाबाद विभागात दाखल होणार आहे. हे पथक विभागातील आठ गावांतील कामांची तपासणी करणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत मराठवाड्यात विविध गावांमधून सिमेंट नालाबंधारे, नाला...
जानेवारी 21, 2019
नाशिक - अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बोलावले आणि निमंत्रण रद्द केल्याने गोंधळ उडाला. टीका होऊ लागली. बेअब्रू झाली. मग साहित्य संमेलन अन्‌ साहित्यिकांची गेलेली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. हे गैर आहे, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : 1957 पासून शौर्य पुरस्कारासाठी साहसी बालकांची निवड करणारी स्वयंसेवी संस्था अनियमितता प्रकरणात अडकल्याने सरकार आता स्वतंत्रपणे शौर्य पुरस्काराची निवडप्रक्रिया राबवणार आहे. त्याअनुषंगाने सरकारने तयारी केल्याची माहिती सूत्राने दिली.  प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस अगोदर देशातील निवडक...
जानेवारी 20, 2019
सिडको - छावा संघटना ही सर्व जातीधर्माला सामावून घेणारी संघटना आहे. केवळ मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा संघटनेने उचलून धरलेला नाही, तर त्याचबरोबर शेतमालाला योग्य भाव मिळावा, काबाडकष्ट करणाऱ्यांना न्याय मिळावा या भावनेतून संघटना काम करीत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची आगामी काळात गय केली जाणार...
जानेवारी 20, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चेन्नई येथील राजभवनमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.   लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राइम...
जानेवारी 19, 2019
मोखाडा :  सन 1992 - 93  साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125  हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर शासनाची संपूर्ण यंत्रणा येथे कामाला लागली होती. मात्र, बालमृत्यू आणि कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आले नव्हते. परंतू...
जानेवारी 19, 2019
पुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव असला पाहिजे. देश धर्मनिरपेक्ष असला, तरीही त्याला राष्ट्रदेवाची आवश्‍यकता आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केले.  एमआयटी वर्ल्ड...
जानेवारी 19, 2019
चिपळूण - मानवाने निसर्गावर अतिक्रमण केल्याने जंगले नष्ट होत चालली आहेत. परिणामी बिबट्याचा नागरी वस्तीतील वावर वाढला. माणूस बिबट्याचा भक्ष्य नाही. बिबट्याच्या जवळ गेलो तरी तो सहजासहजी हल्ला करीत नाही. जखमी अथवा बिथरलेलाच बिबट्या माणसावर हल्ला करतो. अलीकडे माणूस नाही, तर बिबट्याच समस्यांच्या गर्तेत...
जानेवारी 18, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या वर्षीच्या संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘चुंबक’ने मोहोर उमटविली.  इवा ह्युसन दिग्दर्शित ‘गर्ल्स ऑफ द सन’ चित्रपटाने ‘प्रभात’...
जानेवारी 17, 2019
पुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम करताना माझी जीविकाच उपजीविका ठरली. तसेच, मी अपघाताने अभिनयाच्या क्षेत्रात आलो, असे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आज ‘पिफ फोरम’मध्ये सांगितले....
जानेवारी 16, 2019
सासवड : "प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व राज्यातील सरकारला परवडणार नाही. बळिराजाची संपूर्ण कर्जमाफी करून त्याला पुन्हा भांडवल दिले; तरच हिंदुस्तानला आधार मिळेल. अन्यथा तुमचा पराभव अटळ आहे. गरीब...
जानेवारी 16, 2019
विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध महामंडळांसाठी तब्बल ७३६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यातून विविध जातींसाठी बिनव्याजी कर्ज देण्यावर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍...
जानेवारी 16, 2019
वाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले आहे. गावात मुलींची संख्या वाढली असून, ती मुलांपेक्षा २० टक्के अधिक आहे. सध्या गावात ० ते २५ वयोगटातील मुले २५ व मुली २९ आहेत. गाव १०० टक्के साक्षर...
जानेवारी 15, 2019
नागपूर : ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता.१५) नागपुरात ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. प्र. ना. परांजपे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती भाषाव्रती पुरस्कार प्रदान केला जाणार होता. सायंकाळी ६...
जानेवारी 15, 2019
बावधन - मुळशी तालुका वारकऱ्यांचा, कुस्तीगीरांचा, उद्योजकांचा, राजकारण्यांचा आहे. ही तालुक्‍याची ओळख जगभर पोचवायची आहे. यापुढे वाळूमाफियांवर आधारित रेती पॅटर्न या चित्रपटाची निर्मिती करणार आहे, असे भावोद्गार प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी बावधन बुद्रुक येथे काढले. मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार...
जानेवारी 15, 2019
पुणे - ‘आजूबाजूला असणारे, घडणारे विषय घेऊनच मी चित्रपट करतो. मग त्या विषयांमध्ये थोडा नर्मविनोदीपणा आणण्याचा प्रयत्न करतो,’ असे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आज सांगितले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) ‘कॅन्डिड टॉक’ या परिसंवादामध्ये ‘खटला-बिटला’, ‘धप्पा’, ‘दिठी’, ‘भोंगा’, ‘वॉकिंग विथ द...
जानेवारी 14, 2019
कोल्हापूर - येथील ताराराणी विद्यापीठ संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा भद्रकाली ताराराणी पुरस्कार पद्मश्री नीलिमा मिश्रा यांना जाहीर झाला आहे. गुरूवारी (ता.17) सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. रोख 51 हजार रूपये, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे पुरस्काराचे...
जानेवारी 14, 2019
पुणे -  राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त समाजामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या दहा मातांना संभाजी ब्रिगेडतर्फे आदर्श माता पुरस्काराने लाल महालामध्ये नुकतेच गौरविण्यात आले. तसेच या प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने मीनाक्षी  राऊत, तर जिजाऊ पुरस्काराने  प्रमिला गायकवाड यांना सन्मानित...