एकूण 209 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
अँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची नवदुर्गा आहे राजश्री देशपांडे. गुजराती कन्या विद्यालयात शिकणारी राजश्री ही विद्यापीठाचे कर्मचारी बलवंत देशपांडे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सुनंदा...
ऑक्टोबर 16, 2018
बाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड रस्ता. बाळंतपणासाठी कडूसला गेले; पण काही कारणाने मला पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. खेडच्या शासकीय रुग्णालयातून रात्री दहा वाजता रुग्णवाहिका निघाली....
ऑक्टोबर 09, 2018
पणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्याची राजधानी पणजी येथे पार पडणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 'इफ्फी'साठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 'इफ्फी'मध्ये एकूण 80 देश सहभागी होणार असून त्यातील 64 देशांनी आपली मान्यता दिली आहे. इफ्फीच्या...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली : शाळांमध्ये संगीत शिकविले जाते, मग शास्त्रशुद्ध पद्धतीने नाटक का शिकविले जात नाही. नाट्यकला ही तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व खुलविण्याचा उत्तम मार्ग आहे. म्हणूनच शिक्षणाला रंगभूमी जोडण्याची गरज आहे. दिल्ली सरकारने हा प्रयोग सुरू केला आहे. अन्य राज्यांनी त्याचे अनुकरण करावे, असे मत...
ऑक्टोबर 07, 2018
चिरंजीवित्वाचा शाप लाभलेल्या अश्‍वत्थाम्याचं महाभारतातलं मिथक कमालीचं गूढ आहे. बारा वर्षापूर्वी अशाच एका अश्‍वत्थाम्याची कहाणी सांगणारा चित्रपट येऊन गेला होता. त्याचं नाव होतं ः "द मॅन फ्रॉम द अर्थ'... पृथ्वीवरचा माणूस. चमत्कारिकच नाव! हा पृथ्वीवरचा माणूस आहे, तर मग आपण कोण आहोत? चित्रपटाचा फार...
ऑक्टोबर 06, 2018
नाशिक - येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या कवायत मैदानावर दिमाखदार सोहळ्यात पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या ११५ व्या तुकडीच्या दीक्षान्त सोहळ्यात मानाची तलवार बुलडाण्याचे राजेश जवरे यांनी पटकावली. विविध गटांतील सर्वाधिक पारितोषिकांसह मानाची तलवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजेश...
सप्टेंबर 26, 2018
पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित नाट्यगृहांचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाट्य कलावंत आणि नाट्यरसिकांची गैरसोय होत आहे. प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्‍टोबर उजाडणार...
सप्टेंबर 20, 2018
हैदराबादः तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त होऊन दारू प्यायलेल्या वडिलांनी मुलगी व जावयावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीचे हात तोडले असून जावई या हल्ल्यात जखमी झाला आहे. यावेळी नाना थांबा...
सप्टेंबर 17, 2018
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या जीवनाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी... 1) आज नरेंद्र मोदी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या शाळकरी मुलांसोबत संवाद साधतील.  2) आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी 600 कोटी रुपयांच्या नव्या योजनांचा शुभारंभ करणार आहेत. 3)...
सप्टेंबर 17, 2018
हैदराबाद : तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी खास "डॉग पार्क'ची निर्मिती केली जात आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे.  ग्रेटर हैदराबाद महापालिकेने कोंडापूरमध्ये हे पार्क विकसित केले आहे. यामध्ये वॉकिंग ट्रॅक आणि क्‍लिनिकची सुविधाही आहे. ज्या ठिकाणी हे...
सप्टेंबर 16, 2018
साहेबाच्या देशात लॅंकेशर परगण्यानजीक कम्ब्रिया भागात एक चिमुकलं बाजारपेठेचं गाव आहे. नाव आहे ओल्वरस्टन. तिथल्या एका चिरेबंदी जुन्या घरावर निळी पाटी लागलेली दिसते ः ‘स्टॅन लॉरेल यांचा जन्म १६ जून १८९० रोजी येथे झाला.’ ग्लासगोतल्या ब्रिटानिया संगीत सभागाराच्या जुन्या इमारतीच्या भिंतीवर अशीच एक निळी...
ऑगस्ट 31, 2018
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव याचा आज वाढदिवस आहे. राजकुमार राव याने बॉलिवूड 'ए' ग्रेड नायकांच्या लिस्टमध्ये इतक्या कमी वेळात निर्माण केलेले स्थान उल्लेखनीय आहे. 31 ऑगस्ट 1984 ला गुडगाव (हरियाणा) येथे जन्मलेल्या राजकुमारने आतापर्यंत केलेल्या सिनेमांचे विषय अगदी चोखंदळपणे निवडले आहे...
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - राहुल पाटील. एक हरहुन्नरी कलाकार. येथील हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर तो गेली आठ ते दहा वर्षे काम करतोय. रसिकांना पोट धरून हसवतानाच अंतर्मुख करणाऱ्या ‘सोकाजीराव टांगमारे’ नाटकात त्याच्या छोट्याशाच, पण महत्त्वाच्या भूमिका. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याचे वडील अमृत पाटील यांचे निधन...
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या दृष्टीने आवश्‍यक तयारीला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, विद्यमान संचालक मंडळ सव्वादोन वर्षांपूर्वी सत्तेवर आले; मात्र त्यानंतर एकही सर्वसाधारण सभा...
ऑगस्ट 19, 2018
कोल्हापूर - विमानतळाच्या धर्तीवर राज्यातील १४ बस स्थानकांचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा समावेश आहे. सीबीएसचे रूपांतरही बसपोर्टमध्ये होणार आहे. ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर ३० वर्षांसाठी हा करार होणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर...
ऑगस्ट 13, 2018
राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र बालनाट्य स्पर्धा नागपूर : दिव्यांग कलावंतांसाठी राज्यात स्वतंत्र बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक विभागाने सादर केला आहे. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी नाट्य संमलेनातील भाषणात याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार विभागाने प्रस्ताव तयार केला असून...
ऑगस्ट 12, 2018
मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही...
ऑगस्ट 10, 2018
मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांमध्ये स्वत:चा डबा घेऊन जाण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी मल्टिप्लेक्‍स चालक-मालकांनी बाहेरील खाद्यपदार्थ थेटरात नेण्यास मज्जाव केला आहे. तसेच थिएटरात डबे नेऊ देणे म्हणजे सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे, असेही सरकारने कोर्टात सांगितले आहे. अशा वेळी सामान्य, गरीब...
ऑगस्ट 08, 2018
पुणे - महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्माला येणाऱ्या अर्भकांसाठी ‘गोल्डन फर्स्ट मिनिट न्यूओनेटल रेस्पिरेटर’ उपकरणे खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या उपकरणांमुळे नवजात अर्भकांना ऑक्‍सिजन पुरवठा करता येणार आहे. नवजात अर्भकाला पहिला श्‍वास घेता न आल्यामुळे त्याचा जीव धोक्‍यात येतो. श्‍...
ऑगस्ट 06, 2018
कोल्हापूर - चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या अभिराम भडकमकर यांची येत्या महिन्याभरात नवीन कादंबरी वाचकांच्या भेटीला येणार आहे. टाकाळा आणि एकूणच कोल्हापूरविषयीच्या अनुभवांची शिदोरी त्यातून रिती होणार आहे. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार...